
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
व्यवसाय ग्राहकांचा सहभाग वाढवण्यासाठी आणि आपले कामकाज सुलभ करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, त्यानुसार मेटा बिजनेस एजंट पहिल्याच संवादापासून अधिक सुसंगत आणि वैयक्तिकृत अनुभव देऊ शकते. मेटा बिजनेस एजंट ग्राहकांशी होणारे महत्त्वाचे संवाद २४ तास पूर्णपणे हाताळण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे, ज्यामध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो:
व्यवसायाशी संबंधित विशिष्ट प्रश्नांची उत्तरे देणे.
व्यवसायाच्या उत्पादन सूचीमधून उत्पादनांची शिफारस करणे.
अपॉइंटमेंट्स बुक करणे आणि येणाऱ्या संभाव्य ग्राहकांची पात्रता तपासणे.
मदत करण्यासाठी टीममधील सदस्याने कधी हस्तक्षेप करावा, याचा निर्णय घेण्याचा अधिकार व्यवसाय मालकांना देणे.
विक्री पूर्ण करण्यात मदत करणे.
ग्राहकांसोबत संवादापलीकडे मेटा बिजनेस एजंट व्यवसाय मालकांसाठी भागीदार म्हणूनही काम करते, जे ग्राहकांशी झालेल्या संभाषणांमधून महत्त्वाचे निष्कर्ष समोर आणते आणि मिस झालेल्या संवादांचा सारांश प्रदान करते, ज्यामुळे व्यवसायांना त्यांच्या कामकाजावर पूर्ण नियंत्रण ठेवण्यास आणि वाढीवर लक्ष केंद्रित करण्यास मदत होते.
भारतातील मेटाचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि कंट्री हेड अरुण श्रीनिवास म्हणाले, “संभाषण-आधारित व्यवसायासाठी भारत जागतिक स्तरावर सर्वात गतिमान बाजारपेठ म्हणून उदयास आला आहे, जिथे संवाद साधणे व्यक्ती आणि व्यवसायांना जोडणारा पसंतीचा मार्ग बनला आहे. व्यवसायांच्या कार्यपद्धतीत बदल घडवून आणण्यासाठी एआय अधिक केंद्रस्थानी येत आहे, तसे मेटा बिजनेस एजंट या प्रवासातील पुढील टप्प्याचे प्रतिनिधित्व करते, जे व्यवसायांना ग्राहकांचे संबंध दृढ करण्यासाठी, कार्यक्षमता सुधारण्यासाठी आणि वाढीचे नवे मार्ग खुले करण्यासाठी एआयचा वापर करण्यास मदत करते.”
ज्या मोठ्या व्यवसायांना व्यापक प्रमाणावर स्वतःचे मेटा बिजनेस एजंट तयार, कस्टमाइझ आणि तैनात करण्यासाठी पायाभूत सुविधांची आवश्यकता आहे, त्यांच्यासाठी आता मेटा बिजनेस एजंट प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला आहे. हा प्लॅटफॉर्म उद्योगांना शॉपिफाय, झेनडेस्क आणि शॉपी यांसारख्या त्यांच्या सध्याच्या व्यावसायिक यंत्रणांशी एकीकृत करत एआय-आधारित एजंट तयार आणि कस्टमाइझ करण्याची सुविधा देतो. व्हॉट्सअॅप बिजनेस प्लॅटफॉर्मसोबत काम करताना हे प्लॅटफॉर्म मोठ्या उद्योगांच्या गरजांनुसार विस्तारक्षमता, नियंत्रण आणि अचूक मोजमाप प्रदान करते.
मेटा बिजनेस एजंट प्लॅटफॉर्मचा सुरुवातीच्या टप्प्यात वापर करणाऱ्या स्वीगी, मधुलिका एंटरप्रायझेस आणि कायझेन अॅडव्हेंचर्स यांसारख्या कंपन्या या एआय एजंटचा वापर करून ग्राहकांशी उत्तम अनुभव आणि अधिक प्रबळ संबंध निर्माण करत आहेत, याचे सादरीकरणही व्हॉट्सअॅपने या इव्हेण्टमध्ये केले.
स्वीगी फूड मार्केटप्लेसच्या प्रॉडक्ट, रायडर अँड पोस्ट ऑर्डर कन्झ्युमर एक्सपिरियन्सचे व्हाईस प्रेसिडेंट रोहन छाजेड म्हणाले, “तंत्रज्ञान वापरकर्त्यांचे दैनंदिन अनुभव सोपे करते, तेव्हा सर्वात उत्तम मूल्य प्रदान करते. मेटा बिजनेस एजंटच्या माध्यमातून आमच्या डिलिव्हरी पार्टनर्सची ऑनबोर्डिंग प्रक्रिया व्हॉट्सअॅपमध्ये आणून आम्ही लाखो व्यक्तींच्या परिचयाच्या असलेल्या प्लॅटफॉर्मवर जलद आणि अधिक सोपा प्रवास तयार करत आहोत. यामधून गुंतागुंत कमी करण्यासाठी आणि व्यावसायिक संवाद व्यापक प्रमाणावर अधिक सुलभ करण्यासाठी संभाषण-आधारित एआय वापरण्याप्रती आमचा व्यापक दृष्टीकोन दिसून येतो. संभाषण-आधारित व्यापार भविष्यात व्यवसाय त्यांच्या परिसंस्थेशी कसे संवाद साधतील याचे भविष्य आहे, आणि आम्हाला मेटासोबत या बदलाच्या आघाडीवर राहताना आनंद होत आहे.”
मधुलिका एंटरप्रायझेसच्या संस्थापिका मधुलिका विक्रम म्हणाल्या, “ब्युटी व्यवसायात ग्राहक तात्काळ प्रतिसादाची अपेक्षा करतात. तुम्ही काही मिनिटांत उत्तर दिले नाही, तर ते इतरत्र निघून जातात. ब्रायडल बुकिंग, मेकअप कोर्सेस आणि ब्युटी प्रॉडक्ट्सच्या बाबतीत मागणी वाढली, तसे आम्ही ग्राहकांच्या शेकडो चौकशा हाताळत होतो. मेटा बिजनेस एजंट आमच्यासाठी गेम चेंजर ठरला, जो तुमच्या व्यवसायाबद्दल शिकतो आणि ग्राहकांसोबत संवाद स्वतः हाताळतो. जेव्हापासून आम्ही मेटा बिजनेस एजंट सुरू केला आहे, तेव्हापासून आमच्या व्यवसायातील परिवर्तनात २५-३० टक्के वाढ झाली आहे. याने माझ्या रोजच्या पुनरावृत्ती होणाऱ्या कामाचा ५०-६० टक्के ताण कमी केला आहे.”
कायझेन अॅडव्हेंचर्स अग्रगण्य अॅडव्हेंचर ट्रॅव्हल कंपनी आहे, जी व्यावसायिकरित्या व्यवस्थापित केलेल्या लडाख बाईक मोहिमा आणि हिमालयीन रोड ट्रिप्समध्ये विशेष प्राविण्य राखते. मेटा बिजनेस एजंटबद्दल आपले मत व्यक्त करत कायझेन अॅडव्हेंचर्सचे संस्थापक अमित हुडा म्हणाले, “मेटा बिजनेस एजंटने कायझेन अॅडव्हेंचर्सला लडाख टूर, किंमती, प्रवासाचा मार्ग आणि बाईक भाड्याने देण्याबाबतच्या चौकशींना त्वरित प्रतिसाद देण्यास मदत केली. यामुळे ग्राहकांना उत्तर देण्याचा वेळ कमी होतो, पर्यटनाच्या मुख्य हंगामातील गर्दी सहज हाताळली जाते, २४/७ अचूकता सुनिश्चित होते आणि आमच्या टीमला प्रत्यक्ष कामकाजावर लक्ष केंद्रित करण्याची संधी मिळते, ज्यामुळे चौकशीचे व्यवसायात रूपांतर होण्याचे प्रमाण वाढते आणि ग्राहकांचा अनुभव अधिक चांगला होतो.”
व्यक्तींसाठी मेटा बिजनेस एजंटद्वारे चालवले जाणारे व्यवसाय शोधणे व्हॉट्सअॅप आता अधिक सोपे करत आहे. लवकरच, व्यक्ती प्रत्यक्ष व्हॉट्सअॅप सर्चमध्ये कोणत्याही व्यवसायाचे नाव शोधू शकतील किंवा आपल्या मित्र आणि कुटुंबासह व्यवसायांचे संपर्क शेअर करू शकतील, ज्यामुळे विश्वासू व्यवसायांशी जोडले जाणे अधिक सोपे होईल.
मेटा बिजनेस एजंट सुरू करण्यास उत्सुक असलेले व्यवसाय येथे क्लिक करू शकतात आणि वेटलिस्टमध्ये सामील होऊ शकतात.