फोटो सौजन्य - Social Media
दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. मुळात, ही भरती १२ फेब्रुवारी रोजी सुरु करण्यात आली आहे. तर उमेदवारांना १२ मार्च २०२५ पर्यंत या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचे आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना dducollegedu.ac.in. या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. नॉन टीचिंग पदांसाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून ४० रिक्त जागा भरण्यात येणार आहे. दीन दयाळ उपाध्याय कॉलेजमध्ये उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. चला तर मग या भरती विषयी महत्वाची माहिती जाणून घेऊयात:
उमेदवारांना अर्ज शुल्क भरता येणार आहे. जनरल प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून १००० रुपये रक्कम भरायची आहे. तर OBC/EWS/Women या प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून ८०० रुपये भरायचे आहे. अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमाती प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून ६०० रुपये भरायचे आहे. PWD प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून ६०० रुपये रक्कम भरायची आहे. अर्ज ऑनलाईन स्वरूपात करायचे आहे. पात्रता निकष पाहण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या अधिकृत अधिसूचनाचा आढावा घेण्यात यावा. तसेच तेथे या भरती संबंधित अधिक सखोल माहिती पुरवण्यात आली आहे, जी उमेदवारांना अभ्यासात येणार आहे.
या भरतीसाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया चार टप्प्यांत पार पडेल. सर्वप्रथम उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागेल. त्यानंतर संबंधित पदानुसार कौशल्य चाचणी किंवा व्यापार चाचणी (Trade Test) घेतली जाईल. पुढील टप्प्यात निवड झालेल्या उमेदवारांची कागदपत्रे पडताळली जातील आणि शेवटी वैद्यकीय तपासणी केली जाईल. या सर्व प्रक्रियेत यशस्वी ठरलेल्या उमेदवारांची अंतिम निवड केली जाईल.
DDU कॉलेज भरती 2025 साठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत अधिसूचना वाचून आपल्या शैक्षणिक पात्रतेची खात्री करावी. त्यानंतर खाली दिलेल्या “ऑनलाईन अर्ज करा” या लिंकवर क्लिक करावे किंवा अधिकृत वेबसाइट dunt.uod.ac.in ला भेट द्यावी. वेबसाईटवर उपलब्ध असलेला ऑनलाइन अर्ज फॉर्म व्यवस्थित भरावा आणि त्यात आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत. अर्ज प्रक्रियेचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे अर्ज शुल्क भरणे, त्यामुळे उमेदवारांनी योग्य प्रकारे शुल्क भरावे. अर्ज प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्याची प्रिंटआउट घेऊन ठेवावी, जेणेकरून भविष्यात त्याचा संदर्भ घेता येईल.