Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

AISHE Report : विज्ञानाच्या मैदानात मुलींनी मुलांना मागे टाकलं! कॉलेज प्रवेशात मुलं मागे का पडतायत? जाणून घ्या एका क्लिकवर..

AISHE Report 2023-24: भारतातील उच्च शिक्षणाचा चेहरामोहरा खरोखरच बदलतोय का? महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये सलग सातव्या वर्षी मुलींनी मुलांपेक्षा जास्त प्रवेश घेतले आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञान (STEM) क्षेत्रातील मुलींच्या या ऐतिहासिक झेपबद्दल सरकारचा ताजा AISHE रिपोर्ट काय सांगतो? जाणून घ्या.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 10, 2026 | 10:22 AM
मुली

मुली

Follow Us
Follow Us:

AISHE Report 2023-24: भारतातील उच्च शिक्षणाचे चित्र वेगाने बदलत असून, महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्याच्या बाबतीत मुलींनी आपली आघाडी कायम ठेवली आहे. अखिल भारतीय उच्च शिक्षा सर्वेक्षण 2023-24 च्या ताज्या आकडेवारीनुसार, उच्च शिक्षणात विद्यार्थिनींची नावनोंदणी मुलांपेक्षा जास्त असण्याचे हे सलग सातवे वर्ष आहे. विशेष म्हणजे, विज्ञान सारख्या प्रमुख स्टेम (STEM) विषयांमध्येही मुलींची संख्या मुलांपेक्षा अधिक नोंदवली गेली आहे.

शैक्षणिक प्रगतीत मुलांपेक्षा मुली सरस

अहवालानुसार, वर्ष २०२३-२४ मध्ये उच्च शिक्षणात महिलांचा सकल नामांकन गुणोत्तर ३१.२ टक्के, तर पुरुषांचा २८.९ टक्के नोंदवला गेला. यामुळे जेंडर पॅरिटी इंडेक्स (GPI) १.०८ वर पोहोचला आहे. GPI १ पेक्षा जास्त असणे हे उच्च शिक्षणात पुरुषांच्या तुलनेत महिलांचा सहभाग अधिक असल्याचे दर्शवते. २०१४-१५ च्या तुलनेत २०२३-२४ मध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या महिलांची संख्या तब्बल ४२.२ टक्क्यांनी वाढून २.२ कोटी झाली आहे. अनुसूचित जाती (SC) प्रवर्गात GPI १.११ आणि अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गात तो १.०८ नोंदवला गेला, जे या वर्गातील मुलींची शैक्षणिक प्रगती दर्शवते.

Corporate Trend 2026: भारतीय कंपन्या चिंतेत! कर्मचाऱ्यांनी अतिरिक्त काम करणे का केले बंद? वाचा धक्कादायक अहवाल

STEM आणि सायन्समध्ये मुलींचे वर्चस्व

देशात विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित म्हणजेच STEM अभ्यासक्रमांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पहिल्यांदाच १ कोटीच्या पुढे (१,०१,८८,९८८) गेली आहे. यामध्ये सुमारे ५७ लाख पुरुष आणि ४४.८ लाख महिलांचा समावेश आहे. तसेच ५५.५५ लाखांहून अधिक विद्यार्थी विज्ञान शाखेत असून, यात मुलींचा वाटा ५४.६ टक्के आहे. म्हणजेच विज्ञानात मुलींनी मुलांना मागे टाकले आहे. पदव्युत्तर पातळीवर हा सहभाग ६१.४ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान क्षेत्रात एकूण ४६.३३ लाख प्रवेश झाले असले, तरी यात पदवी स्तरावर मुलींचा वाटा केवळ ३१.१ टक्के आहे, म्हणजेच येथे अजूनही मुलींचा सहभाग वाढण्यास वाव आहे.

CBSE Class 12 Assessment: CBSE १२ वीचा असेसमेंट फॉर्म्युला सर्वोच्च न्यायालयात; परदेशी विद्यार्थ्यांची धाव, काय आहेत मागण्या?

कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला सर्वाधिक पसंती

अभियांत्रिकीमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंग हा सर्वाधिक पसंतीचा कोर्स ठरला असून, १८.४ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी यात प्रवेश घेतला. याशिवाय AI & ML आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स यांसारखे नवीन तंत्रज्ञानाचे कोर्सेस वेगाने लोकप्रिय होत आहेत. तसेच देशात नोंदणीकृत ३.४३ लाख पीएचडी संशोधकांपैकी सर्वाधिक २३.४% विज्ञान क्षेत्रातील आहेत. तसेच, देशातील महिलांसाठीच्या विशेष विद्यापीठांची संख्या २०१४-१५ मधील ११ वरून वाढून आता १८ झाली आहे.

Web Title: Aishe report 2023 24 women enrollment higher education science stem courses marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2026 | 10:22 AM

Topics:  

  • education
  • education news

संबंधित बातम्या

DIKSHA Portal: डिजिटल शिक्षणाचे वरदान! पंतप्रधान मोदींनी सांगितले, ‘या’ प्लॅटफॉर्मचे शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्व’
1

DIKSHA Portal: डिजिटल शिक्षणाचे वरदान! पंतप्रधान मोदींनी सांगितले, ‘या’ प्लॅटफॉर्मचे शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्व’

NDRF जवानांच्या मानसिक आरोग्यासाठी ‘प्रोजेक्ट निर्मल’; जवानांसह कुटुंबीयांनाही मिळणार आधार
2

NDRF जवानांच्या मानसिक आरोग्यासाठी ‘प्रोजेक्ट निर्मल’; जवानांसह कुटुंबीयांनाही मिळणार आधार

Elon Musk School: इलॉन मस्कने मुलांसाठी सुरू केली ‘सीक्रेट’ शाळा; फी आणि पॅटर्न वाचून व्हाल चकित
3

Elon Musk School: इलॉन मस्कने मुलांसाठी सुरू केली ‘सीक्रेट’ शाळा; फी आणि पॅटर्न वाचून व्हाल चकित

MPSC Combined Exam: कारभाराचा बोजवारा! कॉम्प्युटर कमी पडले अन् MPSC स्क्रीनिंग टेस्ट रद्द; विद्यार्थ्यांमध्ये संताप
4

MPSC Combined Exam: कारभाराचा बोजवारा! कॉम्प्युटर कमी पडले अन् MPSC स्क्रीनिंग टेस्ट रद्द; विद्यार्थ्यांमध्ये संताप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.