Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

8th Central Pay Commission: फेडरेशनच्या शिष्टमंडळाने घेतली आयोगाच्या अध्यक्षांची भेट; ‘या’ मागण्यांचे सादर केले निवेदन

8th Central Pay Commission: ऑल इंडिया नॅशनल एज्युकेशनल फेडरेशनच्या शिष्टमंडळाने आठव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या अध्यक्षांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Aug 12, 2026 | 04:45 PM
commission

commission

Follow Us
Follow Us:
  • समान कामासाठी समान वेतन
  • उच्च वेतन श्रेणींमध्ये एक अतिरिक्त टप्पा जोडण्याची मागणी
  • कर्मचाऱ्यांची वास्तविक क्रयशक्ती सुरक्षित राहिल
8th Central Pay Commission:  ऑल इंडिया नॅशनल एज्युकेशनल फेडरेशनच्या शिष्टमंडळाने सोमवारी नवी दिल्ली येथील आयोगाच्या कार्यालयात आठव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या अध्यक्षा न्यायमूर्ती रंजना देसाई, सदस्य सचिव पंकज जैनसह अधिकाऱ्यांची भेट घेतली. देशभरातून प्राप्त झालेल्या सूचनांच्या आधारे फेडरेशनने तयार केलेल्या सविस्तर निवेदनातील विविध मुद्द्यांवर या शिष्टमंडळाने चर्चा केली, शिष्टमंडळात फेडरेशनचे अखिल भारतीय अध्यक्ष प्रा. नारायण लाल गुप्ता आणि सरचिटणीस प्रा. गीता भट्ट यांचा समावेश होता, अशी माहिती प्रदेशाध्यक्षा प्रा.प्रदीप खेडकर, डॉ. दिलीप अर्जुने यांनी दिली.

हे सुद्धा वाचा- UPSC CDS 2 परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर; १३ सप्टेंबर रोजी होणार परीक्षा, जाणून घ्या महत्त्वाचे नियम आणि तपशील!

समान कामासाठी समान वेतन

आठव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशींमध्ये महागाई, वाढता राहणीमानाचा खर्च, वास्तविक क्रयशक्ती सेवेदरम्यान व निवृत्तीनंतरची आर्थिक सुरक्षा यांना मुख्य आधार मानले जावे, ‘फिटमेंट फॅक्टर’ ३.६ वरून ३.८ पर्यंत वाढवून त्यात एक अतिरिक्त टप्पा जोडावा, वार्षिक वेतना वाढ ५ टक्क्यांवरून ६ टक्के करुन उच्च वेतन श्रेणींमध्ये एक अतिरिक्त टप्पा जोडण्याची मागणी केली. तसेच, सहाव्या वेतन आयोगातील ‘वन-स्टेप अप’ (एक टप्पा वर) पद्धत पुन्हा लागू करण्याची आणि ‘समान कामासाठी समान वेतन’ सुनिश्चित करण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.

कर्मचाऱ्यांची वास्तविक क्रयशक्ती सुरक्षित राहिल

युनियनने आयोगाला विनंती केली की, त्यांनी केवळ वेतन सुधारणेपुरते मर्यादित न राहता वेतन, भत्ते, आगाऊ रक्कम पदोन्नती, सेवा अटी, रजा, सामाजिक सुरक्षा, पेन्शन आणि निवृत्तीचे लाभ या सर्वांचा सर्वसमावेशक आढावा घ्यावा. तसेच नियमित वेतन सुधारणेसाठी आढावा चक्र किंवा महागाईशी संबंधित स्वयंचलित आढावा प्रणाली असावी, जेणेकरून कर्मचाऱ्यांची वास्तविक क्रयशक्ती सुरक्षित राखता येईल, असेही सुचवण्यात आले.

हे सुद्धा वाचा- Paper Leak: लातूरचे रुग्णालय अन् नीट पेपर फुटीचे कनेक्शन! सीबीआयकडून मोठा गौप्यस्फोट; विद्यार्थ्याच्या उत्तराने खळबळ!

Web Title: 8th central pay commission demands news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2026 | 04:45 PM

Topics:  

  • central govt
  • Salary

संबंधित बातम्या

LIC HFL Recruitment 2026: MBA उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी! LIC HFL मध्ये ५० पदांची भरती; दरमहा मिळणार ५० हजार रुपये स्टायपेंड
1

LIC HFL Recruitment 2026: MBA उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी! LIC HFL मध्ये ५० पदांची भरती; दरमहा मिळणार ५० हजार रुपये स्टायपेंड

IIM Nagpur Recruitment 2026: आयआयएम नागपूरमध्ये ‘ज्युनियर एक्झिक्युटिव्ह’ पदांसाठी भरती जाहीर; ७ व्या वेतन आयोगानुसार मिळणार पगार!
2

IIM Nagpur Recruitment 2026: आयआयएम नागपूरमध्ये ‘ज्युनियर एक्झिक्युटिव्ह’ पदांसाठी भरती जाहीर; ७ व्या वेतन आयोगानुसार मिळणार पगार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.