
फोटो सौजन्य - Social Media
ग्राहकांना निरोगी आणि सक्रिय जीवनशैलीचा अवलंब करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने स्विगी लिमिटेडने फिटनेस आणि प्रिव्हेंटिव्ह हेल्थ क्षेत्रातील आघाडीच्या फिटपाससोबत धोरणात्मक भागीदारीची घोषणा केली आहे. या उपक्रमाअंतर्गत स्विगीच्या ‘ईटराईट’ प्लॅटफॉर्मवर सलग पौष्टिक अन्नाची निवड करणाऱ्या ग्राहकांना आकर्षक बक्षिसे मिळणार असून, पात्र विजेत्यांना ₹2,999 किमतीचे फिटपास 360 सबस्क्रिप्शन जिंकण्याची संधीही दिली जाणार आहे.
कंपनीच्या माहितीनुसार, भारतात आरोग्यदायी आहार आणि फिटनेसबाबत ग्राहकांची जागरूकता सातत्याने वाढत आहे. सध्या ईटराईटवर दरमहा सुमारे 50 लाख वापरकर्ते पौष्टिक अन्नाची ऑर्डर देत आहेत. सकाळच्या नाश्त्यासाठी हलक्या पदार्थांना, तर दुपारचे आणि रात्रीचे जेवण करताना प्रोटीनयुक्त पदार्थांना ग्राहकांकडून अधिक पसंती मिळत असल्याचेही स्विगीने नमूद केले आहे. PwC इंडिया अहवालानुसार, 84 टक्के भारतीय ग्राहक अधिक सुरक्षित आणि पौष्टिक अन्नाच्या पर्यायांचा शोध घेत आहेत.
‘ईटराईट स्ट्रीक चॅलेंज’मध्ये सहभागी होणारे वापरकर्ते नियमितपणे ईटराईट मेन्यूमधून ऑर्डर देऊन ₹300 पर्यंत फ्रीकॅश मिळवू शकतात. याशिवाय, प्रत्येक आठवड्यातील पहिल्या 20 विजेत्यांना ₹2,999 किमतीचे फिटपास 360 सदस्यत्व मोफत दिले जाणार आहे. या सदस्यत्वामध्ये देशभरातील 12 हजारांहून अधिक जिम आणि फिटनेस स्टुडिओमध्ये प्रवेश, पोषणतज्ज्ञांचे मार्गदर्शन, AI-आधारित फिटनेस कोचिंग, व्हर्च्युअल वर्कआउट्स, वार्षिक हेल्थ चेक-अप आणि डॉक्टरांचे टेलिकन्सल्टेशन यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत.
स्विगीचे फूड स्ट्रॅटेजी, कस्टमर एक्सपिरियन्स आणि न्यू इनिशिएटिव्हजचे उपाध्यक्ष दीपक मालू यांनी सांगितले की, निरोगी जीवनशैलीची सुरुवात रोजच्या अन्न निवडीपासून होते. फिटपाससोबतची भागीदारी ग्राहकांना पौष्टिक आहारासोबत फिटनेस आणि प्रिव्हेंटिव्ह हेल्थ सेवांचा लाभ घेण्याची संधी देईल. फिटपासच्या सह-संस्थापिका आरुषी वर्मा यांनीही या सहकार्यामुळे निरोगी खाण्याच्या सवयी आणि सक्रिय जीवनशैली यांचा प्रभावी मेळ साधता येईल, असा विश्वास व्यक्त केला.
EPFO ने 34 कोटी सबस्क्रायबर्सच्या खात्यात जमा केले 8.25% व्याज? तुमच्या खात्यात आले का? कसे तपासाल
ग्राहक स्विगी ॲपवर ‘ईटराईट’ सर्च करून निवडक पौष्टिक पदार्थांची ऑर्डर देत या चॅलेंजमध्ये सहभागी होऊ शकतात. या उपक्रमाच्या माध्यमातून आरोग्यदायी पर्याय अधिक सहज उपलब्ध करून देत ग्राहकांना 360-डिग्री वेलनेसकडे प्रेरित करण्याचा स्विगीचा प्रयत्न असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.