Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ABVP Campaign: मुंबई विद्यापीठात ABVP चे ‘अराजकता रोको – लोकतंत्र बचाओ’ अभियान; विद्यार्थ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद

ABVP Campaign: मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये ABVP द्वारे भव्य स्वाक्षरी अभियान आणि निदर्शने करण्यात आली. लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी सजग राहण्याचे आवाहन करण्यात आले.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Oct 17, 2026 | 10:37 AM
Image

Image

Follow Us
Follow Us:

ABVP Campaign: नीता परब/ देशातील लोकशाही व्यवस्था, भारतीय संविधानाची मूल्ये आणि राष्ट्रीय एकात्मता यांचे रक्षण करण्याच्या महत्त्वपूर्ण उद्देशाने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदने (अभाविप) मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस येथील मुख्य प्रवेशद्वाराजवळ ‘अराजकता रोको – लोकतंत्र बचाओ! या घोषवाक्याखाली भव्य स्वाक्षरी अभियान व शांततापूर्ण निदर्शने शुक्रवारी करण्यात आली.

सध्या देशात काही प्रवृत्तींकडून जाणीवपूर्वक अराजकता निर्माण करण्याचे प्रयत्न होत असून त्यांना मिळणारे संभाव्य बाह्य समर्थन अत्यंत चिंताजनक आहे. भारतविरोधी शक्ती विविध संघटनांच्या माध्यमातून देशात अस्थिरता पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा गंभीर आरोप आयोजकांनी केला आहे.
या पार्श्वभूमीवर, राष्ट्रीय हित, लोकशाही मूल्ये आणि देशाची एकात्मता अबाधित राखण्यासाठी जनतेमध्ये जनजागृती करणे अत्यंत गरजेचे असल्याचे अभाविपने म्हटले आहे.

समाजातील सर्व घटकांनी सजग राहण्याची गरज

लोकशाही ही केवळ एक शासनप्रणाली नसून स्वातंत्र्य, समानता, न्याय आणि बंधुता या मूल्यांवर आधारित आपल्या संविधानाचा आत्मा आहे. लोकशाही संस्थांवरील जनतेचा विश्वास कायम राहावा, कायद्याचे राज्य चोखपणे चालावे आणि कोणत्याही हिंसक किंवा बेकायदेशीर मार्गांना थारा मिळू नये, यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन सजग राहण्याची गरज आहे, यावर या अभियानादरम्यान भर देण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.

Top IIIT Colleges : भारतातील ‘या’ ५ टॉप IIIT महाविद्यालयांमध्ये कसा मिळवाल प्रवेश? जाणून घ्या

याच भूमिकेतून शुक्रवारी राबविण्यात आलेल्या या स्वाक्षरी अभियानाला विद्यार्थी, तरुण वर्ग आणि जागरूक नागरिकांचा व्यापक प्रतिसाद लाभला असल्याचे अभाविपने म्हटले आहे.
लोकशाहीच्या समर्थनात नागरिकांनी मोठ्या संख्येने आपली स्वाक्षरी नोंदवली. तसेच, शांततापूर्ण निदर्शनांच्या माध्यमातून लोकशाहीचे संरक्षण, संविधानाचा सन्मान आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश जनमानसात पोहोचविण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.

Jailer 2 Fame Rajinikanth Education: १० वीत नापास ते CBSE च्या पुस्तकातील धडा! ‘Jailer 2’ फेम सुपरस्टार रजनीकांत किती शिकलेत?

युवकांनी लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी पुढे यावे

देशातील सर्व विद्यार्थी व युवकांनी लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी नेहमीच पुढे यावे, संविधानिक मार्गाने आपली भूमिका स्पष्ट करावी आणि एका सशक्त, शांततापूर्ण व न्याय्य समाजाच्या निर्मितीसाठी सदैव कटिबद्ध राहावे, असे आवाहन या अभियानानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे करण्यात आले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ABVP कडून मुंबई विद्यापीठात कोणते अभियान राबवण्यात आले?

    Ans: ABVP च्या वतीने मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये ‘अराजकता रोको – लोकतंत्र बचाओ!’ या घोषवाक्याखाली स्वाक्षरी अभियान व शांततापूर्ण निदर्शने करण्यात आली.

  • Que: हे आंदोलन कुठे पार पडले?

    Ans: हे आंदोलन मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस येथील मुख्य प्रवेशद्वाराजवळ पार पडले.

Web Title: Abvp campaign mumbai university kalina campus loktantra bachao sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2026 | 09:23 AM

Topics:  

  • ABVP
  • education
  • mumbai univercity

संबंधित बातम्या

Imran Khan Education: इम्रान खानला भारत सोडण्याची नोटीस! नेमकं किती शिकला आहे ‘हा’ अभिनेता? जाणून घ्या
1

Imran Khan Education: इम्रान खानला भारत सोडण्याची नोटीस! नेमकं किती शिकला आहे ‘हा’ अभिनेता? जाणून घ्या

Top IIIT Colleges : भारतातील ‘या’ ५ टॉप IIIT महाविद्यालयांमध्ये कसा मिळवाल प्रवेश? जाणून घ्या
2

Top IIIT Colleges : भारतातील ‘या’ ५ टॉप IIIT महाविद्यालयांमध्ये कसा मिळवाल प्रवेश? जाणून घ्या

Jailer 2 Fame Rajinikanth Education: १० वीत नापास ते CBSE च्या पुस्तकातील धडा! ‘Jailer 2’ फेम सुपरस्टार रजनीकांत किती शिकलेत?
3

Jailer 2 Fame Rajinikanth Education: १० वीत नापास ते CBSE च्या पुस्तकातील धडा! ‘Jailer 2’ फेम सुपरस्टार रजनीकांत किती शिकलेत?

Neha Bora Biography: जंतर मंतर आंदोलनाचा नवा चेहरा नेहा बोरा कोण? जाणून घ्या त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी..
4

Neha Bora Biography: जंतर मंतर आंदोलनाचा नवा चेहरा नेहा बोरा कोण? जाणून घ्या त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.