बँक ऑफ बडोदामध्ये 627 पदांसाठी भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी!
बँक परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. देशातील आघाडीची बँक असलेल्या बँक ऑफ बडोदामध्ये मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून व्यावसायिक आणि मानव संसाधन विभागातील जवळपास 627 रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने 2 जुलै 2024 पूर्वी पाठवायचे आहेत.
संस्था : बँक ऑफ बडोदा
भरले जाणारे पद : व्यावसायिक आणि मानव संसाधन
रिक्त पदांची संख्या : 627 पदे (यामध्ये १६८ व्यावसायिक तर ४५९ मानव संसाधन)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 2 जुलै 2024
वयोमर्यादा : २५ ते ४८ वर्ष
अर्ज शुल्क : सामान्य, EWS आणि OBC उमेदवारांसाठी ६०० रुपये तर SC, ST, PWD आणि महिलांसाठी १०० रुपये असणार आहे.
आवश्यक पात्रता
– व्यावसायिक पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे.
– मानव संसाधन पदांकरिता B. Tech/ B.E./ M Tech/ M.E, Graduation Relevant field पात्रता असणे आवश्यक आहे.
किती मिळणार पगार
– व्यावसायिक पदासाठी – MMGS II : Rs. 64820 x 2340 (1) – 67160 x 2680 (10) – 93960MMGS III : Rs. 85920 x 2680 (5) – 99320 x 2980 (2) – 105280SMG/S-IV : Rs. 102300 x 2980 (4) – 114220 x 3360 (2) – 120940
– मानव संसाधन पदांकरिता – 08 लाख ते 45 लाख.
अर्जाबाबत काही महत्वाचे मुद्दे
– बँक ऑफ बडोदाच्या या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
– अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 2 जुलै 2024 आहे.
– अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
– मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
– परिणामी, वेळेत आणि परिपूर्ण अर्ज उमेदवारांनी दाखल करावा.
अधिकृत वेबसाईट : www.bankofbaroda.in
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा