Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘आरटीई’चे ३८२ प्रवेश झाले निश्चित! ९४४ जणांना लॉटरी; प्रवेशाची गती संथ, ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ

आरटीई प्रवेश प्रक्रियेला संथ गती असून ९४४ विद्यार्थ्यांना लॉटरी लागूनही फक्त ३८२ प्रवेश निश्चित झाले आहेत. जिल्ह्यात २३८१ अर्जांपैकी ९५ शाळांमध्ये १००७ जागा मोफत प्रवेशासाठी राखीव आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 23, 2026 | 08:43 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

शैक्षणिक सत्र २०२६-२७ साठी ‘राईट टू एज्युकेशन’ (आरटीई) अंतर्गत प्रवेश प्रक्रियेत संथ गती दिसून येत असून, लॉटरी लागलेल्या विद्यार्थ्यांपैकी मोठ्या संख्येने प्रवेश अद्याप प्रलंबित आहेत. जिल्ह्यात एकूण २३८१ अर्ज प्राप्त झाले होते. त्यातून काढलेल्या सोडतीत ९४४ विद्यार्थ्यांची निवड झाली. मात्र, अंतिम मुदतीपर्यंत केवळ ३८२ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित होऊ शकले आहेत.

विद्यार्थ्यांना जर्मनी, जपान, रशिया भाषेचे धडे! परदेशातील रोजगाराच्या संधीमध्ये वाढ होणार

जिल्ह्यातील ९५ शाळांमध्ये आरटीईअंतर्गत १००७ जागा मोफत प्रवेशासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. १० एप्रिलपासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असली, तरी विविध अडचणींमुळे प्रवेश प्रक्रियेला अपेक्षित गती मिळालेली नाही. त्यामुळे मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांचे प्रवेश प्रलंबित राहिले आहेत. सुरुवातीला १ किमी अंतराची अट अनिवार्य असल्याने अनेक पालकांना अर्ज करता आले नव्हते. त्यानंतर ३ किमीपर्यंतच्या शाळांचा पर्याय देण्यात आला. मात्र, या बदलामुळेही प्रक्रिया सुरळीत झाली नाही. कागदपत्रांची पूर्तता, पडताळणी आणि माहिती मिळण्यात होणारा विलंब यामुळे पालकांची मोठी गैरसोय होत आहे.

याशिवाय, अनेक पालकांना लॉटरी संदर्भातील संदेश मोबाईलवर वेळेत मिळाले नसल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत. काहींना अपेक्षित शाळा न मिळाल्यानेही प्रवेश प्रक्रिया अडकली आहे. परिणामी, लॉटरी लागूनही अनेक विद्यार्थ्यांचे प्रवेश प्रलंबित राहिले आहेत.
या पार्श्वभूमीवर पालकांकडून मुदतवाढीची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार शासनाने प्रवेश प्रक्रियेसाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यामुळे उर्वरित ५६२ विद्यार्थ्यांना कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी अधिक वेळ मिळणार आहे.

शिक्षण विभागाचा शाळांना दिलासा! स्वयंमूल्यांकन प्रक्रियेला मुदतवाढ, ‘या’ तारखेपर्यंत माहिती भरणे बंधनकारक

उपशिक्षणाधिकारी गजानन डाबेराव यांनी सांगितले की, कागदपत्रांची अपूर्णता आणि वेळेत पडताळणी न झाल्यामुळे प्रवेशाची संख्या कमी राहिली आहे. आता मुदतवाढ मिळाल्याने पालकांना आवश्यक कागदपत्रे सादर करता येतील, तसेच पडताळणी समितीलाही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल. त्यामुळे पुढील काही दिवसांत प्रवेश प्रक्रियेला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

Web Title: 382 rte admissions confirmed 944 candidates selected via lottery

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2026 | 08:43 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.