Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबई विद्यापीठात पाली आणि बौद्ध अध्ययन अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू; ‘पीएम-उषा’ योजनेअंतर्गत नवे कोर्सेस

मुंबई विद्यापीठाच्या पाली विभागामार्फत शैक्षणिक वर्ष २०२६–२७ साठी पदवी, पदव्युत्तर, डिप्लोमा आणि सर्टिफिकेट कोर्सेसची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. पीएम-उषा अंतर्गत ठाणे आणि कल्याण येथेही नवीन कोर्सेस उपलब्ध आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 25, 2026 | 08:49 PM
मुंबई विद्यापीठात पाली आणि बौद्ध अध्ययन अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू (Photo Credit- X)

मुंबई विद्यापीठात पाली आणि बौद्ध अध्ययन अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • मुंबई विद्यापीठात पाली आणि बौद्ध अध्ययन अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू
  • ‘पीएम-उषा’ योजनेअंतर्गत नवे कोर्सेस
  • पाहा संपूर्ण यादी
मुंबई, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क/नीता परब: मुंबई विद्यापीठाच्या पाली विभागामार्फत शैक्षणिक वर्ष २०२६–२७ साठी विविध पदवी, पदव्युत्तर, एकात्मिक, पदविका तसेच प्रमाणपत्र अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. पाली भाषा, बौद्ध तत्त्वज्ञान, भारतीय संस्कृती, विपश्यना, बौद्ध कला आणि पर्यटन क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

पाली विभागामार्फत पीएच.डी., एम.ए. (पाली), एम.ए. (पाली व बौद्ध अध्ययन) तसेच बी.ए.-एम.ए. पाच वर्षीय एकात्मिक पाली अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याशिवाय विपश्यना भावना, परियत्ती व पटिपत्ती पाली साहित्य, पाली व भारतातील बौद्ध अध्ययन, पाली भाषा व बौद्ध कला तसेच भारतातील बौद्ध तीर्थस्थळे आणि पर्यटन या विषयांतील एक वर्षीय पदविका अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी खुले करण्यात आले आहेत.

तसेच पाली भाषा व साहित्य, पाली भाषा व बुद्धांचे उपदेश आणि पाली व भारताची बौद्ध संस्कृती या विषयांतील प्रमाणपत्र अभ्यासक्रमांनाही विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळतो. विशेष म्हणजे, काही अभ्यासक्रम पीएम-उषा योजनेअंतर्गत सुरू करण्यात आले असून ठाणे उपपरिसर,  स्कूल ऑफ इंजिनिअरींग अँड अप्लाईड सायन्सेस कल्याण येथे सुरु करण्यात आले आहेत. प्रामुख्याने या अभ्यासक्रमांच्या माध्यमातून कौशल्य विकास व क्षमता वृद्धीवर भर देण्यात आला आहे. भारतीय ज्ञान प्रणाली संकल्पनेशी जोडलेले ई-अध्ययन साहित्य विकसित करण्याचाही उपक्रम विभागामार्फत राबविण्यात येत आहे.

JEE Advanced Answer Key: जेईई ॲडव्हान्स्ड २०२६ ची आन्सर की जाहीर; जाणून घ्या उत्तरतालिका डाऊनलोडची सोपी पद्धत!

पाली विभागातील अभ्यासक्रमांमुळे विद्यार्थ्यांना बौद्ध विचारसरणी, संशोधन, सांस्कृतिक अध्ययन, पर्यटन आणि सामाजिक मूल्यांचा सखोल अभ्यास करण्याची संधी मिळणार असून शैक्षणिक व करिअरच्या विविध वाटा खुल्या होणार आहेत. प्रवेशास इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी मुंबई विद्यापीठाच्या पाली विभागाशी संपर्क साधावा किंवा विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पाली विभागामार्फत राबविण्यात येत असलेले अभ्यासक्रम

१. संशोधन व पदव्युत्तर अभ्यासक्रम 

  • पीएच.डी. (Ph.D. in Pali)
  • एम.ए. – पाली (M.A. Pali)
  • एम.ए. – पाली व बौद्ध अध्ययन (M.A. Pali and Buddhist Studies)
  • बी.ए.-एम.ए. पाच वर्षीय एकात्मिक पाली अभ्यासक्रम (5-Year Integrated Course)

२. एक वर्षीय पदविका अभ्यासक्रम 

  • विपश्यना भावना : पाली साहित्याच्या दृष्टीने
  • परियत्ती व पटिपत्ती पाली साहित्य
  • पाली व भारतातील बौद्ध अध्ययन
  • पाली भाषा व बौद्ध कला
  • भारतातील बौद्ध तीर्थस्थळे आणि पर्यटन (Buddhist Tourism)

३. एक वर्षीय प्रमाणपत्र अभ्यासक्रम 

  • पाली भाषा व साहित्य
  • पाली भाषा व बुद्धांचे उपदेश
  • पाली व भारताची बौद्ध संस्कृती

 UGC NET Record: आयआयटी कानपूरचे माजी विद्यार्थी बनले ‘UGC NET’ किंग; नेटमधला ‘हा’ नवा रेकॉर्ड पहा एका क्लिकवर..

Web Title: Admission process for pali and buddhist studies courses begins at mumbai university

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2026 | 08:20 PM

Topics:  

  • Career News
  • mumbai univercity

संबंधित बातम्या

बारामतीची श्रावणी कुदळे नीट परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम, देशात मुलींमध्ये देखील अव्वल
1

बारामतीची श्रावणी कुदळे नीट परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम, देशात मुलींमध्ये देखील अव्वल

बदलत्या जगात सक्षम नेतृत्व घडवण्यासाठी वीस्कूल सज्ज! नव्या विद्यार्थ्यांसाठी ‘नवारंभ २०२६’चे दिमाखात आयोजन
2

बदलत्या जगात सक्षम नेतृत्व घडवण्यासाठी वीस्कूल सज्ज! नव्या विद्यार्थ्यांसाठी ‘नवारंभ २०२६’चे दिमाखात आयोजन

SPJIMR PGPDM बॅच २८ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू; सुधारित अभ्यासक्रमासह सामाजिक नेतृत्व घडविण्यावर भर
3

SPJIMR PGPDM बॅच २८ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू; सुधारित अभ्यासक्रमासह सामाजिक नेतृत्व घडविण्यावर भर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.