Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यात नाशिक येथे आदिवासी विद्यापीठ स्थापन केले जाणार- राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

राज्यातील आदिवासी भागातील सामाजिक विकासासाठी विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे. ज्यामध्ये 80 टक्के आदिवासी, तर 20 टक्के अन्य विद्यार्थ्यांचा समावेश असणार आहे. अशी माहिती राज्यपाल राधाकृष्णन यांनी दिली. राज्याचे राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी आज सकाळी नाशिक येथील  शासकीय विश्रामगृह येथे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींशी संवाद साधला.

  • By नारायण परब
Updated On: Sep 09, 2024 | 07:15 PM
फोटो सौजन्य- सोशल मीडिया

फोटो सौजन्य- सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:

महाराष्ट्रामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांकरिता विद्यापीठ सुरु केले जाणार आहे. ज्यातून आदिवासी भागातील सामाजिक विकास साध्य करणे हे उद्दिष्ट असणार आहे. ही माहिती राज्यपाल राधाकृष्णन यांनी दिली. राज्याचे राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी आज सकाळी नाशिक येथील  शासकीय विश्रामगृह येथे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, आदिवासी बांधवांसाठी नाशिक येथे आदिवासी विद्यापीठ सुरू करण्यात येईल. त्यात 80 टक्के आदिवासी, तर 20 टक्के अन्य विद्यार्थ्यांचा समावेश राहील.  यावेळी नाशिकचे पालकमंत्री दादाजी भुसे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, खासदार भास्कर भगरे, आमदार किशोर दराडे, आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आमदार नितीन पवार, आमदार राहुल ढिकले, आमदार हिरामण खोसकर आदी उपस्थित होते.

आदिवासी भागातील सामाजिक विकासासाठी विद्यापीठ स्थापन करण्यात येईल

राज्यपाल श्री. राधाकृष्णन म्हणाले की, आदिवासी बांधवांसाठी शासनाच्या विविध योजना आहेत. त्या माध्यमातून विकास कामे सुरू आहेत. या आदिवासी भागातील सामाजिक विकासासाठी विद्यापीठ स्थापन करण्यात येईल. या विद्यापीठात अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान आदी विषयांच्या सर्वोत्तम सुविधा असतील. नाशिक औद्योगिकदृष्ट्या विकसित होत असल्याने या विद्यापीठातील विद्यार्थांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील.

आदिवासी आणि डोंगरी भागातील विविध प्रश्नांची आपल्याला जाणीव

आदिवासी आणि डोंगरी भागातील विविध प्रश्नांची आपल्याला जाणीव असल्याचे नमूद करून राज्यपाल पुढे म्हणाले की, आदिवासी भागातील आरोग्य आणि शिक्षण व्यवस्था सक्षम करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील. वैद्यकीय अधिकारी यांची रिक्त पदे भरतीसाठी निर्देश देण्यात येतील. विद्यापीठातील प्राध्यापक भरती महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे करण्याच्या सूचना देण्यात येतील, यासंदर्भात विद्यापीठांच्या कुलगुरूंशी चर्चा करण्यात आली आहे. राजभवन येथे आदिवासी कक्ष स्थापन करण्यात आला आहे. आदिवासी बांधवांचे प्रश्न जाणून घेत ते सोडविण्यासाठी आदिवासी लोकप्रतिनिधी यांची राजभवन येथे बैठक घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

पालकमंत्री दादा भुसे यांनी नार – पार प्रकल्प मंजूर केल्याबद्दल राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांचे आभार मानले. जिल्ह्यातील विविध प्रश्न आणि विकास योजनांबाबत विधानसभा उपाध्यक्ष श्री. झिरवाळ, खासदार श्री. भगरे, आमदार श्री. दराडे, आमदार श्री. इस्माईल, आमदार श्रीमती फरांदे, श्रीमती हिरे, आमदार श्री. खोसकर, आमदार श्री. पवार यांनी राज्यपालांना माहिती दिली.

Web Title: A tribal university will be established in nashik governor c p radhakrishnan informed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2024 | 07:15 PM

Topics:  

  • maharashtra
  • Nashik

संबंधित बातम्या

इंडियन नेव्हीची 1600 किमी बाईक मोहीम; टीव्हीएस रोनिनवरून करणार महाराष्ट्रातील किल्ल्यांची सफर!
1

इंडियन नेव्हीची 1600 किमी बाईक मोहीम; टीव्हीएस रोनिनवरून करणार महाराष्ट्रातील किल्ल्यांची सफर!

Tukaram Mundhe: हॉटेल-दूध डेअरीनंतर FDA च्या रडारवर बेबी फूड; नियम मोडणाऱ्या उत्पादकांवर कारवाईचा इशारा
2

Tukaram Mundhe: हॉटेल-दूध डेअरीनंतर FDA च्या रडारवर बेबी फूड; नियम मोडणाऱ्या उत्पादकांवर कारवाईचा इशारा

Novitas Solar चा महाराष्ट्रात मोठा धमाका! 5 वर्षांत 10000 कोटींची गुंतवणूक; नेमका काय आहे मेगाप्लॅन?
3

Novitas Solar चा महाराष्ट्रात मोठा धमाका! 5 वर्षांत 10000 कोटींची गुंतवणूक; नेमका काय आहे मेगाप्लॅन?

Drought Affected: टीकेनंतर दुष्काळग्रस्तांसाठी एक कोटी; ‘मदत की डॅमेज कंट्रोल?’ वाढदिवसावरील टीकेनंतर पालिकेची तिजोरी उघडली
4

Drought Affected: टीकेनंतर दुष्काळग्रस्तांसाठी एक कोटी; ‘मदत की डॅमेज कंट्रोल?’ वाढदिवसावरील टीकेनंतर पालिकेची तिजोरी उघडली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.