फोटो सौजन्य - Social Media
रेल्वे रिक्रूटमेंट सेल, मध्य रेल्वे (RRC CR) यांनी अप्रेंटिसेस अॅक्ट 1961 अंतर्गत अॅक्ट अप्रेंटिस पदांसाठी 2025 सालातील भरतीची अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. मध्य रेल्वेच्या विविध क्लस्टर व युनिट्समध्ये एकूण 2418 प्रशिक्षण जागा उपलब्ध असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.
महत्त्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 12 ऑगस्ट 2025 रोजी सुरू होईल आणि 11 सप्टेंबर 2025 रोजी संपेल.
पद व पात्रता
या भरतीत अप्रेंटिस या पदासाठी एकूण 2418 जागा आहेत. अर्जदारांनी किमान 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण असावे आणि संबंधित व्यवसायातील ITI प्रमाणपत्र मान्यताप्राप्त संस्थेतून घेतलेले असावे. वयोमर्यादा 12 ऑगस्ट 2025 रोजी 15 ते 24 वर्षे आहे. आरक्षित प्रवर्गांसाठी शासन नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत मिळेल OBC: 3 वर्षे, SC/ST: 5 वर्षे, PwBD: 10 वर्षे, तर माजी सैनिकांना अतिरिक्त सवलत.
अर्ज शुल्क
सामान्य व OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी शुल्क ₹100/- आहे. SC, ST, PwBD व महिला उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क नाही.
निवड प्रक्रिया
निवड पूर्णपणे मेरिट लिस्टवर आधारित असून कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत होणार नाही. मेरिटची गणना दहावीतील गुण (किमान 50% सरासरी) व संबंधित ITI व्यवसायातील गुणांच्या आधारे होईल. शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी व वैद्यकीय तपासणी केली जाईल.
प्रशिक्षण व मानधन
निवड झालेल्या उमेदवारांना एक वर्षाचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण करावा लागेल. प्रशिक्षणादरम्यान मानधन शासनाच्या नियमानुसार दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत
इच्छुक उमेदवारांनी www.rrccr.com या संकेतस्थळावर 12 ऑगस्ट 2025 ते 11 सप्टेंबर 2025 या कालावधीत ऑनलाइन अर्ज करावा. अर्ज करताना पासपोर्ट साइज फोटो, स्वाक्षरी व आवश्यक कागदपत्रांचे स्कॅन तयार ठेवणे आवश्यक आहे. उमेदवाराने केवळ एकच क्लस्टर निवडून त्यातील युनिटची प्राधान्यक्रम यादी द्यावी. अर्ज सादर केल्यानंतर शुल्क (लागू असल्यास) ऑनलाइन भरून फॉर्मची प्रिंटआउट घ्यावी. ही भरती 10वी + ITI पात्र उमेदवारांसाठी उत्कृष्ट संधी आहे. एकूण 2418 जागांसाठी परीक्षेविना निवड होणार असून निवड मेरिटच्या आधारे होईल. प्रशिक्षण कालावधी एक वर्षाचा आहे व मानधन शासनाच्या नियमानुसार मिळेल.