Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फॉरेन मिनिस्ट्रीमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी! पॉलिसी स्पेशालिस्ट व कन्सल्टन्ट पदांसाठी भरती

अर्जाच्या अंतिम तारखेपर्यंत पॉलिसी स्पेशालिस्टसाठी वयोमर्यादा ४० वर्षांपर्यंत. पॉलिसी स्पेशालिस्टला दरमहा कमाल २.२५ लाख रुपयांचा स्टायपेंड. BRICS अध्यक्षतेदरम्यान MER विभागात काम करण्याची संधी!

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Dec 27, 2025 | 01:45 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • अर्जाच्या अंतिम तारखेपर्यंत उमेदवाराचे वय ४० वर्षांपेक्षा जास्त नसावे
  • दरमहा कमाल २.२५ लाख रुपये इतका स्टायपेंड
  • ही भरती निश्चितच एक महत्त्वाची करिअर संधी
MEA Recruitment 2025: केंद्र सरकारच्या प्रतिष्ठित भारतीय विदेश मंत्रालयात नोकरी करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. मंत्रालयाच्या मल्टीलॅटरल इकॉनॉमिक रिलेशन्स (MER) विभागात विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली असून, ही नियुक्ती भारताच्या आगामी ब्रिक्स (BRICS) अध्यक्षतेदरम्यान मंत्रालयाच्या कामकाजाला सहाय्य करण्यासाठी करण्यात येणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी १६ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत अर्ज सादर करायचा आहे.

विदेश मंत्रालयाने जारी केलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार, पॉलिसी स्पेशालिस्टची २ पदे आणि कन्सल्टन्टची १० पदे भरली जाणार आहेत. निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती नवी दिल्लीतील विदेश मंत्रालयाच्या साउथ ब्लॉक व जवाहरलाल नेहरू भवन येथील कार्यालयांमध्ये होणार आहे.

शालेय शिक्षणाच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्रात व्यापक सुधारणा! शालेय शिक्षण विभागाचे नावीन्यपूर्ण उपक्रम

  • पॉलिसी स्पेशालिस्ट
या पदासाठी उमेदवारांकडे अर्थशास्त्र, आंतरराष्ट्रीय संबंध (International Relations) किंवा आंतरराष्ट्रीय कायदा (International Law) विषयात पदव्युत्तर पदवी किंवा त्याहून उच्च शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे. तसेच संयुक्त राष्ट्रांच्या एजन्सी, आंतरराष्ट्रीय संस्था किंवा भारत सरकारसोबत बहुपक्षीय (Multilateral) कामाचा किमान ३ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. अर्जाच्या अंतिम तारखेपर्यंत उमेदवाराचे वय ४० वर्षांपेक्षा जास्त नसावे.
  • कन्सल्टन्ट
या पदासाठी संबंधित विषयात मास्टर डिग्री आणि किमान १ वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. कन्सल्टन्ट पदासाठी उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ३५ वर्षे निश्चित करण्यात आली आहे.

पॉलिसी स्पेशालिस्ट पदावर निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा कमाल २.२५ लाख रुपये इतका स्टायपेंड दिला जाणार आहे. तर कन्सल्टन्ट पदासाठी वार्षिक कमाल १० लाख रुपयांचे पॅकेज मिळणार आहे. ही सर्व नियुक्ती सुरुवातीला एका वर्षाच्या करारावर असणार असून, कामगिरी आणि गरजेनुसार कराराची मुदत वाढवली जाऊ शकते.

निवड झालेल्या उमेदवारांना ब्रिक्सच्या विविध वर्किंग ग्रुप्समध्ये जसे की व्यापार, वित्त, ऊर्जा, कृषी आणि आरोग्य क्षेत्र काम करावे लागणार आहे. तसेच ब्रिक्स देशांमधील व आंतरराष्ट्रीय बैठका, चर्चा आणि वाटाघाटींमध्ये मंत्रालयाला सहाय्य करणे, निष्कर्षात्मक दस्तऐवजांचा मसुदा तयार करणे ही जबाबदारी असणार आहे. कन्सल्टन्ट्सना सादरीकरणे, पोजिशन पेपर्स, मीडिया संदर्भातील सामग्री तयार करणे, विविध देशांच्या धोरणांवर लक्ष ठेवणे आणि मंत्रालये व थिंक टँक्सशी समन्वय साधणे यासारखी कामे करावी लागतील.

Infosys Salary Package: इन्फोसिसचा फ्रेशर्ससाठी मोठा धमाका! पगार केला थेट ‘इतक्या’ लाखांपर्यंत

पात्र उमेदवारांनी विदेश मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटवरून निर्धारित अर्ज नमुना डाउनलोड करावा. भरलेला अर्ज रजिस्टर्ड पोस्टद्वारे जवाहरलाल नेहरू भवन येथील अवर सचिव (PF & PG) यांच्या पत्त्यावर पाठवता येईल. तसेच अर्ज aopfsec@mea.gov.in या ई-मेल आयडीवरही पाठवू शकता. शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांना मुलाखत किंवा लेखी परीक्षेबाबतची माहिती ई-मेलद्वारे कळवण्यात येणार आहे. सरकारी धोरण, आंतरराष्ट्रीय संबंध आणि जागतिक व्यासपीठावर काम करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी ही भरती निश्चितच एक महत्त्वाची करिअर संधी ठरणार आहे.

Web Title: A golden opportunity to work at the foreign ministry

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 27, 2025 | 01:45 PM

Topics:  

  • Career
  • Recruitment News

संबंधित बातम्या

ITI मध्ये भरती! आजच अर्ज करा जाऊन साईटवरती; मिळवा ६० हजारापर्यंत पगार
1

ITI मध्ये भरती! आजच अर्ज करा जाऊन साईटवरती; मिळवा ६० हजारापर्यंत पगार

महाराष्ट्रात नवीन शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी! उच्च व तंत्रशिक्षणात परिवर्तनशील उपक्रम
2

महाराष्ट्रात नवीन शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी! उच्च व तंत्रशिक्षणात परिवर्तनशील उपक्रम

यंदाचे वर्ष रोजगार बाजारासाठी निर्णायक!  तरुणाईची वाढती भूमिका आली दिसून
3

यंदाचे वर्ष रोजगार बाजारासाठी निर्णायक! तरुणाईची वाढती भूमिका आली दिसून

रायगड मिलिटरी स्कूलच्या सहकार्याने आयोजन; ताकद आणि आत्मविश्वासाचे प्रभावी प्रदर्शन
4

रायगड मिलिटरी स्कूलच्या सहकार्याने आयोजन; ताकद आणि आत्मविश्वासाचे प्रभावी प्रदर्शन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.