Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 18 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

12th Career Options: बारावी नंतर काय? कमी वेळेत आणि सहज मिळणाऱ्या नोकऱ्यांबद्दल एकदा वाचाच..

12th Career Options: बारावीच्या निकालानंतर काय करावे असा प्रश्न पडलाय? शासकीय परीक्षा (SSC CHSL, MTS) ते खाजगी क्षेत्रातील डेटा एंट्री आणि डिजिटल स्किल्सपर्यंतच्या सोप्या नोकरीच्या पर्यायांबद्दल जाणून घ्या सविस्तर..

  • By श्रेया देशमुख
Updated On: Oct 03, 2026 | 03:33 PM
career options

career options

Follow Us
Follow Us:

12th Career Options:  शालेय शिक्षण संपताच बहुतांश विद्यार्थ्यांसमोर ‘पुढे काय?’ हा मोठा प्रश्न उभा राहतो. बारावीचा निकाल लागताच भविष्याची चिंता वाटणे स्वाभाविक आहे. अनेकजण डॉक्टर, सीए किंवा अभियंता बनण्याचे स्वप्न पाहतात, तर काहीजण कौटुंबिक जबाबदाऱ्या किंवा आर्थिक परिस्थितीमुळे लवकरात लवकर स्वतःच्या पायावर उभे राहू इच्छितात. त्यांच्या मनात हा प्रश्न असतो की, बारावी नंतर कोणती सोपी नोकरी करता येईल, ज्यामध्ये फारशी धावपळ करावी लागणार नाही आणि करिअरची सुरक्षित सुरुवात होईल.

सध्याच्या काळात १२ वी उत्तीर्ण तरुणांसाठी सरकारी आणि खाजगी दोन्ही क्षेत्रांत अशा अनेक संधी उपलब्ध आहेत, जिथे मोठ्या पदवीशिवाय सहज नोकरी मिळू शकते. इंटरनेटच्या युगात नोकरीचे ट्रेंड बदलले आहेत. डेटा एंट्री ऑपरेटरपासून ते एसएससी (SSC) अंतर्गत येणाऱ्या सीएचएसएल (CHSL) आणि एमटीएस (MTS) सारख्या सरकारी नोकऱ्यांपर्यंत, अनेक क्षेत्रांत थोडी मेहनत आणि योग्य मार्गदर्शनाने करिअर घडवता येऊ शकते.

१२ वी नंतर सरकारी नोकरीचे पर्याय

आजही देशात सरकारी नोकरीला सर्वात सुरक्षित आणि पहिली पसंती दिली जाते. बारावी पास तरुणांसाठी एसएससी (SSC) अशा काही परीक्षा आयोजित करते, ज्या थोड्याफार तयारीनंतर सहज पास होऊ शकतात:

एसएससी सीएचएसएल (SSC CHSL): जर टायपिंग स्पीड चांगली असेल आणि बेसिक कॉम्प्युटरचे ज्ञान असेल, तर लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC) किंवा डेटा एंट्री ऑपरेटर (DEO) ही पदे उत्तम आहेत. या परीक्षेचा स्तर १२ वीच्या पातळीवरच असतो.

एसएससी एमटीएस (SSC MTS): ही परीक्षा केंद्रीय विभागांमधील मल्टी-टास्किंग स्टाफ पदासाठी असते. याचा अभ्यासक्रम आणि परीक्षेचा पॅटर्न अत्यंत सोपा असतो, ज्यामुळे यश मिळण्याची शक्यता वाढते.

Education Update: आता नववीची मुले शिकणार बिझनेसचे धडे; अभ्यासक्रमात ‘या’ स्टार्टअप्सचा समावेश!

राज्यस्तरीय पोलीस आणि संरक्षण दल: जर फिजिकल फिटनेस चांगला असेल, तर राज्य पोलीस कॉन्स्टेबल, जीडी कॉन्स्टेबल (SSC GD) किंवा इंडियन आर्मी (अग्निवीर) साठी प्रयत्न करू शकता.

खाजगी क्षेत्र आणि डिजिटल स्किल्स: विना डिग्री भरघोस कमाईची संधी

जर तुम्हाला सरकारी नोकरीच्या लांब प्रक्रियेत पडायचे नसेल आणि लवकरात लवकर स्वतःच्या हाताने कमवायचे असेल, तर खाजगी क्षेत्रात अनेक मार्ग खुले आहेत. आज कंपन्यांना स्मार्ट आणि बेसिक कॉम्प्युटरचे ज्ञान असलेल्या तरुणांची गरज असते.

डेटा एंट्री आणि बॅक ऑफिस: कोणत्याही कंपनीच्या ऑफिसमध्ये डेटा एंट्री ऑपरेटर किंवा कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह (BPO/KPO) ची नोकरी मिळवणे सर्वात सोपे मानले जाते. यासाठी कम्युनिकेशन स्किल आणि बेसिक टायपिंग आवश्यक असते.

कंटेंट रायटिंग आणि सोशल मीडिया: जर हिंदी किंवा इंग्रजी भाषेवर उत्तम पकड असेल, तर घरबसल्या किंवा एखाद्या फर्मसोबत जोडले जाऊन कंटेंट क्रिएशन, ट्रान्सलेशन किंवा सोशल मीडिया हँडलिंगचे काम सुरू करता येते.

Kotwal Recruitment 2026: नाशिकमध्ये कोतवाल पदांच्या १५ जागांसाठी भरती जाहीर; ‘या’ तारखेपासून अर्ज सुरू

डिजिटल मार्केटिंग आणि ग्रॅफिक डिझाइन: आजकाल ३ ते ६ महिन्यांचे शॉर्ट टर्म कोर्स करून कॅव्हा (Canva) किंवा बेसिक व्हिडिओ एडिटिंग शिकता येते. प्रत्येक लहान-मोठे दुकान आणि स्टार्टअप आपला व्यवसाय प्रमोट करण्यासाठी अशा तरुणांचा शोध घेत असतात.

Web Title: Best career options after 12th standard sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2026 | 03:33 PM

Topics:  

  • Job
  • SSC

संबंधित बातम्या

IIM Nagpur Recruitment 2026: IIM नागपूरमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदासाठी भरती जाहीर; २० नोव्हेंबरपर्यंत करा अर्ज
1

IIM Nagpur Recruitment 2026: IIM नागपूरमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदासाठी भरती जाहीर; २० नोव्हेंबरपर्यंत करा अर्ज

Cats employees: डेस्कवर बसण्यापूर्वी मांजरी करतात स्वागत! जपानमधील ‘या’ अनोख्या कंपनीत पाळीव प्राणीच आहेत फुल-टाइम कर्मचारी
2

Cats employees: डेस्कवर बसण्यापूर्वी मांजरी करतात स्वागत! जपानमधील ‘या’ अनोख्या कंपनीत पाळीव प्राणीच आहेत फुल-टाइम कर्मचारी

Jobs in Tesla Company: टेस्लामध्ये नोकरी मिळवायची आहे? जाणून घ्या कोणती स्किल्स आहेत आवश्यक!
3

Jobs in Tesla Company: टेस्लामध्ये नोकरी मिळवायची आहे? जाणून घ्या कोणती स्किल्स आहेत आवश्यक!

IOCL Apprentice Recruitment 2026: इंडियन ऑइलमध्ये ४०९ पदांवर मेगा भरती; कोणतीही परीक्षा व मुलाखत नाही, थेट अशी होईल निवड!
4

IOCL Apprentice Recruitment 2026: इंडियन ऑइलमध्ये ४०९ पदांवर मेगा भरती; कोणतीही परीक्षा व मुलाखत नाही, थेट अशी होईल निवड!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.