Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Stock Market Crash: शेअर बाजारातून ‘हिरवळ’ गायब! सेन्सेक्स-निफ्टी जोरात कोसळले; गुंतवणूकदारांनी काय करावं?

Stock Market Crash News : देशांतर्गत शेअर बाजारात सलग तीन दिवस वाढ झाल्यानंतर शुक्रवारी परिस्थिती बदलली. सेन्सेक्स आणि निफ्टी घसरणीसह उघडले. सुरुवातीच्या व्यवहारात आयटी कंपनी इन्फोसिसचे शेअर्स जवळपास ६% घसरले. 

  • By श्वेता झगडे
Updated On: Jan 17, 2025 | 02:08 PM
शेअर बाजारातून 'हिरवळ' गायब! सेन्सेक्स-निफ्टी जोरात कोसळले; गुंतवणूकदारांनी काय करावं? (फोटो सौजन्य-X)

शेअर बाजारातून 'हिरवळ' गायब! सेन्सेक्स-निफ्टी जोरात कोसळले; गुंतवणूकदारांनी काय करावं? (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

Stock Market Crash News Marathi: सलग तीन दिवसांच्या वाढीनंतर आज (17 जानेवारी 2025) शेअर बाजारात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. इन्फोसिस आणि अ‍ॅक्सिस बँकेच्या तिसऱ्या तिमाहीच्या निकालांमुळे बाजार घसरणीसह उघडला. शुक्रवारी सकाळी ११ वाजता बीएसई सेन्सेक्स ७१८.०५ अंकांनी ०.९३% ने घसरून ७६,३२४.७७ वर व्यवहार करत होता, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ५० निर्देशांक १९६.२० अंकांनी या ०.८४% ने घसरून २३,११५.६० वर बंद झाला. सुरुवातीच्या व्यवहारात आयटी कंपनी इन्फोसिसचे शेअर्स जवळपास ६% घसरले. अ‍ॅक्सिस बँकेचे शेअर्स ६ टक्क्यांहून अधिक घसरले तर रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स जवळपास ४ टक्क्यांनी वधारले. परिणामी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) चा सेन्सेक्स आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) चा निफ्टी दोन्ही लाल रंगात व्यवहार करत आहेत.

अमेरिकेच्या H-1B व्हिसातील बदलांचा भारतीय व्यावसायिकांना होणार मोठा फायदा; अमेरिकन कंपनीत नोकरीच्या संधी

आजच्या सुरुवातीच्या व्यवहारात बाजारात घसरण होण्याचे एक मुख्य कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळालेले कमकुवत संकेत मिळत आहे. काल म्हणजे 16 जानेवारीला अमेरिकेचा प्रमुख निर्देशांक नॅस्डॅक कंपोझिट घसरणीसह बंद झाला. त्याचप्रमाणे S&P 500 आणि Dow Jones देखील कमकुवत होते. २० जानेवारीपर्यंत अमेरिकन बाजारात चढ-उतार होतील असे तज्ज्ञांचे मत आहे. या दिवशी डोनाल्ड ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घ्यायची आहे.

एफआयआयच्या विक्रीबद्दल चिंता

याशिवाय, परदेशी गुंतवणूकदारांकडून सतत होणारी विक्री ही देखील भारतीय बाजारपेठेसाठी चिंतेची बाब आहे. एका अहवालानुसार, गुरुवारी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FIIs) ४,३४१.९५ कोटी रुपयांची रोख विक्री केली. २०२५ च्या एकूण १२ व्यापार सत्रांमध्ये त्यांची एकूण विक्री ४३,२५८ कोटी रुपये होती. गेल्या वर्षीच्या शेवटच्या महिन्यांपासून परदेशी गुंतवणूकदारांनी विक्रीवर अधिक भर दिला आहे.

कंपन्यांचे निराशाजनक तिमाही निकाल

भारतीय कंपन्या आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या डिसेंबर तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर करत आहेत. डिसेंबर तिमाहीतही कंपन्यांचे आर्थिक निकाल कमकुवत राहतील असे तज्ज्ञांचे मत आहे. याचा अर्थ भारतीय बाजाराचे मूल्यांकन देखील उच्च राहील. यामुळेच गुंतवणूकदार बाजारातून पैसे काढत आहेत. विशेषतः किरकोळ गुंतवणूकदारांनी पॅनिक सेलिंग सुरू केले आहे. यामुळे बाजार सावरू शकत नाही आणि सतत घसरत आहे. देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DII) केलेली खरेदी देखील परदेशी गुंतवणूकदार आणि किरकोळ विक्रेत्यांनी केलेल्या विक्रीमुळे होणारे नुकसान भरून काढू शकत नाही.

कोणत्या वयात Health Insurance खरेदी करणे योग्य? खरेदी करण्यापूर्वी लक्षात ठेवा ‘ही’ गोष्ट 

Web Title: Why is indian stock market falling today and explained with five crucial reasons

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 17, 2025 | 02:08 PM

Topics:  

  • Business News
  • Nifty
  • sensex
  • share market

संबंधित बातम्या

Ulhasnagar Cyber ​​Fraud: कमी गुंतवणुकीत जादा परतावा’चे गोड स्वप्न; उल्हासनगरमधील वृद्धाचे २८ लाखांनी बँक खाते रिकामे!
1

Ulhasnagar Cyber ​​Fraud: कमी गुंतवणुकीत जादा परतावा’चे गोड स्वप्न; उल्हासनगरमधील वृद्धाचे २८ लाखांनी बँक खाते रिकामे!

India US Trade Agreement: भारत-अमेरिकेदरम्यान व्यापार करार लवकरच निश्चित होण्याची शक्यता; शेतकरी, मच्छीमार आणि लघु उद्योगांवर लक्ष
2

India US Trade Agreement: भारत-अमेरिकेदरम्यान व्यापार करार लवकरच निश्चित होण्याची शक्यता; शेतकरी, मच्छीमार आणि लघु उद्योगांवर लक्ष

सुदीप फार्माचा ८९५ कोटींचा IPO २१ नोव्हेंबरला उघडणार; किंमतपट्टा ५६३ ते ५९३ निश्चित
3

सुदीप फार्माचा ८९५ कोटींचा IPO २१ नोव्हेंबरला उघडणार; किंमतपट्टा ५६३ ते ५९३ निश्चित

‘शेतकरी हा हवामानाचा नायक’, UPL कडून COP30 च्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय मोहिम सुरू
4

‘शेतकरी हा हवामानाचा नायक’, UPL कडून COP30 च्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय मोहिम सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.