Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 16 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यात तब्बल 5 लाख विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत; अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू

राज्यातील १४ लाख 20 हजार ४८६ विद्यार्थी इयत्ता दहावी उत्तीर्ण झाले आहेत. तर २५ मे पर्यंत राज्यातील ९ लाख ४ हजार १८९ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा दुसरा भाग भरला होता.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 27, 2026 | 08:29 AM
राज्यात तब्बल 5 लाख विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत; अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू

राज्यात तब्बल 5 लाख विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत; अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू

Follow Us
Follow Us:

मुंबई : राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे अकरावीसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. प्रवेश अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ दिली जात असली तरी अजूनही राज्यातील ५ लाख १६ हजारांहून अधिक विद्यार्थी अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या बाहेर असल्याचे समोर येत आहे.

राज्यातील १४ लाख 20 हजार ४८६ विद्यार्थी इयत्ता दहावी उत्तीर्ण झाले आहेत. तर २५ मे पर्यंत राज्यातील ९ लाख ४ हजार १८९ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा दुसरा भाग भरला होता. त्यामुळे ५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी अद्याप अकरावी प्रवेशासाठी अर्ज भरलेला नसल्याची माहिती समोर आली आहे. राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे इयत्ता अकरावी प्रवेशासाठी केवळ ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जात आहेत.

MPSC Group C Main Exam ! गट ‘क’ मुख्य परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; १२ जुलै रोजी ६ केंद्रांवर होणार परीक्षा

शिक्षण विभागाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील १२ लाख ४९ हजार ५०६ विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. त्यातील १० लाख ८ हजार ४४७ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा पहिला भाग भरला आहे. तर ९ लाख ४ हजार १८९ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा दुसरा भाग भरला आहे. प्रवेश अर्जाचा दुसरा भाग भरलेले विद्यार्थीच ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या कॅप राऊंडमध्ये सहभागी होऊ शकतात. त्यामुळे लाखो विद्यार्थी यंदाही अकरावी प्रवेश प्रक्रियेपासून लांब राहणार असल्याचे दिसून येत आहे.

८१ हजार विद्यार्थ्यांकडून अर्जप्रक्रिया नाही

पुणे विभागातून अकरावी प्रवेशासाठी दुसरा भाग भरणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १ लाख ६८ हजार १३४ एवढी आहे. तर पुणे विभागातून इयत्ता दहावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या २ लाख ४९ हजार ७५३ एवढी आहे. त्यामुळे एकट्या पुणे विभागातील ८१ हजार ६१९ विद्यार्थ्यांनी अद्याप अकरावी प्रवेशासाठी अर्ज भरला नसल्याची माहिती समोर आली आहे.

अनेक फेऱ्या घ्याव्या लागणार

मुंबई विभागातून इयत्ता दहावीमध्ये ३ लाख ७ हजार ४८० विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. तर मुंबई विभागातून अकरावी प्रवेशासाठी केवळ २ लाख १६ हजार ९८५ विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेश अर्जाचा दुसरा भाग भरला आहे. त्यामुळे मुंबई विभागातील ९० हजार ४९५ विद्यार्थी अजूनही अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या बाहेर आहेत. दरम्यान, शिक्षण विभागाला मागील वर्षे अकरावी प्रवेशासाठी अनेक फेऱ्या घ्याव्या लागल्या होत्या. यंदाही अनेक फेऱ्या घ्याव्या लागतील, असे चित्र दिसून येत आहे.

Web Title: A 5 lakh students in the state are awaiting admission

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2026 | 08:29 AM

Topics:  

  • 11th Admission
  • Education Department
  • Online Admission

संबंधित बातम्या

राज्यातील ‘त्या’ शिक्षकांना बसणार मोठा फटका; वेतनातच केली जाणार कपात
1

राज्यातील ‘त्या’ शिक्षकांना बसणार मोठा फटका; वेतनातच केली जाणार कपात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.