Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jawa Yezdi Roadster Red Wolf ची ऑनलाइन एन्ट्री; Amazon-Flipkart वर विक्री सुरू

Yezdi Roadster Red Wolf on Flipkart- Amazon: जावा येझदी मोटरसायकल्सने येझदी रोडस्टर रेड वूल्फची विक्री Amazon.in आणि फ्लिपकार्टवर सुरू करून ग्राहकांसाठी ऑनलाइन खरेदीचा पर्याय उपलब्ध केला आहे. प्रमुख ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्स आणि अधिकृत डीलरशिप नेटवर्कच्या माध्यमातून कंपनीने आपली ‘डिजिटल-फर्स्ट’ रणनीती आणखी मजबूत केली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 20, 2026 | 02:56 PM
Jawa Yezdi Roadster Red Wolf ची ऑनलाइन एन्ट्री; Amazon-Flipkart वर विक्री सुरू
Follow Us
Follow Us:
  • बाईक खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज
  • Jawa Yezdi Roadster Red Wolf ची ऑनलाइन एन्ट्री
  • Amazon-Flipkartवर विक्री सुरू

जावा येझदी मोटरसायकल्सने येझदी रोडस्टर रेड वूल्फ ही आपली नवीन मोटरसायकल Amazon.in आणि फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध करून दिली आहे, ज्यामागे भारताच्या प्रमुख ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून ही मोटरसायकल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे हा उद्देश आहे. कंपनीच्या अधिकृत डीलरशिप नेटवर्कच्या मदतीने ग्राहकांना आता सहजपणे ऑनलाईन माहिती मिळवून ही गाडी खरेदी करण्याचा अनुभव घेता येईल. यामुळे कंपनीची ‘डिजिटल-फर्स्ट’ ही संकल्पना अधिक मजबूत झाली आहे.

‘देश का नमक’ मागचा चेहरा कोण? टाटांच्या १४ कंपन्यांची धुरा सांभाळणाऱ्या ‘या’ व्यक्तीची कहाणी थक्क करणारी

1970 च्या दशकातील येझदीच्या वारशातून प्रेरणा घेऊन तयार झालेली ‘रेड वूल्फ’ तिच्या गडद लाल रंग, भरपूर क्रोम फिनिशिंग आणि रुबाबदार रोडस्टर लुकमुळे उठून दिसते. यात 350 अल्फा 2 लिक्विड-कुल्ड इंजिन, 6-स्पीड गिअरबॉक्स आणि असिस्ट अँड स्लिपर क्लच दिलेले असून ही मोटरसायकल चालवताना अत्यंत उत्तम आणि आनंददायी अनुभव मिळतो. लांबच्या प्रवासातील आरामाचा विचार करून ही तयार करण्यात आली आहे. यात बसण्यासाठी आरामदायी रचना, ड्वेल-चॅनेल ABS आणि 12.5 लीटरची इंधन टाकी दिली आहे, जी 350 किमीपेक्षा जास्त मायलेज देते.

जावा येझदी मोटरसायकल्सचे सह-संस्थापक अनुपम थरेजा म्हणाले, “येझदी रोडस्टरच्या खास स्टाईल आणि उत्तम इंजिनिअरिंगमुळे रायडर्सनी तिला खूप पसंती दिली आहे. जेव्हा रेड वूल्फ आली, तेव्हा तिने आपल्या रायडर्सच्या समूहाला नेहमीपेक्षा वेगळ्याच पद्धतीने आकर्षित केले. भारताच्या प्रमुख ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध झाल्यामुळे ही रेड वूल्फ आता भारतातील अनेक शहरांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करू शकेल. रायडर्सना ऑनलाईन माहिती मिळवणे आणि खरेदीची प्रक्रिया सहज सुरू करणे हे आमच्यासाठी खूप गरजेचे झाले आहे. आमची ही क्लासिक गाड्यांची रेंज लोकांपर्यंत सहजरीत्या पोहोचवण्यासाठी आम्ही यापुढेही प्रयत्न करत राहू.”

ग्राहकांच्या ऑनलाईन माहिती शोधण्याच्या आणि सोप्या पद्धतीने खरेदी करण्याच्या वाढत्या आवडीमुळे, कंपनीला पारंपारिक शोरूमच्या पलीकडे जाऊन देशभरातील जास्तीत जास्त रायडर्सशी जोडले जाण्यास या उपक्रमाची मदत होईल. तसेच भारतातील प्रीमियम मोटरसायकलच्या विक्रीसाठी ई-कॉमर्सचा वापर करण्यातील कंपनीचे सुरुवातीचे नेतृत्व यामुळे अधिक मजबूत होईल.

येझदी रोडस्टर रेड वूल्फची किंमत Rs 2,09,950 (शोरूम बाह्य – दिल्ली) असून ती सर्व अधिकृत डीलरशिप्सवर उपलब्ध आहे, तसेच Amazon.in आणि फ्लिपकार्टवरूनही खरेदी करता येईल.

ऑनलाईन खरेदी कशी काम करते

  • Amazon.in किंवा फ्लिपकार्टवर शोरूम बाह्य बुकिंगची रक्कम भरा.
  • स्थानिक अधिकृत डीलर ऑर्डरची खात्री करेल आणि ग्राहकाला ऑन-रोड राहिलेली रक्कम भरण्यासाठी मार्गदर्शन करेल.
  • रजिस्ट्रेशन आणि इन्शुरन्सचे काम डीलरशिप असलेल्या ठिकाणी पूर्ण केले जाईल, त्यानंतर गाडीचा ताबा दिला जाईल.
  • ॲक्सेसरीज आणि इतर अतिरिक्त वस्तू डीलरशिपवरूनच खरेदी कराव्या लागतील.

ओनरशिप ॲश्युरन्स प्रोग्राम:

जावा येझदी मोटरसायकल्सने ग्राहकांचे समाधान आणि कटकटीविना मालकी हक्काला प्राधान्य देत, उद्योगातील पहिला ‘ओनरशिप ॲश्युरन्स प्रोग्राम’ सुरू ठेवला आहे. यामध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे:
  • 4-वर्ष/50,000-किमी स्टँडर्ड वॉरंटी
  • 6 वर्षांपर्यंत वाढीव (एक्स्टेंडेड) वॉरंटीचे पर्याय
  • 8 वर्षांपर्यंत रोडसाईड असिस्टन्स
  • देशभरात वैध असलेला 5 वर्षांपर्यंतचा AMC
  • देशभरातील 450+ पेक्षा जास्त सेल्स आणि सर्व्हिस सेंटर्सवर सर्व मालकी लाभ उपलब्ध
3.3 कोटींची नोकरी सोडून घेतला मोठा निर्णय! Googleचा माजी कर्मचारी आता नेमकं काय करतोय?

Web Title: Yezdi roadster red wolf online available amazon flipkart india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2026 | 02:56 PM

Topics:  

  • amazon
  • bike
  • Business News
  • flipkart

संबंधित बातम्या

Oppo Find X9 वर जबरदस्त डील! फ्लिपकार्टवर मिळणार हजारो रुपयांचे डिस्काऊंट, जाणून घ्या स्मार्टफोनचे फीचर्स
1

Oppo Find X9 वर जबरदस्त डील! फ्लिपकार्टवर मिळणार हजारो रुपयांचे डिस्काऊंट, जाणून घ्या स्मार्टफोनचे फीचर्स

Car-Bike Insurance: कार-बाईकचा Insurance काढताय? आधी जाणून घ्या ‘या’ 5 गोष्टी, नाहीतर Claim अडकू शकतो
2

Car-Bike Insurance: कार-बाईकचा Insurance काढताय? आधी जाणून घ्या ‘या’ 5 गोष्टी, नाहीतर Claim अडकू शकतो

12 लाखांहून अधिक रुग्णांना मिळणार लाभ! भारतातील सर्वात मोठे ‘पेशंट सपोर्ट प्लॅटफॉर्म’!  HCAH अन् QMS चा मोठा निर्णय
3

12 लाखांहून अधिक रुग्णांना मिळणार लाभ! भारतातील सर्वात मोठे ‘पेशंट सपोर्ट प्लॅटफॉर्म’! HCAH अन् QMS चा मोठा निर्णय

Lilavati Hospital Robotic O-Arm: लीलावती हॉस्पिटलमध्ये स्पाईन सर्जरीचा नवा अध्याय! AI-सक्षम रोबोटिक O-Arm तंत्रज्ञानाची एन्ट्री
4

Lilavati Hospital Robotic O-Arm: लीलावती हॉस्पिटलमध्ये स्पाईन सर्जरीचा नवा अध्याय! AI-सक्षम रोबोटिक O-Arm तंत्रज्ञानाची एन्ट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.