फोटो सौजन्य- सोशल मीडिया
how to clear UGC NET in 10 different subjects : भारतीय शिक्षण क्षेत्रातून एक अविश्वसनीय आणि अलौकिक कामगिरी समोर आली आहे. डॉ.अमित कुमार निरंजन यांनी ‘युजीसी नेट’ (UGC NET) परीक्षा तब्बल १० व्यांदा यशस्वीपणे उत्तीर्ण केली आहे. यंदा ‘इंडियन कल्चर’ (भारतीय संस्कृती) या विषयात नेट परीक्षा पास केली आहे. त्यांची ही कामगिरी विशेष आहे, कारण त्यांनी वेगवेगळ्या १० विषयात नेट परीक्षा उत्तीर्ण होऊन एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
सामान्यत: कोणताही उमेद्वार एक किंवा दोन विषयांमध्येच नेट परीक्षा देतात. परंतु, डॉ.निरंजन यांनी वेगवेगळया विषयांमध्ये नेट परीक्षा देऊन त्यामध्ये दैदिप्यमान यश प्राप्त केले आहे. त्यांनी अर्थशास्त्र, वाणिज्य, व्यवस्थापन, शिक्षणशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, प्रौढ शिक्षण, पर्यटन आणि व्यवस्थापन, इंडियन नॉलेज सिस्टम, इंडियन कल्चर या विषयांमध्ये नेट परीक्षा पास केली आहे. त्यामुळे त्यांच्या या अफाट शैक्षणिक क्षमतेला एक उपलब्धी म्हणून पाहिले जात आहे.
सामान्यतः उमेदवार एका किंवा दोन विषयांमध्येच ‘नेट’ परीक्षा देतात, परंतु डॉ. निरंजन यांनी अनेक वेगवेगळ्या विषयांमध्ये हे दैदीप्यमान यश संपादन करून आपली अफाट शैक्षणिक क्षमता सिद्ध केली आहे. आता शिक्षण क्षेत्रात याकडे एक मोठी उपलब्धी म्हणून पाहिले जात आहे.
CBSE Class 12th: निकालात घोळ की तांत्रिक बिघाड? सीबीएसईच्या निकालावर विद्यार्थी-पालक का संतापले?
डॉ अमित कुमार निरंजन हे देशातील नामांकित संस्था ‘आयआयटी कानपूर’चे (IIT Kanpur) माजी विद्यार्थी आहेत. त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी अत्यंत मजबूत आहे. ते अर्थतज्ञ असून शिक्षण क्षेत्राशी संबंधित विषयांवर त्यांची सखोल पकड आहे. त्यांची ओळख फक्त शिक्षण क्षेत्रापर्यंत मर्यादित नसून विविध विषयांचे गाढे अभ्यासक अशी आहे.
डॉ निरंजन यांनी आतापर्यंत ७० हून अधिक पुस्तकांचे लेखन केले असून त्यांचे ‘UGC NET Paper 1 Ready Reckoner’ हे पुस्तक देशभरातील नेट परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेद्वारांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. याशिवाय ते विविध वृत्तवाहिन्यांवर (Media Channels) पॅनेलिस्ट म्हणूनही सहभागी होतात.
ते शिक्षक प्रशिक्षण, करिअर समुपदेशन (करिअर कौन्सिलिंग) अशा विविध विषयांवर विद्यार्थ्याना मार्गदर्शन देतात. डॉ अमित कुमार निरंजन यांचे हे यश म्हणजे शिक्षण क्षेत्रातील सातत्यपूर्ण अभ्यास करणाऱ्या उमेद्वारांसाठी एक उत्तम उदाहरण आहे.






