
फोटो सौजन्य - Social Media
Google Keep
Google ने अशी एक जागा सोडली नाही जिथे त्यांचे Apps नाही. शिक्षणातही त्यांनी विद्यार्थ्यांची सोया करून ठेवली आहे. Google Keep नावाचा App तुम्हाला Google Play Store वर मिळून येईल. याला डाउनलोड करा. या App चा फायदा असा आहे की हे App नोट्स घेण्यासाठी फार उपयुक्त आहेत. अचानक डोक्यात येणारे विचार, प्रश्न या App मध्ये मांडता येतात. इतकेच नव्हे तर या Apps मध्ये कलर कोडिंग, लेबल्स आणि चेकलिस्टची सुविधादेखील पुरवण्यात आली आहे. आणि सगळ्यात मुख्य असे की येथे रिमाइंडर्स लावून कामे वेळेवर पूर्ण करता येतात.
Quizlet
फ्लॅशकार्ड तयार करण्यासाठी उत्तम असणारा App Quizlet, स्टडी सेट तयार करण्यासाठी फार उत्तम मानला जातो. परीक्षा तयारीसाठी मदत करणारे फ्लॅशकार्ड, क्विझ आणि गेम मोड यामध्ये उपलब्ध आहेत. या App चा वापर करून अभ्यास अधिक इंटरअॅक्टिव्ह आणि मजेशीर बनतो.
Notion
अत्यंत फ्लेक्सिबल आणि मल्टी-फंक्शनल असा App आहे. नोट्स व्यवस्थित क्रम लावून ठेवण्यासाठी उपयुक्त तसेच टास्क मॅनेजमेंट, प्रोजेक्ट ट्रॅकिंग, कॅलेंडर तयार करणे यासाठी उत्कृष्ट मानला जातो. कोणत्याही क्षेत्रातील विद्यार्थी या App ला सहज वापरू शकतात. वैयक्तिक डॅशबोर्ड, टाइमटेबल्स, टू-डू लिस्ट तयार करता येतात.
Forest
आधुनिक तंत्रज्ञानाचा एक नवा अविष्कार म्हणून Forest या App कडे पाहू शकता. हा एक App आहे, यामध्ये अभ्यासात लक्ष केंद्रित ठेवण्यासाठी “व्हर्च्युअल झाड” वाढवण्याची थीम पाहता येते. ही थीम इतकी छान आहे की अभ्यास केला की झाड फुलतं आणि सोशल मीडिया वापरला की झाड पिवळं पडतं. फोनपासून दूर राहण्यासाठी क्रिएटिव्ह आणि मजेदार मार्ग!