Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तरुणांनी ‘नोकरी शोधणारे’ नव्हे, ‘नोकरी देणारे’ बनावे; गुणवंत उद्योजकांचा ‘वर्ल्ड एंटरप्रिन्योर डे अवॉर्ड 2026’ने सन्मान

World Entrepreneurs Day 2026:  मुंबईत जागतिक उद्योजक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED) आणि MACCIA यांच्या संयुक्त पुढाकारातून आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत उद्योजकांना ‘वर्ल्ड एंटरप्रिन्योर डे अवॉर्ड 2026’ने सन्मानित करण्यात आले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 22, 2026 | 03:30 PM
तरुणांनी ‘नोकरी शोधणारे’ नव्हे, ‘नोकरी देणारे’ बनावे; गुणवंत उद्योजकांचा ‘वर्ल्ड एंटरप्रिन्योर डे अवॉर्ड 2026’ने सन्मान

तरुणांनी ‘नोकरी शोधणारे’ नव्हे, ‘नोकरी देणारे’ बनावे; गुणवंत उद्योजकांचा ‘वर्ल्ड एंटरप्रिन्योर डे अवॉर्ड 2026’ने सन्मान

Follow Us
Follow Us:
  • मुंबईत जागतिक उद्योजक दिन उत्साहात साजरा;
  • गुणवंत उद्योजकांचा ‘वर्ल्ड एंटरप्रिन्योर डे अवॉर्ड २०२६’ने सन्मान
  • ​एमसीईडी आणि एमएसीसीआयएचा संयुक्त पुढाकार
  • तरुणांनी ‘नोकरी शोधणारे’ नव्हे तर ‘नोकरी देणारे’ बनावे : रवींद्र माणगावे
​​मुंबई : महाराष्ट्र सेंटर फॉर आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट द्वारे जागतिक उद्योजक दिनानिमित्त दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात ‘वर्ल्ड एंटरप्रिन्योर डे अवॉर्ड २०२६’ सोहळा अत्यंत दिमाखात पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी भूषवले. व्यासपीठावर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर चे अध्यक्ष रवींद्र माणगावे, वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष नंदकुमार काटकर, निर्माण ग्रुपचे डॉ. राजेंद्र सावंत, डॉ. अजित मराठे, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर चे वरीष्ठ उपाध्यक्ष आणि शिप एअर फॉरवर्डर्सचे करुणाकर शेट्टी आणि जिल्हा उद्योग केंद्राचे दिग्विजय पोळ यांसारखे उद्योग क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते.

Credit Card Rule Change: कार्ड स्वाइप करण्याआधी सावध! 28 ऑगस्टपासून बदलणार क्रेडिट कार्डचे ‘हे’ ४ नियम

​कार्यक्रमप्रसंगी बोलताना एमएसीसीआयए चे अध्यक्ष रवींद्र माणगावे म्हणाले, “उद्योग आणि नवसंशोधन हाच भारताच्या आर्थिक विकासाचा खरा पाठीचा कणा आहे. आजच्या तरुण पिढीने केवळ नोकरी शोधणारे न राहता स्वतःचे उद्योग सुरू करून ‘नोकरी देणारे’ बनले पाहिजे. एमएसएमई आणि स्टार्टअप्सच्या माध्यमातून आपण ग्रामीण व शहरी भागातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊ शकतो. एमएसीसीआयए अशा सर्व नवउद्योजकांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.”

​दिपप्रज्वलनाने सुरू झालेल्या या सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या यशस्वी उद्योजकांचा गौरव करण्यात आला. नवउद्योजकांना डिजिटल पाठबळ देण्यासाठी ‘एंटरप्रिन्योर्स क्लब ॲप’चे अधिकृत उद्घाटन करण्यात आले. त्यासोबतच उद्योजकांच्या यशोगाथा आणि मार्गदर्शक माहितीने समृद्ध असलेल्या ‘दीपस्तंभ’ या विशेष पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

उपस्थितांना शासनाच्या एमएसएमई आणि स्टार्टअप योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाचे नेटके नियोजन एमसीईडीचे प्रकल्प अधिकारी प्रदीप सावंत आणि प्रादेशिक अधिकारी डी. यु.थावरे यांनी एमसीईडीचे कार्यकारी संचालक किरण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली केले होते. कार्यक्रमाला मुंबईतील शेकडो व्यावसायिक, नवउद्योजक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Sugar Price Hike: इथेनॉलमुळे वाढतेय साखरेची किंमत? सरकारने अखेर सांगितलं कारण, सामन्यांना माहीत हवेच

Web Title: World entrepreneurs day 2026 celebrated in mumbai mced maccia honour entrepreneurs with awards

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • maharashtra

संबंधित बातम्या

पुरंदरमध्ये विमानतळ प्रकल्पामुळे जमिनींचे भाव वधारले, प्लॉट विक्रीसाठी एजंट घरोघरी, गुंठेवारीच्या जाहिरातींचा जोर
1

पुरंदरमध्ये विमानतळ प्रकल्पामुळे जमिनींचे भाव वधारले, प्लॉट विक्रीसाठी एजंट घरोघरी, गुंठेवारीच्या जाहिरातींचा जोर

Satara News: पाणी द्या, नाहीतर गाव सोडावं लागेल! बनगरवाडीतील शेतकऱ्यांची सरकारकडे आर्त मागणी
2

Satara News: पाणी द्या, नाहीतर गाव सोडावं लागेल! बनगरवाडीतील शेतकऱ्यांची सरकारकडे आर्त मागणी

Devendra Fadnavis: कौशल्य विकासासाठी महाराष्ट्राचे महत्त्वाचे पाऊल; ‘टाटा स्ट्राइव्ह’ ठरणार तरुणांसाठी फायदेशीर
3

Devendra Fadnavis: कौशल्य विकासासाठी महाराष्ट्राचे महत्त्वाचे पाऊल; ‘टाटा स्ट्राइव्ह’ ठरणार तरुणांसाठी फायदेशीर

Nashik Sucide : नाशिकमध्ये तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; धक्कादायक कारणही समोर
4

Nashik Sucide : नाशिकमध्ये तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; धक्कादायक कारणही समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.