Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

इंग्रजी विषयाच्या परीक्षेत ४२ गैरप्रकार उघड! अमरावतीत २२ प्रकार; मुंबई, कोल्हापूरात गैरप्रकार नाही

बारावीच्या इंग्रजी परीक्षेत राज्यभरात कॉपीचे एकूण ४२ गैरप्रकार उघडकीस आले आहेत. अमरावती विभागात सर्वाधिक २२ तर पुण्यात १० प्रकरणांची नोंद झाली.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 11, 2026 | 07:40 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या इंग्रजी विषयाच्या परीक्षेदरम्यान राज्यभरात कॉपीचे एकूण ४२ गैरप्रकार उघडकीस आले आहेत. मंडळाने जाहीर केलेल्या प्राथमिक अहवालानुसार विविध विभागांमध्ये हे प्रकार नोंदविण्यात आले असून काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रकरणे आढळली आहेत.

बीएड-डीएडधारकांची नोकरीसाठी वणवण! शासनाच्या शिक्षक भरती धोरणावर निर्माण होताहे सवाल

अहवालानुसार अमरावती विभागात सर्वाधिक २२ गैरप्रकार नोंदविण्यात आले. त्यानंतर पुणे विभागात १० प्रकरणे आढळली. छत्रपती संभाजीनगर विभागात ३, नाशिक विभागात ४ तर लातूर विभागात २ प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत. विशेष म्हणजे मुंबई, कोल्हापूर आणि कोकण या विभागांत एकही गैरप्रकार आढळला नसल्याची माहिती मंडळाने दिली आहे. या विभागांतील परीक्षा प्रक्रिया सुरळीत आणि शिस्तबद्ध पार पडल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

परीक्षा केंद्रांवर कॉपी रोखण्यासाठी मंडळाकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. उडती पथके, व्हिडिओ निरीक्षण व्यवस्था तसेच केंद्रप्रमुखांच्या देखरेखीखाली तपासणी सुरू आहे. तरीही काही ठिकाणी विद्यार्थ्यांनी नियमभंग केल्याचे समोर आले आहे. कॉपी करताना पकडलेल्या विद्यार्थ्यांविरुद्ध मंडळाच्या नियमांनुसार शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. संबंधित विद्यार्थ्यांची उत्तरपत्रिका रद्द होण्याची शक्यता असून त्यांना कारणे दाखवा नोटीस देऊन सुनावणीसाठी बोलावण्यात येणार आहे.

सार्वजनिक विद्यापीठांतील प्राध्यापक भरतीसाठी कार्यपद्धती जाहीर; UGC निकषांवर आधारित भरती

राज्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी सांगितले की, इंग्रजी प्रश्नपत्रिकेदरम्यान राज्यातील सर्व विभागांत मिळून ४२ गैरप्रकारांची नोंद झाली आहे. संबंधित उमेदवारांना नियमानुसार सुनावणीची संधी देण्यात येईल. तोपर्यंत त्यांना पुढील नियोजित परीक्षेला बसण्याची परवानगी देण्यात येणार आहे. सुनावणीनंतर अंतिम निर्णय घेतला जाईल. मंडळाने परीक्षेदरम्यान कडक नियंत्रण ठेवण्याचे धोरण अवलंबले असून विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता प्रामाणिकपणे परीक्षा द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. कॉपीमुक्त परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी आणि शिक्षण व्यवस्थेच्या विश्वासार्हतेसाठी अत्यावश्यक असल्याचेही मंडळाने स्पष्ट केले आहे.

Web Title: 42 irregularities revealed in english subject exam

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 07:40 PM

Topics:  

  • Career News

संबंधित बातम्या

Maharashtra TET Scam: TET उमेदवारांसाठी मोठी बातमी! निकाल रद्द होणार, पण पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळणार
1

Maharashtra TET Scam: TET उमेदवारांसाठी मोठी बातमी! निकाल रद्द होणार, पण पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळणार

BUMS Student: दोन विषय राहिले तरी पुढचं वर्ष अडणार नाही! BUMS विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी
2

BUMS Student: दोन विषय राहिले तरी पुढचं वर्ष अडणार नाही! BUMS विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी

SBI Mumbai Recruitment 2026: SBIची मोठी भरती! ‘या’ विविध पदांसाठी अर्ज करण्याची संधी
3

SBI Mumbai Recruitment 2026: SBIची मोठी भरती! ‘या’ विविध पदांसाठी अर्ज करण्याची संधी

नववीच्या विद्यार्थ्यांना आता आयकराचे धडे; NCERT अभ्यासक्रमात वैयक्तिक टॅक्सचा समावेश
4

नववीच्या विद्यार्थ्यांना आता आयकराचे धडे; NCERT अभ्यासक्रमात वैयक्तिक टॅक्सचा समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.