Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

१६ वर्षांनी पुन्हा शाळा भरली! माजी विद्यार्थी एकत्र, जुन्या आठवणींना दिला उजाळा

बनकिन्होळा न्यू हायस्कूलमधील २००८-०९ बॅचचे मित्र-मैत्रीण तब्बल १६ वर्षांनंतर एकत्र आले. शिक्षकांवर फुलांची उधळण, पुन्हा एकदा वर्गात भरलेला भूगोलाचा तास आणि मैदानावर रंगलेले बालपणीचे खेळ... असा हा भावनिक सोहळा रंगला.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Dec 17, 2025 | 03:35 PM
पुन्हा शाळा भरली! १६ वर्षांनी माजी विद्यार्थी एकत्र (Photo Credit - AI)

पुन्हा शाळा भरली! १६ वर्षांनी माजी विद्यार्थी एकत्र (Photo Credit - AI)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • शाळेच्या अंगणात १६ वर्षांनंतर पुन्हा भरली ‘२००८-०९’ची बॅच!
  • बनकिन्होळा येथे माजी विद्यार्थ्यांचा भावनिक सोहळा
  • जुन्या आठवणींना दिला उजाळा
सिल्लोड तालुक्यातील बनकिन्होळा येथील न्यू हायस्कूल शाळेतील विद्यार्थ्यांची रविवारी तब्बल १६ वर्षानंतर २००८-०९ च्या बॅचचे माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी पुन्हा एकत्र आले आणि शाळेच्या आठवणींना उजाळा देत जुन्या क्षणांचा आनंद लुटला. तसेच यावेळी शाळेच्या प्रवेशद्वारापासून ते शाळेपर्यंत शिक्षकांवर फुलांची उधळण करत यांचे स्वागत करण्यात आले.

शिक्षकांवर फुलांची उधळण अन् जंगी स्वागत

याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आरती करण्यात आली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी श्रीखंडे, शिक्षक हरिचंद्र फिरके, प्रभाकर कुमावत, राजेंद्र पाटील, राजू कोलते, बाबासाहेब फरकाडे, न दकिशोर पाटील, उपसरपंच नंदू फरकाडे या उपस्थित शिक्षकांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन माजी सत्कार करण्यात आला. यावेळी दिवंगत शिक्षक व माजी विद्यार्थ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी आपला परिचय करून दिला. तसेच विद्यार्थी व शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले.

हे देखील वाचा: मराठी पालिका शाळांचे अस्तित्व धोक्यात? शिक्षकवर्ग उतरणार रस्त्यावर, नागरिकांना एक होण्याचे आवाहन

पुन्हा रंगला भूगोलाचा तास; जुन्या आठवणींना उजाळा

आपले मनोगत व्यक्त करत असताना विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देताना शाळेमुळे व गुरुजांनी त्यांच्या जीवनाला योग्य दिशा दिल्यामुळेच आम्ही चांगले नागरिक बनू शकलो, असे सांगितले. त्यानंतर सर्व विद्यार्थी आपल्या दहावीच्या वर्गात बसले. यावेळी शिक्षक एन.पी. पाटील यांनी भूगोल विषयाचा तास घेतला. ज्यामुळे उपस्थितांचे बालपण काही काळासाठी पुन्हा जागे झाले. या कार्यक्रमास माजी विद्यार्थ्यांमध्ये २० मुली आणि ३५ मुले उपस्थित होते. यावळी खो-खो, संगीत खुर्ची, कबड्डीचे सामने सर्वांनी उत्साहात खेळले. मैदानावर खेळताना आणि विजयाचा आनंद साजरा करताना सर्वांचे चेहरे आनंदाचे उजळले होते. कार्यक्रमानंतर सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींनी एकत्र येऊन स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला.

यांनी घेतले परिश्रम

तब्बल १६ वर्षांनंतर जुने वर्गमित्र आणि शिक्षक एकत्र आल्याने सर्व भावनिक वातावरण निर्माण झाले होते. याप्रसंगी सचिन रूद्रे, नरेश फरकाडे, मयूर जाधव, रमेश गोडसे, जनार्धन ताठे, बिलाला शहा, प्रभाकर ताठे, शत्रुगुण फलके, सतीश ताठे, राजू दामले, गणेश पाटील, दिलीप फरकाडे, रवी कटारे, अजय फरकाडे, शरीफ शहा, गजानन कटारे, दिनेश ताठे, सोपान भोसले यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन बिलाल शहा तर आभार सतीश ताठे यांनी मानले.

विद्यार्थ्यांनी एकमेकांशी केले हितगूज

विद्याथ्यांनी परिचय करून देत एकमेकांशी हितगुज केले. माजी विद्यार्थी मेळाव्याच्या निमित्ताने परत एकदा आलेले सर्व माजी विद्यार्थी आठवणीत हरवून गेले होते प्रत्येकजण आपली शाळा आता कशी दिसते, हे डोळ्यांमध्ये साठवून घेत होता, वर्गामित्र भेटल्याचा आनंद सर्वांच्याच चेहऱ्यावर दिसत होता.

हे देखील वाचा: Study Tips : मुलांना अभ्यासाचा कंटाळा येतोय? याला पालक जबाबदार तर नाहीत? जाणून घ्या

Web Title: An emotional reunion of former students took place at bankinhola

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 17, 2025 | 03:33 PM

Topics:  

  • Career News
  • Chhatrapati Sambhajinagar
  • School
  • Sillod

संबंधित बातम्या

Land Fraud News: जमीन विक्रीच्या नावाखाली २.८९ कोटींचा गंडा! बीडच्या दोन व्यापाऱ्यांची अशी झाली फसवणूक
1

Land Fraud News: जमीन विक्रीच्या नावाखाली २.८९ कोटींचा गंडा! बीडच्या दोन व्यापाऱ्यांची अशी झाली फसवणूक

इंग्रजी नवोपक्रम अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद, बालभारती मंडळाच्या सदस्य असलेल्या शिक्षकाच्या व्हिडिओला प्रतिसाद
2

इंग्रजी नवोपक्रम अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद, बालभारती मंडळाच्या सदस्य असलेल्या शिक्षकाच्या व्हिडिओला प्रतिसाद

झिरो लिक्वीड डिस्चार्ज टेक्नॉलॉजीमध्ये पीजी सर्टिफिकेट कोर्ससाठी प्रवेश प्रक्रिया सुरू
3

झिरो लिक्वीड डिस्चार्ज टेक्नॉलॉजीमध्ये पीजी सर्टिफिकेट कोर्ससाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

रिटेल मॅनेजमेंटमध्ये करा MBA; कसे करतात प्रवेश? ‘या’ प्रमुख संस्था घडवतील तुमचे भविष्य
4

रिटेल मॅनेजमेंटमध्ये करा MBA; कसे करतात प्रवेश? ‘या’ प्रमुख संस्था घडवतील तुमचे भविष्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.