Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

LIC HFL Recruitment 2026: MBA उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी! LIC HFL मध्ये ५० पदांची भरती; दरमहा मिळणार ५० हजार रुपये स्टायपेंड

LIC HFL Recruitment 2026: एमबीए (MBA) शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेडने (LIC Housing Finance Limited) 'मॅनेजमेंट ट्रेनी' पदांसाठी भरती काढली आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Oct 15, 2026 | 11:09 AM
Image

Image

Follow Us
Follow Us:

LIC HFL Recruitment 2026: एमबीए (MBA) शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेडने (LIC Housing Finance Limited) ‘मॅनेजमेंट ट्रेनी’ पदांसाठी भरती काढली आहे. या भरतीअंतर्गत मार्केटिंग आणि सेल्स विभागात एकूण ५० पदे भरली जातील. विशेष म्हणजे यामध्ये फ्रेशर्स देखील अर्ज करू शकतात. निवड झालेल्या ट्रेनी उमेदवारांना १ वर्षाच्या ट्रेनिंगदरम्यान दरमहा ४० ते ५० हजार रुपयांपर्यंत स्टायपेंड (मानधन) दिले जाईल. ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर कंपनीच्या निश्चित निकषांवर खरे उतरणाऱ्या उमेदवारांना स्थायी पदावर नियुक्ती मिळू शकते. अशा परिस्थितीत वार्षिक पॅकेज १४ लाख रुपये किंवा त्याहून अधिक असू शकते. या भरतीसाठी उमेदवार २५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करू शकतात.

एलआयसीच्या या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना कंपनीच्या मार्केटिंग आणि सेल्सशी संबंधित कामे शिकण्याची संधी मिळेल. यामध्ये नवीन ग्राहक जोडणे, होम लोनशी संबंधित व्यवसाय वाढवणे आणि ग्राहकांशी उत्तम संबंध निर्माण करणे यांसारख्या कामांचा समावेश आहे. तसेच या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही.

भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

या भरतीसाठी उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची ‘एमबीए’ची पदवी असणे अनिवार्य आहे. केवळ पदवीच्या आधारावर या भरतीसाठी अर्ज करण्याची पात्रता देण्यात आलेली नाही. अनुभवाबद्दल बोलायचे तर, फ्रेशर्सही यामध्ये अर्ज करू शकतात. तथापि, सेल्स, फील्ड सेल्स, बिझनेस डेव्हलपमेंट, क्लायंट रिलेशनशिप मॅनेजमेंट आणि बोलणी करून व्यवहार पूर्ण करणे यांसारख्या कामांमध्ये १ वर्षाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाऊ शकते. उमेदवारांकडे नवीन ग्राहक जोडणे, व्यवसाय वाढवणे, ग्राहकांशी संबंध जपणे आणि संवाद कौशल्याद्वारे व्यावसायिक करार करण्याचे कौशल्य असणे आवश्यक आहे.

‘या’ शहरांतील उमेदवार करू शकतात अर्ज

LIC HFL च्या या भरतीत उमेदवारांसाठी शहराशी संबंधित एक अट ठेवण्यात आली आहे. अर्ज करणारे उमेदवार कंपनीने निर्धारित केलेल्या ३५ शहरांपैकी एका ठिकाणचे स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे. सोबतच संबंधित शहराची स्थानिक भाषा बोलण्याची आणि समजण्याची माहिती असणे गरजेचे आहे.

  • उत्तर भारत: दिल्ली, गुडगाव, गाझियाबाद, चंदीगड, डेहराडून, कानपूर, सोनीपत आणि लुधियाना
  • राजस्थान आणि मध्य भारत: जोधपूर, जयपूर, भोपाळ, इंदूर, ग्वाल्हेर (पश्चिम) आणि रायपूर
  • महाराष्ट्र: मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक आणि नागपूर
  • पूर्व भारत: पाटणा, रांची, कोलकाता, भुवनेश्वर आणि कटक
  • ईशान्य भारत: गुवाहाटी आणि त्रिपुरा
  • दक्षिण भारत: बंगळुरू, म्हैसूर, हैदराबाद, विजयवाडा, चेन्नई, कोइम्बतूर, मदुराई आणि एरनाकुलम
Neha Bora Biography: जंतर मंतर आंदोलनाचा नवा चेहरा नेहा बोरा कोण? जाणून घ्या त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी..

अर्ज कसा करावा?

1. अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम LIC HFL च्या lichousing.com या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

2. यानंतर वेबसाइटवरील करिअर सेक्शनमध्ये ‘मॅनेजमेंट ट्रेनी मार्केटिंग अँड सेल्स’ भरतीची माहिती पाहा.

3. आता भरती तपशीलात दिलेल्या अर्ज लिंकद्वारे इंटर्नशालाच्या (Internshala) अर्ज पानावर जावे.

4. अर्ज करण्यापूर्वी शैक्षणिक पात्रता, शहर आणि स्थानिक भाषेशी संबंधित पात्रता तपासून घ्या.

5. अर्ज पानावर विचारलेली वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती भरा.

6. सर्व आवश्यक तपशील तपासल्यानंतर अर्ज प्रक्रिया पूर्ण करा.

7. अर्ज सबमिट करण्यापूर्वी सर्व्हिस बाँड आणि ट्रेनिंगनंतरच्या नियुक्तीशी संबंधित अटी व शर्ती वाचून घ्या.

शेवटी सर्व माहिती पुन्हा तपासून फॉर्म सबमिट करा.

IIT Kanpur: AI च्या लाटेत २० वर्षांचा अनुभव ठरला अपुरा! IIT इंजिनिअर अमेरिकेत नोकरीसाठी भटकतोय; अशी झाली आर्थिक अवस्था

Web Title: Lic hfl recruitment mba jobs apply online management trainee sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2026 | 11:09 AM

Topics:  

  • government jobs
  • Jobs Recruitment
  • Salary

संबंधित बातम्या

IIM Nagpur Recruitment 2026: आयआयएम नागपूरमध्ये ‘ज्युनियर एक्झिक्युटिव्ह’ पदांसाठी भरती जाहीर; ७ व्या वेतन आयोगानुसार मिळणार पगार!
1

IIM Nagpur Recruitment 2026: आयआयएम नागपूरमध्ये ‘ज्युनियर एक्झिक्युटिव्ह’ पदांसाठी भरती जाहीर; ७ व्या वेतन आयोगानुसार मिळणार पगार!

Central Bank of India Recruitment 2026: सेंट्रल बँक ऑफ इंडियात भरती जाहीर; थेट मुलाखतीद्वारे निवडीची संधी
2

Central Bank of India Recruitment 2026: सेंट्रल बँक ऑफ इंडियात भरती जाहीर; थेट मुलाखतीद्वारे निवडीची संधी

Kotwal Bharti 2026: मुंबई उपनगर जिल्ह्यात कोतवाल पदांची मेगा भरती; चौथी पास तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी!
3

Kotwal Bharti 2026: मुंबई उपनगर जिल्ह्यात कोतवाल पदांची मेगा भरती; चौथी पास तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.