Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Stock Market Today: शेअर बाजारात कशी होणार आठवड्याची सुरुवात? जाणून घ्या तज्ञांचा अंदाज

Share Market Update: शेअर बाजारात आज परिस्थिती असणार, कोणते शेअर्स महत्त्वाचे ठरणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. बाजारातील तज्ज्ञांनी आज शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 12, 2026 | 08:59 AM
Stock Market Today: शेअर बाजारात कशी होणार आठवड्याची सुरुवात? जाणून घ्या तज्ञांचा अंदाज

Stock Market Today: शेअर बाजारात कशी होणार आठवड्याची सुरुवात? जाणून घ्या तज्ञांचा अंदाज

Follow Us
Close
Follow Us:
  • भारतीय शेअर बाजार आज स्थिर राहण्याची अपेक्षा
  • तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला
  • या शेअर्सवर असणार आज गुंतवूकदारांचे लक्ष
India Share Market Update: १२ जानेवारी रोजी भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, स्थिर राहण्याची अपेक्षा आहे. यामुळे गुंतवणूक करताना गुंतवणूकदारांनी सावध भुमिका बाळगावी, असा सल्ला शेअर बाजारातील तज्ज्ञांनी दिल्ला आहे. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी सपाट सुरुवात दर्शवितात. गिफ्ट निफ्टी २५,७९६ च्या आसपास व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा जवळजवळ ८ अंकांनी जास्त होता.

Todays Gold-Silver Price: सोन्यामध्ये गुंतवणूक करायची आहे? जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

शुक्रवारी, भारतीय शेअर बाजाराने सलग पाचव्या सत्रात तोटा वाढवला आणि तो तीव्र घसरणीसह संपला. सेन्सेक्स ६०४.७२ अंकांनी किंवा ०.७२% ने घसरून ८३,५७६.२४ वर बंद झाला, तर निफ्टी ५० १९३.५५ अंकांनी किंवा ०.७५% ने घसरून २५,६८३.३० वर बंद झाला. आजच्या व्यवहारात गुंतणूकदार टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, एचसीएल टेक्नॉलॉजीज, आनंद राठी वेल्थ, एनटीपीसी, महिंद्रा अँड महिंद्रा, डीमार्ट, रिलायन्स इंडस्ट्रीज, आयआरईडीए, स्पंदना स्फुर्ती, लेमन ट्री हॉटेल्स, अक्झो नोबेल, वेदांत या शेअर्सवर लक्ष केंद्रीत करू शकतात.  (फोटो सौजन्य – Pinterest)

आनंद राठी शेअर अँड स्टॉक ब्रोकर्स येथील इक्विटी टेक्निकल रिसर्चचे वरिष्ठ व्यवस्थापक जिगर एस. पटेल यांनी गुंतवणूकदारांना पुढील एक ते दोन आठवड्यांसाठी तीन स्टॉक खरेदी करण्याची शिफारस केली आहे. यामध्ये आयसीआयसीआय बँक, एन्ड्युरन्स टेक्नॉलॉजीज, जेएसडब्ल्यू एनर्जी यांचा समावेश आहे. प्रभुदास लिलाधर येथील तांत्रिक संशोधनाच्या उपाध्यक्षा वैशाली पारेख यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी तीन स्टॉक्सची शिफारस केली आहे. वैशाली पारेख यांच्या सल्ल्यानुसार आज गुंतवणूकदार टाटा कॅपिटल, आयजीएल आणि ओआयएल हे शेअर्स खरेदी करू शकतात.

शेअर बाजारातील तज्ज्ञांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी काही स्टॉक्सची शिफारस केली आहे. चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया यांनी आजसाठी दोन स्टॉक्सची निवडी केली आहे तर आनंद राठी येथील तांत्रिक संशोधनाचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश डोंगरे यांनी तीन स्टॉक सुचवले आहेत. प्रभुदास लिल्लाधर येथील तांत्रिक संशोधनाचे वरिष्ठ व्यवस्थापक शिजू कुथुपलक्कल यांनी इंट्राडे ट्रेडिंग दरम्यान तीन स्टॉक विकण्याचा सल्ला दिला आहे. स्टॉक पिकमध्ये अशोक लेलँड, इप्का लॅबोरेटरीज, रिलायन्स इंडस्ट्रीज, सेल, गुजरात पिपावाव पोर्ट, रॅम्को सिमेंट्स, आरती फार्मालॅब्स आणि एशियन पेंट्स यांचा समावेश आहे.

GST Fraud Alert: बनावट GST नोटिसपासून राहा सावध! CBIC ने दिला पडताळणीचा सोपा मार्ग; सविस्तर वाचा एका क्लिकवर 

चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया यांनी आज गुंतणूकदारांना खरेदी करण्यासाठी पाच ब्रेकआउट शेअर्सची शिफारस केली आहे. यामध्ये सीसीएल प्रॉडक्ट्स (इंडिया), केएसबी, एचसीएल टेक्नॉलॉजीज, एन्ड्युरन्स टेक्नॉलॉजीज आणि रॅम्को सिमेंट्स लिमिटेड यांचा समावेश आहे. तसेच बगडिया यांनी १०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करण्यासाठी उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक, एनएचपीसी आणि झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस या शेअर्सची शिफारस केली आहे.

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. Navarashtra.com कोणताही दावा करत नाही. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

Web Title: What to expect from share market today at 12 january 2026 share market news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 12, 2026 | 08:59 AM

Topics:  

  • share market
  • Share Market Today
  • Share Market Update

संबंधित बातम्या

Stock Market Today: शेअर बाजार आज कसा उघडणार? तज्ज्ञांकडून खरेदीसाठी ‘या’ स्टॉक्सची शिफारस
1

Stock Market Today: शेअर बाजार आज कसा उघडणार? तज्ज्ञांकडून खरेदीसाठी ‘या’ स्टॉक्सची शिफारस

पश्चिम आशियात शांततेच्या आशेमुळे शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स 500 अंकांनी उसळला; Eternal ला फायदा
2

पश्चिम आशियात शांततेच्या आशेमुळे शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स 500 अंकांनी उसळला; Eternal ला फायदा

Stock Market Today: अमेरिका-इराण तणाव कमी होण्याचे संकेत; भारतीय शेअर बाजारात आज तेजीची शक्यता
3

Stock Market Today: अमेरिका-इराण तणाव कमी होण्याचे संकेत; भारतीय शेअर बाजारात आज तेजीची शक्यता

सौर ऊर्जेत भारताची मोठी भरारी! Vikram Solar ने दोन वर्षांत दुप्पट केली क्षमता; ३९ देशांमध्ये ‘Made In India’चा डंका
4

सौर ऊर्जेत भारताची मोठी भरारी! Vikram Solar ने दोन वर्षांत दुप्पट केली क्षमता; ३९ देशांमध्ये ‘Made In India’चा डंका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.