Amruta Fadnavis वयाच्या 46 व्या वर्षीही अभिनेत्रींना फिटनेसच्या बाबतीत देत आहेत मात!
अमृता फडणवीस सकाळी उठल्यानंतर कोणत्या पेयांचे सेवन करतात?
अमृता फडणवीस यांच्या फिटनेसचे रहस्य?
हळद काळीमीरीचे पाणी पिण्याचे फायदे?
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सौंदर्य आणि फिटनेसमुळे कायमच चर्चेत असतात. त्यांचा चाहता वर्ग सुद्धा खूप मोठा आहे. कायमच निरोगी राहण्यासाठी आहारात वेगवेगळ्या पेयांचे सेवन अन्नपदार्थांचे सेवन केले जाते. वजन वाढल्यानंतर सकाळी उठून जिऱ्याचे पाणी किंवा इतर डिटॉक्स ड्रिंकचे सेवन केले जाते. आजकाल सर्वच अभिनेत्री निरोगी राहण्यासाठी वेगवेगळ्या पेयांचे सेवन करतात. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी जिऱ्याचे किंवा हळदीचे पाणी प्यायल्यास चेहऱ्यावर चमकदार ग्लो येण्यासोबतच पचनक्रिया सुधारते, वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सकाळी उठल्यानंतर अमृता फडणवीस कोणत्या प्रभावी पेयाचे सेवन करतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. दिवसाची सुरुवात हेल्दी पेय पिऊन झाल्यास शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होईल.(फोटो सौजन्य – pinterest)
अमृता फडणवीस सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्यात काळीमिरी पावडर आणि हळद मिक्स करून पितात. हे पेय नियमित प्यायल्यास शरीराला भरमसाट फायदे होतील. यामुळे शरीर स्वच्छ आणि हलके होण्यास मदत होते. आरोग्याची काळजी घेण्याचा हा अतिशय सोपा आणि गुणकारी मार्ग आहे. स्वयंपाक घरातील अतिशय साध्या पदार्थांचा शरीरावर मोठा परिणाम दिसून येतो. हळदीच्या पाण्याचे सेवन केल्यामुळे आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जाण्यासोबतच शरीर स्वच्छ होते.
जेवणातील सर्वच पदार्थ बनवण्यासाठी हळदीचा वापर केला जातो. जेवणात हळद टाकल्यास पदार्थाच्या रंगासोबतच चव सुद्धा सुधारते. हळदीमध्ये असलेले करक्यूमिन शरीर आतून स्वच्छ ठेवण्यासाठी मदत करते. त्वचेला आलेली सूज, शरीराच्या आतील अवयवांना आलेली सूज कमी करण्यासाठी हळदीचे पेय गुणकारी ठरेल. रिकाम्या पोटी कोमट पाण्यात हळद मिक्स करून प्यायल्यास आतड्यांमध्ये जमा झालेली घाण बाहेर पडून जाण्यासोबतच रक्त शुद्ध होण्यास मदत होते.
काळीमिरी चवीला अतिशय तिखट असते. पण औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेली काळीमिरी शरीरासाठी अतिशय गुणकारी आहे. यामध्ये पायपरीन नावाचा घटक आढळून येतो. पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि पोटाच्या सर्वच समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी काळीमीरीचे सेवन करावे. काळीमिरीची पावडर महिनाभर व्यवस्थित टिकून राहते. सकाळी उपाशी पोटी कोमट पाण्यात काळीमिरीचे सेवन केल्यास शरीराला भरमसाट फायदे होतील.
थंडीच्या दिवसांमध्ये शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते. ज्यामुळे वारंवार थकवा, अशक्तपणा जाणवू लागतो. शरीरात वाढलेला थकवा कमी करण्यासाठी कोमट पाण्यात हळद आणि काळीमिरी पावडर मिक्स करून प्यावी. यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स शरीराला ऊर्जा देण्यासोबतच सांधेदुखी आणि वेदनांपासून आराम मिळवून देतात.
Ans: सकाळी लिंबू आणि मधाचे कोमट पाणी पिणे पोटाची चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.
Ans: उपाशीपोटी पाणी प्यायल्याने चयापचय वाढतो, पचन सुधारते आणि वजन नियंत्रणात मदत होते.
Ans: सकाळच्या पेयामुळे दिवसाची चांगली सुरुवात होते आणि शारीरिक आरोग्याला चालना मिळते.






