Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

AI in Education: एआयवर अवलंबून राहणे पडेल महागात; IIT खडकपूरच्या प्राध्यापकांची विद्यार्थ्यांना महत्त्वाची चेतावणी

AI in Education: आयआयटी खडकपूरच्या एका प्राध्यापकाने असा इशारा दिला आहे की, जर विद्यार्थी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी पूर्णपणे एआयच्या भरवशावर राहिले, तर ते प्रत्यक्ष शिकण्याच्या प्रक्रियेपासून दूर जाऊ शकतात.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Oct 12, 2026 | 12:12 PM
Image

Image

Follow Us
Follow Us:

AI in Education: आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआयचा (AI) वापर आज अभ्यास, असाइनमेंट आणि संशोधनामध्ये झपाट्याने वाढला आहे. विद्यार्थी याच्या मदतीने अवघ्या काही सेकंदात प्रश्नांची उत्तरे आणि असाइनमेंट तयार करू शकतात. परंतु, आयआयटी खडकपूरच्या एका प्राध्यापकाने असा इशारा दिला आहे की, जर विद्यार्थी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी पूर्णपणे एआयच्या भरवशावर राहिले, तर ते प्रत्यक्ष शिकण्याच्या प्रक्रियेपासून दूर जाऊ शकतात. त्यांचे म्हणणे आहे की, एआयचा वापर केवळ तयार उत्तरे मिळवण्यासाठी नव्हे, तर विषय समजून घेण्यासाठी आणि स्वतः समस्या सोडवण्याची क्षमता विकसित करण्यासाठी केला पाहिजे.

एआय विभागाचे प्राध्यापक प्लाबन कुमार भौमिक

ही चेतावणी आयआयटी खडकपूरच्या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) विभागाचे प्राध्यापक प्लाबन कुमार भौमिक यांनी दिली आहे. ते नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडियाचे (NDLI) प्रमुख संशोधक देखील आहेत. त्यांनी एआयच्या मदतीने अभ्यास करण्याच्या दोन पद्धतींमधील फरक स्पष्ट केला आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करताना प्राध्यापक प्लाबन कुमार भौमिक यांनी सांगितले की, एआय विद्यार्थ्यांची विचार करण्याची क्षमता प्रभावित करू शकते तसेच ती विकसित करण्यातही मदत करू शकते. परंतु, हे विद्यार्थी याचा वापर कसा करतात यावर अवलंबून असते. प्राध्यापक भौमिक यांनी ‘कॉग्निटिव्ह ऑफलोडिंग’ आणि ‘कॉग्निटिव्ह स्कॅफोल्डिंग’ या संकल्पनांच्या माध्यमातून हा फरक समजावून सांगितला आहे.

कॉग्निटिव्ह ऑफलोडिंग म्हणजे काय?

जेव्हा विद्यार्थी एखादा प्रश्न स्वतः समजून घेण्याचा आणि सोडवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी विचार करण्याची संपूर्ण जबाबदारी एआयवर सोपवतात, तेव्हा त्याला कॉग्निटिव्ह ऑफलोडिंग म्हणतात. उदाहरणार्थ, जर एखाद्या विद्यार्थ्याने विषयाचे असाइनमेंट पूर्ण करण्यासाठी एआय कडून थेट संपूर्ण उत्तर तयार करून घेतले आणि ते समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही, तर त्याचे असाइनमेंट तर पूर्ण होईल, परंतु आवश्यक ते ज्ञान मिळवण्यापासून तो चूकेल.

प्राध्यापकांच्या मते, एआय वापरणे चुकीचे नाही, तर विद्यार्थी त्याचा वापर कसा करत आहेत हे महत्त्वाचे आहे. जर विद्यार्थ्यांनी स्वतः प्रश्न समजून घेण्याऐवजी एआय कडून सरळ उत्तरे घेतली, तर ते विषयाची सखोल माहिती मिळवण्यापासून आणि आपली विचारशक्ती विकसित करण्यापासून वंचिक राहू शकतात.

Kotwal Recruitment 2026: रायगडमधील मुरुड तालुक्यात कोतवाल पदांची भरती; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

कॉग्निटिव्ह स्कैफोल्डिंग कशी मदत करेल?

कॉग्निटिव्ह स्कैफोल्डिंगचा अर्थ विद्यार्थ्यांना शिकताना अशा प्रकारे मदत करणे आहे, जेणेकरून ते हळूहळू स्वतः प्रश्न समजून घेणे आणि त्यांची उत्तरे शोधणे शिकू शकतील. यामध्ये एआय सरळ उत्तरे देण्याऐवजी विद्यार्थ्यांना संकेत देतो आणि योग्य दिशेने विचार करण्यास मदत करतो. प्राध्यापक भौमिक यांच्या मते, एआयच्या मदतीने विद्यार्थी प्रश्न समजावून घेऊ शकतात आणि त्याचे उत्तर शोधण्याचे मार्ग शिकू शकतात, परंतु उत्तर शोधण्याचा प्रयत्न त्यांनी स्वतः केला पाहिजे. यामुळे त्यांची समज वाढते आणि पुढे जाऊन ते कठीण प्रश्न देखील स्वतःच्या दमावर सोडवण्यास सक्षम बनतात.

फर्मी एआय ट्यूटर अभ्यासात कशी मदत करेल?

प्राध्यापक भौमिक यांच्या मते, एआय विद्यार्थ्यांना सरळ उत्तरे देण्याऐवजी जेव्हा प्रश्न समजून घेण्याचा आणि सोडवण्याचा मार्ग दाखवतो, तेव्हा ते त्यांना उत्तम प्रकारे मदत करू शकते. त्यासाठी ‘फर्मी एआय ट्यूटर’ चा वापर केला जाऊ शकतो, असे ते सांगतात. हे टूल विद्यार्थ्यांना सरळ उत्तरे देण्याऐवजी स्वतः प्रश्न समजून घेण्यात आणि त्यांचे उत्तर शोधण्यात मदत करते. हे विद्यार्थ्यांना विचार करण्यासाठी, वेगवेगळ्या मार्गांनी उत्तरे शोधण्यासाठी आणि गरज भासल्यास योग्य दिशेने मार्गदर्शन करते.

प्राध्यापक भौमिक यांच्या मते, हे टूल फक्त उत्तर मिळवण्याचे साधन नाही, तर एका सहकाऱ्यासारखे काम करते जे विद्यार्थ्यांना शिकण्यात आणि स्वतःच्या समस्या स्वतः सोडवण्यात मदत करते. ‘फर्मी एआय ट्यूटर’ नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया (NDLI) च्या माध्यमातून विनामूल्य उपलब्ध आहे.

Scholarship Renewal 2026: विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! स्कॉलरशिप रिन्यूअलसाठी अर्ज आता ‘या’ तारखेपर्यंत करता येणार

अभ्यासात एआयचा योग्य वापर गरजेचा

शैक्षणिक क्षेत्रात एआयचा वापर सातत्याने वाढत आहे. अशा वेळी विद्यार्थ्यांनी याचा वापर फक्त असाइनमेंट पूर्ण करण्यासाठी न करता, विषय समजून घेण्यासाठी आणि नवीन गोष्टी शिकण्यासाठी करणे गरजेचे आहे. एआयची मदत तेव्हाच फायदेशीर ठरेल जेव्हा विद्यार्थी स्वतः विचार करतील आणि प्रश्नांची उत्तरे समजून घेण्याचा प्रयत्न करतील. एआयचा योग्य वापर केल्यामुळे विद्यार्थ्यांची विचार करण्याची, तर्क करण्याची आणि समस्या स्वतः सोडवण्याची क्षमता अधिक सुधारू शकते.

Web Title: Ai in education iit kgp professor warning cognitive offloading sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2026 | 12:12 PM

Topics:  

  • ai
  • IIT
  • Professor Jobs
  • warning signs

संबंधित बातम्या

Impact of AI on Education: एआयचा अभ्यासात केला जाणारा वापर फायद्याचा की तोट्याचा? जाणून घ्या
1

Impact of AI on Education: एआयचा अभ्यासात केला जाणारा वापर फायद्याचा की तोट्याचा? जाणून घ्या

byteXL च्या विकासाला मिळाले बूस्ट; नव्या फंडिंग फेरीत ‘एवढ्या’ दशलक्ष डॉलर्सची कमाई
2

byteXL च्या विकासाला मिळाले बूस्ट; नव्या फंडिंग फेरीत ‘एवढ्या’ दशलक्ष डॉलर्सची कमाई

दुग्ध व्यवसाय क्षेत्रासाठी Findability Sciencesचे Lacta Insight लाँच; दुधाचे नुकसान टळणार आता बचत वाढणार
3

दुग्ध व्यवसाय क्षेत्रासाठी Findability Sciencesचे Lacta Insight लाँच; दुधाचे नुकसान टळणार आता बचत वाढणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.