फोटो सौजन्य: iStock
एकीकडे महागाईचे दर सातत्याने वाढत आहे. अशावेळी अनेक जण आपला पैसा वाढवण्यासाठी विविध पर्यायांमध्ये गुंतवणूक करत असतात. जेणेकरून त्यांना भविष्यात चांगला परतवा मिळेल. पण मेडिकल क्षेत्रात सुद्धा महागाई झपाट्याने वाढत आहे. आजही एखाद्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायचे म्हटले तरी त्याचा खर्च हा सामान्यांना परवडत नसतो. अशावेळी स्वतःचा हेल्थ इंश्युरन्स असणे फार महत्वाचे आहे.
हेल्थ इंश्युरन्स असल्यामुळे तुमच्यावर कोणताही आर्थिक भार न पडता चांगल्या उपचारांचे मार्ग खुले होतात. हेल्थ इंश्युरन्समध्ये वय हा एक मोठा घटक आहे. अशा परिस्थितीत, प्रश्न उद्भवतो की तुम्ही कोणत्या वयात हेल्थ इंश्युरन्स घ्यावा आणि तो घेताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात.
Special Story : का कोसळलं हिंडेनबर्गचं साम्राज्य? अदानींवरील आरोपांचं काय होणार? वाचा A टू Z माहिती
जितक्या लवकर तुम्ही हेल्थ इंश्युरन्स घ्याल तितके चांगले. कारण ते तुमच्यासाठी त्वरित आर्थिक सुरक्षा कवच बनते. जर एखादी व्यक्ती नोकरी करत असतील तर त्यांना सहसा कंपनीकडून विमा मिळतो. यामध्ये कधीकधी मुलांसाठीही कव्हर समाविष्ट असते. वयाच्या किमान २५ वर्षांपर्यंत तरी तुमच्याकडे कोणत्याही परिस्थितीत हेल्थ इंश्युरन्स असणे आवश्यक आहे. कारण वयाच्या या टप्प्यानंतर आजारांचा धोका वाढू लागतो.
जर तुम्ही कमी वयात हेल्थ इंश्युरन्स खरेदी केला तर तुम्हाला कमी प्रीमियम भरावा लागेल. विमा कंपन्या वय आणि वैद्यकीय स्थितीनुसार प्रीमियम ठरवतात. तरुण वयासह चांगल्या मेडिकल हिस्टरीमुळे इंश्युरन्सचा प्रीमियम लक्षणीयरीत्या कमी होतो. त्याच वेळी, वाढत्या वयानुसार, आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू लागतात, ज्यामुळे प्रीमियम वाढतो.
Adani Power चे शेअर्स २७ टक्क्यांनी अचानक कसे वाढले? समोर आलं मोठं कारण
कमी वयात पॉलिसी खरेदी केल्यास चांगले कव्हर मिळण्याची शक्यता असते. तरुण ग्राहकांच्या क्लेमबद्दल कंपन्यांना खूपच कमी टेन्शन असते. म्हणूनच विमा कंपन्या तरुण ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेकदा उत्तम कव्हरेज देत असतात.