
Image
13 October Dinvishesh: किशोर कुमार हे केवळ एक पार्श्वगायकच नव्हे, तर उत्तम संगीतकार, गीतकार, लेखक, निर्माता, दिग्दर्शक आणि एक बेहतरीन होते. आज त्यांचा स्मृतीदिन आहे. त्यांच्या आवाजातील जादू आणि गाताना वेगवेगळ्या शैलीत आवाज बदलण्याची त्यांची हातोटी त्यांना इतर गायकांपासून वेगळी ठरवत असे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत हिंदी, बंगाली, मराठीसह अनेक भाषांमध्ये हजारो सुपरहिट गाणी गायली, जी आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. आपल्या दैदिप्यमान गायकीसाठी त्यांना तब्बल ८ वेळा फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. १३ ऑक्टोबर १९८७ रोजी त्यांचे निधन झाले असले, तरी त्यांची सदाबहार गाणी आणि अतरंगी व्यक्तिमत्त्व आजही लोकांच्या स्मरणात जिवंत आहे.