
Dinvishesh
August 27 History: भारतातील उद्योग क्षेत्राचे प्रणेते आणि टाटा समूहाचा विस्तार करणारे सर दोराबजी टाटा यांचा जन्म आज म्हणजेच २७ ऑगस्ट १८५९ रोजी झाला. ते उद्योगपती जमशेदजी टाटा यांचे ज्येष्ठ पुत्र होते. त्यांनी टाटा स्टील आणि टाटा पॉवर यांसारख्या अग्रगण्य कंपन्यांच्या उभारणीत आणि विस्तारात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. उद्योग क्षेत्रासोबतच त्यांनी शिक्षणाचा प्रसार आणि क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी आपले आयुष्य समर्पित केले. त्यांच्या याच अफाट देशप्रेमापोटी आणि परोपकारी वृत्तीमुळे त्यांना एक दूरदृष्टी असलेले उद्योगपती व ‘लोकहितबुद्धी’ म्हणून ओळखले जाते.