
Image
परभणी येथील श्रेया श्रीपाद कुलकर्णी या विद्यार्थिनीच्या शुल्कमाफीसाठी आता तंत्र शिक्षण विभागाने पुढाकार घेतला आहे. श्रेया कुलकर्णी ही आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंगच्या तृतीय वर्षात शिक्षण घेत आहे. तिची कौटुंबिक आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून, उर्वरित शैक्षणिक शुल्क भरणे शक्य नसल्याने तिने महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडे शुल्कमाफीसाठी अर्ज केला आहे.
याप्रकरणी अॅड. कुलदीप अंबेकर यांनी १९ नोव्हेंबर रोजी मंत्री महोदयांकडे निवेदनाद्वारे विद्यार्थिनीचे शिक्षण सुरू राहण्यासाठी मदतीची मागणी केली होती. तसेच मोफत शिक्षण योजनेत नियमबाह्य शुल्क वसूल करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करून वसूल केलेले शुल्क परत करण्याची मागणी केली. या पार्श्वभूमीवर तंत्रशिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. सुनील भामरे यांनी पुणे विभागीय कार्यालयाला श्रेयाला शैक्षणिक शुल्कात सवलत अथवा शुल्कमाफी मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
Ans: परभणी येथील श्रेया कुलकर्णी ही आकुर्डी (पुणे) येथील डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंगच्या तृतीय वर्षात शिकत आहे.
Ans: आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या श्रेया कुलकर्णी हिला शैक्षणिक शुल्कात सवलत किंवा शुल्कमाफी मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश तंत्रशिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. सुनील भामरे यांनी पुणे विभागीय कार्यालयाला दिले आहेत.
Ans: अॅड. कुलदीप अंबेकर यांनी १९ नोव्हेंबर रोजी मंत्री महोदयांकडे निवेदन देऊन विद्यार्थिनीच्या मदतीची तसेच मोफत शिक्षण योजनेत नियमबाह्य शुल्क वसूल करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाईची मागणी केली होती.