Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 12 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यातील ‘त्या’ शिक्षकांना बसणार मोठा फटका; वेतनातच केली जाणार कपात

मुंबई विभागातील बंद शाळांच्या संख्येत पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यात अतिवृष्टीमुळे आपत्ती व्यवस्थापन विभागाने जाहीर केलेल्या १९० शाळांच्या सुट्टीचाही समावेशही अहवालात असल्याने आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 12, 2026 | 02:01 PM
राज्यातील 'त्या' शिक्षकांना बसणार मोठा फटका; वेतनातच केली जाणार कपात

राज्यातील 'त्या' शिक्षकांना बसणार मोठा फटका; वेतनातच केली जाणार कपात

Follow Us
Follow Us:

मुंबई : ‘शाळा बंद’ आंदोलन ९ जुलै रोजी करण्यात आले होते. या दिवशी राज्यभरातील १ हजार ४६६ शाळा बंद राहिल्या होत्या तर ८ हजार ६०० शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आंदोलनात सहभागी झाल्याची नोंद शालेय शिक्षण विभागाने एकत्र केलेल्या आकडेवारीतून समोल आली आहे. यामुळे आंदोलनात सहभागी झालेल्या शिक्षक व कर्मचाऱ्यांवर ‘नो वर्क, नो पे’नुसार एक दिवसाच्या वेतन कपातीची कारवाई होण्याची शक्यता बळावली आहे.

शालेय शिक्षण विभागाने विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी आणि मुंबईतील शिक्षण निरीक्षकांकडून आंदोलनाची सविस्तर माहिती मागवली असून, अहवालानुसार राज्यातील २४ हजार ६९३ माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांपैकी २२ हजार ९१० शाळा सुरू होत्या, तर १ हजार ४६६ शाळा बंद राहिल्या. त्याचप्रमाणे २ लाख ७२ हजार ९७ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी शाळांमध्ये उपस्थित होते. शासनाने ही आकडेवारी संकलित केल्याने आता संबंधित जिल्ह्यांतील अनुपस्थित कर्मचाऱ्यांची पडताळणी करून कारवाई केली जाणार आहे.

छोट्या गावांतील विद्यार्थ्यांची जागतिक झेप ! पोलारिसच्या 31 विद्यार्थ्यांची GSoC 2026 आणि LFX Mentorship साठी निवड

नागपूर विभागात दिसला आंदोलनाचा प्रभाव

कोल्हापूर व नागपूर विभागात आंदोलनाचा प्रभाव अधिक दिसला. तर पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर व अमरावती विभागात बहुतांश शाळा नियमित सुरू राहिल्या. मुंबई विभागातील बंद शाळांच्या संख्येत पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यात अतिवृष्टीमुळे आपत्ती व्यवस्थापन विभागाने जाहीर केलेल्या १९० शाळांच्या सुट्टीचाही समावेशही अहवालात असल्याने आहे. काही जिल्ह्यांमध्ये शिक्षकांनी शाळा सुरू ठेवत काळ्या फिती लावून आंदोलनाला प्रतिकात्मक पाठिंबा दिल्याची नोंदही अहवालात करण्यात आली आहे.

वेतन कपातीचा दिला होता इशारा

राज्यात ९ जुलै रोजी झालेल्या राज्यव्यापी ‘शाळा बंद’ आंदोलनात सहभागी झालेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर आंदोलनापूर्वीच शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी शाळा बंद ठेवल्यास संबंधित मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार कापण्याचा स्पष्ट इशारा दिला होता.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणीत महाराष्ट्र देशात अव्वल; एबीसीमध्ये तब्बल ३९.६७ लाख विद्यार्थ्यांचे क्रेडिट्स जमा

Web Title: Crisis looms for 8000 teachers salaries to be cut

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2026 | 02:01 PM

Topics:  

  • Education Department
  • Teachers Salary

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.