आता एकाच वेळी मिळवा दोन पदव्या, कसं ते जाणून घ्या... (फोटो सौजन्य-X)
Mumbai University News Marathi: मुंबई विद्यापीठ येत्या काही दिवसांत पुण्यातील सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाशी करार करणार आहे. त्याचबरोबर एसएनडीटी विद्यापीठ सोमय्या विद्यापीठ आणि एचएसएनसी विद्यापीठासह अन्य नामांकित महाविद्यालयांबरोबरही दुहेरी पदवी अभ्यासक्रम राबविण्यासाठी मुंबई विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. दरम्यान मुंबई विद्यापीठाने राज्यातील चार विद्यापीठांशी करार करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची पाऊले उचलली आहेत.
. त्याचमुळे पुढील काळात एकाच वेळी विद्यार्थ्यांना दोन दोन पदव्या घेता येणार आहेत. मुंबई विद्यापीठ येत्या काही दिवसांत पुण्यातील COEP तंत्रज्ञान विद्यापीठाशी करार करणार आहेत. त्याचप्रमाणे, एसएनडीटी विद्यापीठ, सोमय्या विद्यापीठ आणि एचएसएनसी विद्यापीठ आणि इतर मान्यताप्राप्त महाविद्यालये मुंबई विद्यापीठाने दुहेरी पदवी अभ्यासक्रम राबविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना एकाचवेळी दोन पदव्या घेता येणार आहे.
मुंबई विद्यापीठ आणि डॉ. होमी भाभा स्टेट विद्यापीठ यांच्यात दुहेरी पदवीसाठी सामंजस्य करार झाला आहे. सध्या डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाइन शिक्षण केंद्राच्या (सीडीओई) माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊन एकाचवेळी दोन पदव्या घेता येतील. या करारान्वये डॉ. होमी भाभा स्टेट विद्यापीठ हे यजमान विद्यापीठ म्हणून काम पाहणार आहे. तर दूरस्थ व ऑनलाइन शिक्षण केंद्र हे सहयोगी संस्था म्हणून काम पाहणार आहे.
सध्या मुंबई विद्यापीठाने इतर विद्यापीठांसोबत दुहेरी पदवीसाठी करार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सीओईपी विद्यापीठ अनुदान करार अंतिम टप्प्यात आहे. अन्य विद्यापीठांशी बोलणी सुरू असून लवकरच प्रशासकीय बाबी पूर्ण करून करार केले जाणार आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांना विद्यापीठातील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे शिक्षण घेणारे विद्यार्थी बीए, बीकॉम, बीकॉम (अकाउंटिंग अँड फायनान्स), बीएससी (माहिती तंत्रज्ञान, संगणक शास्त्र) या अभ्यासक्रमांना दुहेरी पदवीसाठी प्रविष्ठ होऊ शकतील. तर पदव्युत्तर शिक्षणासाठी एमए, एम.कॉम (अॅडव्हान्स अकाउंटन्सी, बिझनेस मॅनेजमेंट) एमससी (मॅथेमॅटिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि संगणकशास्त्र) एमएमएस आणि एमसीए अशा अभ्यासक्रमांचे विद्यार्थी दुहेरी पदवी घेऊ शकतील, अशी माहिती मुंबई विद्यापीठाकडून देण्यात आली आहे.
केवळ यूजीसी अथवा वैज्ञानिक परिषद, सरकार मान्यता प्राप्त संस्थांमधील ऑनलाइन (ओडीएल) अभ्यासक्रम मान्य असतील.
दोन पूर्णवेळ अभ्यासक्रम घेताना, एका अभ्यासक्रमासाठी मूळ कागदपत्रे आणि दुसऱ्यासाठी प्रमाणित छायांकित प्रत जोडणे आवश्यक.
ही तत्त्वे केवळ पीएच.डी. व्यतिरिक्त इतर अभ्यासक्रमांना लागू राहतील.
नव्या नियमांपूर्वी दोन अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना कोणताही पूर्वलक्षी लाभ मिळणार नाही.