
byteXL च्या विकासाला मिळाले बूस्ट (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
आजकाल इंजिनिअरिंगची डिग्री घेतात. परंतू हवे असणारे स्किल्स नसतात, कॉलेजमध्ये जे शिकवलेल्या गोष्टी आणि कंपनीला हव्या असणाऱ्या गोष्टीमध्ये खूप मोठी तफावत असते. हिच तफावत मिटवण्यासाठी byteXL काम करत आहे. byteXL हे कॉलेजसोबत मिळून काम करते. ते त्यांच्या स्वतःच्या टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्मच्या मदतीने विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षापासूनच इंडस्ट्रीला हवे असलेले शिक्षण देतात. तसेच यासाठी वेगळा क्लास लावण्याची गरज नाही. या चार वर्षाच्या डिग्रीचा एक भाग आहे. यामध्ये कोडिंग coding, AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नवीन टेक्नॉलॉजीचे New technology शिक्षण दिले जाते.
या गुंतवणुकीवर बोलताना Kalaari Capital चे पार्टनर संपत पी. म्हणाले, “आम्ही byteXL मध्ये दुसऱ्यांदा गुंतवणूक करत आहोत. यावरूनच आमचा त्यांच्या टीमवर किती विश्वास आहे हे समजते.. त्यांची काम करण्याची पद्धत खूप वेगळी आहे. ते स्वतःचं टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म वापरून कॉलेजच्या सिस्टममध्ये कोणताही अडथळा न आणता काम करतात. त्यांनी टेक्नॉलॉजी शिक्षणाला एक्स्ट्रा कोर्स न ठेवता डिग्रीचाच भाग बनवलंय, हीच त्यांची सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे.”Elevar Equity आणि Dell Foundation ने पण सांगितले की, भारतात AI आणि टेक्नॉलॉजी स्किल्सची गरज खूप वाढत आहे आणि byteXL ती गरज योग्य पद्धतीने पूर्ण करत आहे.
कंपनीने सांगितले की या 9 मिलियन डॉलर्सचा वापर तीन मुख्य गोष्टींसाठी होणार आहे.
थोडक्यात सांगायचं तर इंजिनिअरिंग शिकणाऱ्या मुलांना फक्त डिग्री नाही तर चांगली नोकरी मिळावी हाच byteXL चा उद्देश आहे. आणि या नवीन फंडिंगमुळे कंपनीला आता आपलं हे स्वप्न आणखी वेगाने पूर्ण करता येणार आहे.