
IPO Listingलाच मोठा धक्का! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
हा IPO 50 कोटींचा असल्याने 15 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर पर्यंत हा IPO उघडा होता. तसेच त्याला एकूण 2.53 पट प्रतिसाद मिळाला दरम्यान फारसा मोठा प्रतिसाद नव्हता. याला QIB मोठ्या संस्थांनी अर्ज केले होते. श्रीमंत गुंतवणूकदारांनी 1.56 पट आणि आपल्यासारख्या छोट्या रिटेल गुंतवणूकदारांनी 2.80 पट अर्ज केले होते. त्यामुळे लिस्टिंगला जास्त धमाका होईल अशी अपेक्षा नव्हतीच.
या IPO मध्ये कंपनीने 14,52,800 नवीन शेअर विकले आहेत. यातून जो 50 कोटी रुपये मिळाला आहे त्याचा वापर कंपनी कुठे करणार आहे ते पण त्यांनी सांगितलं आहे. त्यातला 1.36 कोटी रुपये शेड बांधण्यासाठी, 7.25 कोटी रुपये नवीन मशीन घेण्यासाठी, 26.50 कोटी रुपये रोजच्या कामासाठी म्हणजे खेळतं भांडवल म्हणून, 7 कोटी रुपये इतर कंपनीच्या कामासाठी आणि 7.43 कोटी रुपये IPO च्या खर्चासाठी वापरणार आहेत.
Share Market Today: शेअर बाजारात आज काय घडणार? काय म्हणाले तज्ज्ञ? ‘या’ शेअर्सवर ठेवा नजर
वामा वोवनफॅब ही कंपनी साखर, सिमेंट, खताच्या ज्या प्लास्टिकच्या मजबूत पिशव्या बघतो त्या PP आणि HDPE प्लास्टिकपासून बनलेल्या असतात ती कंपनी पिशवी बनवते. ही कंपनीचा कारखाना दमणमध्ये असून ग्राहकांला हवी तशी पिशवी तयार करुन देते.
मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीचा नफा वाढत असल्याचे दिसत आहे. 2024 ते 2026 या काळात कंपनीला निव्वळ नफा 109% ने वाढून 11.55 कोटी रुपये झाला. तसेचं कंपनीचं एकूण उत्पन्न पण 177% ने वाढून 214.62 कोटी रुपये झालं आहे. उपन्न वाढत असेल तरी कंपनीवर मार्च 2026 पर्यंत कंपनीवर 25.44 कोटी रुपयांचं कर्ज आहे.तसेच कंपनीकडे राखीव पैसा 24.96 कोटी रुपये आहेत.