Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

AI Success Story: वयाच्या १९ व्या वर्षी एआयच्या बळावर दरमहा १ कोटींची कमाई; ‘एंटर्न’ स्टार्टअप उभारणाऱ्या आयुषची गोष्ट एकदा वाचाच

Ayush Singh AI Success Story: अवघ्या १३ व्या वर्षी आर्थिक संकटातून मार्ग काढत आयुषने स्वतः एआय (AI) कसे शिकले? त्याच्या 'एंटर्न' (Entearn) बिझनेस मॉडेलने हजारो विद्यार्थ्यांना कशी मदत केली? जाणून घ्या सविस्तर.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 27, 2026 | 09:24 AM
aayush

aayush

Follow Us
Follow Us:

Ayush Singh AI Success Story LinkedIn Viral: आजच्या काळात एआय (AI) केवळ नोकरी मिळवण्याचे माध्यम राहिलेले नाही, तर अनेक जण याच्याच बळावर कोट्यवधींचा व्यवसाय उभा करत आहेत. नुकतेच १९ वर्षांचा भारतीय तरुण आयुष सिंह याची कहाणी सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आली आहे. आयुष दरमहा तब्बल १ कोटी रुपयांची कमाई करत असल्याचा दावा केला जात आहे. विशेष म्हणजे, आयुषने कोणत्याही आयआयटी किंवा एमआयटी सारख्या मोठ्या संस्थेतून शिक्षण घेतलेले नाही, ना कोणती मोठी पदवी मिळवली आहे. चला तर मग जाणून घेऊया, कोण आहे हा १९ वर्षांचा भारतीय तरुण जो एआयचा वापर करून दरमहा १ कोटी रुपये कमावतोय.

वयाच्या १३ व्या वर्षी सुरू झाला प्रवास

एआयच्या माध्यमातून दरमहा एक कोटी रुपये कमावणाऱ्या आयुषची ही कहाणी सर्वात आधी ‘टॉपमेट’चे संस्थापक आणि सीटीओ दिनेश सिंह यांनी लिंक्डइनवर शेअर केली होती. यानंतर ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली. दिनेश सिंह यांच्या माहितीनुसार, आयुष सिंहचा हा प्रवास कोविड-१९ महामारीच्या काळात सुरू झाला होता. त्यावेळी त्याचे वय अवघे १३ वर्षे होते आणि त्याचे कुटुंब आर्थिक संकटाचा सामना करत होते.

मर्यादित साधनांच्या जगात आयुषकडे फक्त एक लॅपटॉप, इंटरनेट कनेक्शन, काही ऑनलाईन कोर्सेस आणि शिकण्याची प्रचंड जिद्द होती. याच बळावर त्याने स्वतःहून मशीन लर्निंग आणि एआय शिकण्यास सुरुवात केली. कोणत्याही कोचिंग किंवा इन्स्टिट्यूटच्या मदतीशिवाय त्याने सतत सराव केला आणि हळूहळू या क्षेत्रावर आपली पकड मजबूत केली.

Lohagad Murder Case: लोहगड हत्या प्रकरणातील व्यावसायिक केतन अग्रवाल नेमके किती शिकले होते? जाणून घ्या त्यांचा शैक्षणिक प्रवास..

कमी वयात मिळाल्या मोठ्या संधी

व्हायरल पोस्टनुसार, एआय शिकल्यानंतर काही काळातच आयुषला परदेशी स्टार्टअप्ससोबत काम करण्याची संधी मिळू लागली. यानंतर आयुषने अनेक एआय आधारित प्रोजेक्ट्सवर काम केले. यानंतर त्याने अमेरिकेच्या एका स्टार्टअप कंपनीसाठी ‘नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग सिस्टम’वर काम केले. पुढे त्याने MLOps इंजिनिअर आणि डेटा सायंटिस्ट म्हणूनही काम पाहिले.

एआय क्षेत्रातील अनुभव वाढल्यानंतर आयुषने ‘एंटर्न’ (Entearn) नावाचा स्वतःचा स्टार्टअप सुरू केला, ज्याचा उद्देश विद्यार्थ्यांना मदत करणे हा आहे. याशिवाय त्याने ‘सेकंड ब्रेन लॅब’ नावाच्या एआय कंपनीची सह-स्थापनाही केली.

Success Story: Google ची नोकरी सोडून २३ वर्षांची तरुणी झाली उद्योजिका; आशनाने कसा उभारला कोट्यवधींचा AI स्टार्टअप वाचा एका क्लिकवर

दरमहा १ कोटी रुपये कमावल्याचा दावा

लिंक्डइन पोस्टनुसार, याच बिझनेस मॉडेलच्या मदतीने आयुष सिंह आता दरमहा सुमारे १ कोटी रुपयांची कमाई करत आहे. आतापर्यंत हजारो विद्यार्थी आणि इंजिनिअर्स त्याच्या एआय प्रोग्रामशी जोडले गेले असून, अनेकांना यामुळे नोकऱ्या मिळवण्यातही मदत झाली आहे. आयुषच्या यशाचे सर्वात मोठे कारण हेच आहे की, त्याने आपल्या कौशल्याला (Skill) एका यशस्वी बिझनेस मॉडेलमध्ये रूपांतरित केले.

Web Title: 19 year old ayush singh professional entearn startup ai success story

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2026 | 09:24 AM

Topics:  

  • ai
  • inspiration
  • linkedin
  • Youth

संबंधित बातम्या

AI ची शर्यत धोक्याच्या वळणावर? निर्मात्यांनीच सरकारांना दिला नियंत्रण गमावण्याचा इशारा
1

AI ची शर्यत धोक्याच्या वळणावर? निर्मात्यांनीच सरकारांना दिला नियंत्रण गमावण्याचा इशारा

Indian Singles : कामाचा ताण अन् डिजिटल दुनियेत तरुण एकटे? डिजिटल कनेक्‍शन असूनही भारतातील तरुण त्रस्त; मॅच ग्रुप सर्व्हेचा दावा
2

Indian Singles : कामाचा ताण अन् डिजिटल दुनियेत तरुण एकटे? डिजिटल कनेक्‍शन असूनही भारतातील तरुण त्रस्त; मॅच ग्रुप सर्व्हेचा दावा

Amravati Crime: नगर परिषदेसमोर संशयास्पद हालचाल अन् पोलिसांची झडती; पुढे जे सापडलं ते धक्कादायक
3

Amravati Crime: नगर परिषदेसमोर संशयास्पद हालचाल अन् पोलिसांची झडती; पुढे जे सापडलं ते धक्कादायक

Career Skills: नोकरी हवीय? फक्त डिग्री असून चालणार नाही! पहिली नोकरी मिळवण्यापूर्वी शिका या 10 महत्त्वाच्या स्किल्स
4

Career Skills: नोकरी हवीय? फक्त डिग्री असून चालणार नाही! पहिली नोकरी मिळवण्यापूर्वी शिका या 10 महत्त्वाच्या स्किल्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.