Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पैलवान ते पोलीस अधिकारी! ASP होण्यापर्यंतचा अनुज चौधरी यांचा प्रेरणादायी प्रवास

पैलवान ते पोलीस अधिकारी असा संघर्ष अनुजा चौधरी नावाच्या या पठ्ठयाने केला आहे. त्याचा हा प्रेरणादायी प्रवास लोकांसाठी आदर्श ठरत आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Aug 07, 2025 | 07:59 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

उत्तर प्रदेश पोलिसांचे चर्चित अधिकारी अनुज चौधरी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांना लवकरच अतिरिक्त पोलीस अधीक्षक (ASP) पदावर पदोन्नती दिली जाणार आहे. खेळ कोट्यातून आलेले ते उत्तर प्रदेशातील पहिले अधिकारी ठरणार आहेत, जे या पदापर्यंत पोहोचले आहेत. २ ऑगस्ट २०२५ रोजी पार पडलेल्या विभागीय पदोन्नती समिती (DPC) च्या बैठकीत त्यांच्या नावावर अंतिम मुहर लागली असून, आता त्यांच्या पदोन्नतीचा प्रस्ताव मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे.

इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर! ‘या’ तारखेपर्यंत करता येईल अर्ज

मुजफ्फरनगर जिल्ह्यातील बहेड़ी गावचे रहिवासी असलेले अनुज चौधरी यांचा प्रवास अत्यंत प्रेरणादायक आहे. ग्रामीण पार्श्वभूमीतून आलेल्या अनुज यांनी १९९७ ते २०१४ पर्यंत सलग राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा जिंकल्या. त्यांनी २००२ व २०१०च्या नॅशनल गेम्समध्ये रौप्यपदक मिळवले आणि एशियन चॅम्पियनशिपमध्ये दोन कांस्यपदकांची कमाई केली. त्यांच्या या खेळातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना २००१ मध्ये लक्ष्मण पुरस्कार, तर २००५ मध्ये अर्जुन पुरस्कार मिळाला.

उत्तर प्रदेश सरकारने त्यांच्या प्रतिभेची दखल घेत ३१ ऑक्टोबर २०१२ रोजी त्यांची खेळ कोट्यातून डिप्टी एसपी पदावर नियुक्ती केली. २०१४ मध्ये नियुक्तीची अधिकृत खात्री झाली आणि २०१९ मध्ये त्यांना पहिली पदोन्नती मिळाली. आता १२ वर्षांची सेवा पूर्ण करून ते ASP पदासाठी पात्र ठरले आहेत.

अनुज चौधरी केवळ खेळातच नाही, तर पोलीस सेवेतही धाडसी निर्णय आणि स्पष्टवक्तेपणा यामुळे ओळखले जातात. संभल येथील हिंसाचाराच्या वेळी त्यांच्यावर गोळी झडली आणि ते माध्यमांच्या चर्चेत आले. त्यावेळी त्यांनी म्हटले होते – “होळी वर्षातून एकदाच येते, पण जुम्मा ५२ वेळा येतो.” त्यांच्या या वक्तव्यावर वाद निर्माण झाला, परंतु मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांचे समर्थन करत म्हटले, “ते एक पहलवान आहेत, आणि पहलवानासारखंच बोलतात.”

बार्टीमार्फत UPSC, MPSC पूर्व प्रशिक्षणासाठी नोंदणी सुरू! शासकीय सेवेत संधी

यापूर्वीही आजम खान यांच्याशी झालेल्या शाब्दिक चकमकीमुळे ते चर्चेत आले होते, जेव्हा त्यांनी मुरादाबादच्या कमिश्नर कार्यालयात भेटींची मर्यादा निश्चित केली होती. त्यांच्या विरोधात काही चौकशाही झाल्या, पण प्रत्येकवेळी त्यांना क्लीन चिट मिळाली.

अनुज चौधरी यांचा प्रवास हे सिद्ध करतो की प्रामाणिक प्रयत्न, शिस्त आणि धाडस असेल, तर खेळाच्या मैदानातून वर्दीतल्या सेवेपर्यंतचा प्रवासही शक्य आहे. आजच्या तरुणांसाठी त्यांची कहाणी प्रेरणास्त्रोत ठरते.

Web Title: Anuj chaudharys inspiring journey from wrestler to police officer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2025 | 07:59 PM

Topics:  

  • ias
  • IPS
  • UPSC

संबंधित बातम्या

Delhi CM : मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ल्यानंतर पोलीस आयुक्तांना हटवले, आता कोणाची नियुक्ती? वाचा सविस्तर
1

Delhi CM : मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ल्यानंतर पोलीस आयुक्तांना हटवले, आता कोणाची नियुक्ती? वाचा सविस्तर

IAS सोडून IFS झाला पठ्ठया! कोण आहे ऋषभ चौधरी? अभियांत्रिकी क्षेत्र सोडून पात्र केले UPSC
2

IAS सोडून IFS झाला पठ्ठया! कोण आहे ऋषभ चौधरी? अभियांत्रिकी क्षेत्र सोडून पात्र केले UPSC

वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी झाली IPS अधिकारी! सफीन हसनची यशोगाथा
3

वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी झाली IPS अधिकारी! सफीन हसनची यशोगाथा

IAS अधिकारी घडवणाऱ्या ‘फॅक्टरी’सारखं एक कुटुंब! राजस्थानातील मीणा कुटुंबाची गोष्ट
4

IAS अधिकारी घडवणाऱ्या ‘फॅक्टरी’सारखं एक कुटुंब! राजस्थानातील मीणा कुटुंबाची गोष्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.