Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोण आहेत Indigo एअरलाइनचे मालक? नेटवर्थ वाचून उडतील तुमचेही होश

Indigo Airline: इंडिगो ही एअरलाइन एका अशा माणसाकडून चालवली जाते जो मीडियामध्ये सहसा दिसत नाही आणि तो साधेपणाने वागणे पसंत करतो. त्याने २०२५ मध्ये एका भागीदारासोबत त्याची स्थापना केली.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Dec 05, 2025 | 08:47 PM
कोण आहेत Indigo एअरलाइनचे मालक? नेटवर्थ वाचून उडतील तुमचेही होश (Photo Credit - X)

कोण आहेत Indigo एअरलाइनचे मालक? नेटवर्थ वाचून उडतील तुमचेही होश (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • एका दिवसात सर्व उड्डाणे रद्द!
  • जाणून घ्या, कोण आहेत ‘इंडिगो’चे मालक?
  • नेटवर्थ वाचून उडतील तुमचेही होश
Indigo Airline Owner Rahul Bhatia: इंडिगो (Indigo) एअरलाइनमधील संकटामुळे मोठ्या प्रमाणावर प्रवाशांचे हाल झाले आहेत. आज संध्याकाळी ४ वाजेपर्यंत एअरलाइनने आपली सर्व उड्डाणे रद्द केली आहेत. दिल्ली-हैदराबाद आणि मुंबईपासून ते पटना-कोलकातापर्यंत प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. यामुळे या एअरलाइनचा मालक कोण आणि त्यांची एकूण संपत्ती किती आहे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

राहुल भाटिया: इंडिगोचे नेतृत्व

इंडिगो एअरलाइनची कमान राहुल भाटिया या व्यक्तीच्या हातात आहे. ते माध्यमांपासून दूर राहणारे आणि साधे जीवन जगणारे म्हणून ओळखले जातात. राहुल भाटिया यांनी कॅनडातील वॉटरलू विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले आहे. ते व्यावसायिक कपिल भाटिया यांचे पुत्र आहेत. कपिल भाटिया यांची ‘दिल्ली एक्स्प्रेस’ नावाची ट्रॅव्हल एजन्सी होती.

राहुल भाटिया यांची एकूण संपत्ती

राहुल भाटिया यांच्या एकूण संपत्तीमध्ये २०१९ नंतर मोठी वाढ झाली आहे. २०२३ हुरून ग्लोबल लिस्टनुसार: त्यांची एकूण संपत्ती ३.५ अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक होती. इंडिगोच्या शेअर्समध्ये २०२५ मध्ये झालेल्या वाढीमुळे राहुल भाटिया यांची संपत्ती १० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे. ही रक्कम इंडिगोच्या वार्षिक उलाढालीपेक्षा जास्त आहे, तसेच २०१५ मध्ये जेव्हा कंपनी शेअर बाजारात सूचीबद्ध झाली, त्यावेळच्या एकूण कंपनी मूल्यापेक्षा दुप्पट आहे. त्यांचे गुरुग्राममध्ये तीन हॉटेल्सही आहेत आणि त्यांना अर्नेस्ट अँड यंग अवॉर्ड, इकॉनॉमिक टाइम्स अवॉर्डसह अनेक मोठे पुरस्कार मिळाले आहेत.

हे देखील वाचा: Indigo Flights Cancellation: इंडिगो विमान उड्डाणे रद्दचा BCCI ला फटका! सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी सामन्यांच्या वेळापत्रकात मोठा बदल 

इंडिगोची सुरुवात आणि भागीदारांमध्ये फूट

इंडिगो एअरलाइनची सुरुवात राहुल भाटिया यांनी एकट्याने केली नव्हती. इंडिगो एअरलाइनची सुरुवात राहुल भाटिया आणि राकेश गंगवाल यांनी एकत्र मिळून केली होती. कालांतराने त्यांच्यातील संबंधांमध्ये दुरावा आला आणि मतभेद वाढले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गंगवाल यांनी इंटरग्लोब एंटरप्रायजेसच्या माध्यमातून भाटियांच्या इंडिगोवरील नियंत्रण, पार्टी ट्रान्झॅक्शन आणि बोर्डाच्या कामातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. परिस्थिती इतकी बिघडली की २०१९ मध्ये राकेश गंगवाल यांनी थेट सेबी (SEBI) कडे तक्रार केली आणि हे प्रकरण न्यायालयात तसेच लंडन आर्बिट्रेशनमध्ये पोहोचले.

राकेश गंगवाल यांचा राजीनामा

फेब्रुवारी २०२२ मध्ये राकेश गंगवाल यांनी बोर्डावरून राजीनामा दिला आणि स्पष्ट केले की ते पुढील पाच वर्षांत आपली सर्व भागीदारी बाजारात विकून टाकतील. त्यानुसार त्यांनी आपला हिस्सा विकायला सुरुवात केली आहे. गंगवाल यांच्याशी मतभेद असूनही, इंडिगोच्या वाढीला कोणताही धक्का बसला नाही. २०२३ मध्ये इंडिगोने एका दिवसात २,००० हून अधिक उड्डाणे (Flights) चालवण्याचा विक्रम केला, जो कोणत्याही भारतीय एअरलाइनसाठी पहिला रेकॉर्ड आहे.

भाटियांच्या हाती पूर्ण कमान

राकेश गंगवाल यांच्या राजीनाम्यानंतर राहुल भाटिया यांनी इंडिगो एअरलाइनची संपूर्ण कमान आपल्या हातात घेतली आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये, त्यांना कंपनीची मूळ संस्था असलेल्या इंटरग्लोब एव्हिएशनचे व्यवस्थापकीय संचालक (Managing Director) म्हणून पाच वर्षांसाठी नियुक्त करण्यात आले.

हे देखील वाचा: Indigo flights cancelled : विमान रद्द केल्याने इंडिगो कंपनीचं निघालं दिवाळं! नुकसानीचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे

Web Title: Who are the owners of indigo airlines your senses will also be blown away after reading their net worth

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 05, 2025 | 08:46 PM

Topics:  

  • Business News
  • IndiGo
  • indigo news

संबंधित बातम्या

Budget 2026: भारतात १ फेब्रुवारी, मग पाकिस्तानचा अर्थसंकल्प कधी? तारखेमागचं डोकं चक्रावून टाकणारं कारण नक्की वाचा!
1

Budget 2026: भारतात १ फेब्रुवारी, मग पाकिस्तानचा अर्थसंकल्प कधी? तारखेमागचं डोकं चक्रावून टाकणारं कारण नक्की वाचा!

IndiGo flight bomb threat: कुवेतहून दिल्लीला येणाऱ्या इंडिगो विमानाला बॉम्बची धमकी, अहमदाबादमध्ये आपत्कालीन लँडिंग
2

IndiGo flight bomb threat: कुवेतहून दिल्लीला येणाऱ्या इंडिगो विमानाला बॉम्बची धमकी, अहमदाबादमध्ये आपत्कालीन लँडिंग

Mirae Asset New ETF Launch: मिरे अॅसेटचे २ नवीन हेल्थकेअर आणि इन्फ्रास्ट्रक्चर ETF लाँच; पाहा गुंतवणूक कशी करावी
3

Mirae Asset New ETF Launch: मिरे अॅसेटचे २ नवीन हेल्थकेअर आणि इन्फ्रास्ट्रक्चर ETF लाँच; पाहा गुंतवणूक कशी करावी

Padma Awards 2026: उदय कोटक आणि सत्यनारायण नुवाल यांच्यासह ‘या’ प्रमुख उद्योगपतींना केले सन्मानित
4

Padma Awards 2026: उदय कोटक आणि सत्यनारायण नुवाल यांच्यासह ‘या’ प्रमुख उद्योगपतींना केले सन्मानित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.