Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 28 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Swiggy IRCTC Food Order : अरे वा! खरंच? आता ट्रेन नंबर टाकताच मिळणार आवडीचं जेवण; Swiggy ने आणलं नवं फीचर

Swiggy IRCTC Food Order : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी स्विगीने एक अत्यंत उपयुक्त आणि खास फीचर आणलं आहे. या नवीन फीचरमुळे प्रवाशांना आता फक्त आपला ट्रेन नंबर किंवा PNR नंबर टाकून सीटवरच आपलं आवडीचं गरमागरम जेवण मागवता येणार आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 28, 2026 | 04:47 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ट्रेन नंबर टाकताच मिळणार आवडीचं जेवण
  • Swiggy ने आणलं नवं फीचर
  • दोन वर्षांत ‘फूड ऑन ट्रेन’ सुसाट
Swiggy IRCTC Food Order : ट्रेनचा प्रवास बऱ्याच जणांना आवडतो. पण या प्रवासात मध्येच काहीतरी छान खायचं मन झालं तर… ट्रेनमध्ये ते मिळणं कठीण आहे. एकतर आपल्याला हवं असलेलं सामान आपण सोबत घेऊन जायचं. नाही तर ट्रेनमध्ये खाण्यापिण्याची काही पर्याय उपलब्ध असतात. पण त्या पलिकडे काही तरी वेगळंच खावंसं वाटलं तर आता ते मिळणार आहे. स्विगीने तुमच्या या क्रेविंगसाठी देखील धमाकेदार सोल्युशन आणलं आहे. एक नवं फीचर सुरु केलं आहे ज्यामध्ये ट्रेनचा नंबर किंवा नाव टाकलं की प्रवाशांच्या ट्रेनच्या मार्गावर उपलब्ध असलेले जेवणाचे पर्याय तुम्हाला पाहता येतील. यामुळे तुम्हाला पडणारा प्रश्नच सोडवला जाईल. नेमका काय आहे फीचर आणि कसा वापरायचा जाणून घेऊयात.  ( Swiggy IRCTC Food Order )

Auto Taxi Fare Hike : मुंबईकरांना झटक्यावर झटके! वाढत्या महागाईत ऑटो, टॅक्सीच्या भाड्यातही वाढ; 1 सप्टेंबरपासून नवे दर लागू

स्विगीच्या नवीन ‘सर्च बाय ट्रेन’ फीचरच्या मदतीने, प्रवासी ॲपवर त्यांच्या ट्रेनचा नंबर किंवा नाव टाकून जेवणाचे पर्याय शोधू शकतात. यामध्ये त्यांच्या ट्रेनच्या मार्गानुसार आणि वेळेनुसार उपलब्ध असलेले जेवण दाखवले जाईल, म्हणजेच वेगवेगळी रेस्टॉरंट्स शोधण्याची गरज भासणार नाही.

दोन वर्षांत ‘फूड ऑन ट्रेन’ सुसाट

स्विगीने सध्या या ट्रेन्डला फॉर्ममध्ये आणलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार गेल्या दोन वर्षांत त्यांच्या ‘फूड ऑन ट्रेन’ व्यवसायात झपाट्याने वाढ झाली आहे. ऑगस्ट २०२४ ते ऑगस्ट २०२६ या कालावधीत, या सेवेद्वारे दिलेल्या ऑर्डर्समध्ये बरीच वाढ झाली आहे. हा फॉर्माट चांगलाच लोकप्रिय होत आहे. तब्बल 12 पटींनी वाढ नोंदवली आहे. विशेष म्हणजे, मेट्रो शहरांच्या तुलनेत टियर २ आणि टियर ३ शहरांमध्ये याचा वापर जवळपास दुप्पट वेगाने वाढला आहे. २०२४ मध्ये, स्विगीची ‘फूड ऑन ट्रेन’ सेवा सुरुवातीला ६६ स्थानकांवर उपलब्ध होती. आता, कंपनीने कोल्हापूर, वर्धा, शहडोल, काकीनाडा, भरतपूर, चित्तूर, तंजावर, रायगड, जामनगर, इंदूर आणि टुंडला यासारख्या ठिकाणांसोबत आणखी २०१ स्थानकांपर्यंत आपली सेवा पोहोचवली आहे.

स्वस्त पर्याय शोधणं ही झालं सोपं

स्विगीने ‘ 99 Store Widget ‘ देखील सुरू केले आहे. याच्या मदतीने प्रवासी ॲपवर स्वस्त जेवणाचे पर्याय देखील सहज उपलब्ध होतात. यामुळे लांबच्या प्रवासात आपल्या बजेटनुसार जेवण निवडणे सोपं होतं. ट्रेनमधील प्रवाशांच्या आवडीनिवडीही बदलत आहेत. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत लस्सीच्या मागणीत ६०%, ताकाच्या मागणीत ४०% आणि मोजितोच्या मागणीत ९०% वाढ झाली आहे. यासगळ्यात सर्वसामान्य ड्रिंक्सच्या मागणीदेखील घटली आहे. एकूण ट्रेन ऑर्डरमध्ये सगळ्याच जास्त मागणी थाळीसारख्या संपूर्ण जेवणाची आहे. त्याचं प्रमाण ६५% पेक्षा जास्त आहे. मिठाईच्या मागणीतही ११०% वाढ झाली असून, त्यात रसगुल्ल्यांचा सर्वाधिक मागणी आहे.

Milk Price Hike : अरे देवा, मोठा दणका! 1 सप्टेंबरपासून दूध ९ रुपयांनी महागणार, डेअरी असोसिएशनचा मोठा निर्णय

Web Title: Swiggy irctc food order launches feature for railway passengers marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2026 | 04:47 PM

Topics:  

  • food news
  • IRCTC
  • Swiggy

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.