Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bharati Vidyapeeth: भारती विद्यापीठात प्राध्यापक होण्याची सुवर्णसंधी! ‘या’ महाविद्यालयांत ३२ जागांसाठी थेट मुलाखत

Bharati Vidyapeeth vacancy 2026: भारती विद्यापीठाच्या सांगली व कडेगाव महाविद्यालयांत तासिका तत्त्वावर (CHB) प्राध्यापक पदांसाठी ३२ जागांवर थेट मुलाखत १ सप्टेंबर २०२६ रोजी होणार आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Aug 31, 2026 | 03:57 PM
Bharati Vidyapeeth Bharti

Bharati Vidyapeeth Bharti

Follow Us
Follow Us:

Bharati Vidyapeeth vacancy 2026:  भारती विद्यापीठाच्या संस्थापक डॉ. पतंगराव कदम यांच्या प्रेरणेने सांगली आणि कडेगाव येथील महाविद्यालयांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२०२७ करीता विविध विषयांच्या प्राध्यापक पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. भारती विद्यापीठांतर्गत येणाऱ्या सांगली येथील ‘डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय’ आणि कडेगाव येथील ‘मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम महाविद्यालय’ या दोन्ही ठिकाणी तासिका तत्त्वावर (CHB) अध्यापकांची नियुक्ती केली जाणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या नियमांनुसार आणि कोल्हापूरच्या विभागीय सहसंचालकांच्या ना-हरकत प्रमाणपत्राच्या आधारे ही पदे केवळ तात्पुरत्या स्वरूपात भरण्यात येत आहेत.

कंत्राटी स्वरूपात भरती

या भरती मोहिमेत इंग्रजी, मराठी, हिंदी, अर्थशास्त्र, मानसशास्त्र/तर्कशास्त्र, समाजशास्त्र, शारीरिक शिक्षण, वाणिज्य, रसायनशास्त्र, पदार्थ विज्ञान, वनस्पतीशास्त्र, प्राणिशास्त्र, संख्याशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र आणि गणित या विषयांच्या एकूण ३२ जागांसाठी थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. या तासिका तत्त्वावरील (CHB) प्राध्यापकांची नियुक्ती एका शैक्षणिक वर्षासाठी म्हणजेच जास्तीत जास्त ९ महिन्यांच्या कालावधीसाठी असणार असून, त्यानंतर ही नियुक्ती आपोआप संपुष्टात येईल.

Azim Premji Scholarship 2026 साठी अर्ज करण्याची आज शेवटची तारीख; पात्र विद्यार्थिनींनी असा करा अर्ज

या नियुक्त्या पूर्णपणे तात्पुरत्या स्वरूपाच्या असल्यामुळे भविष्यात नियमित सेवेचा कोणताही हक्क वा दावा संबंधित उमेदवाराला सांगता येणार नाही. तसेच, निवड झालेल्या उमेदवारास आपण इतर कोणत्याही महाविद्यालयात काम करत नसल्याबाबतचे ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर हमीपत्र देणे बंधनकारक राहणार आहे.

निवड प्रक्रिया

इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी दिनांक ०१ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९:३० ते १०:३० या वेळेत उपस्थितीची नोंदणी ठेवली असून, त्यानंतर सकाळी १०:३० वाजल्यापासून मुलाखतीस प्रारंभ होईल. मुलाखतीचे ठिकाण ‘भारती विद्यापीठाचे मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम महाविद्यालय, कडेगाव, ता. कडेगाव, जि. सांगली’ हे ठरवण्यात आले आहे.

NEET PG २०२६ ची उत्तरतालिका कधी जाहीर होणार? जाणून घ्या मार्किंग स्कीम आणि फेरपरीक्षेचे वेळापत्रक!

उमेदवारांनी मुलाखतीसाठी येताना आपले अर्ज आणि सर्व आवश्यक मूळ कागदपत्रांसह त्यांच्या साक्षांकित छायाप्रती सोबत आणणे आवश्यक आहे. यासंदर्भातील सविस्तर जाहिरात शिवाजी विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.unishivaji.ac.in) उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Web Title: Bharati vidyapeeth sangli kadegaon college bharti 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2026 | 03:57 PM

Topics:  

  • Contract Basis Job
  • Job
  • Teacher

संबंधित बातम्या

Central Silk Board Recruitment: केंद्रीय रेशीम बोर्डात ‘रेशीम सहाय्यक’ पदांची भरती; महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांत नोकरीची संधी!
1

Central Silk Board Recruitment: केंद्रीय रेशीम बोर्डात ‘रेशीम सहाय्यक’ पदांची भरती; महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांत नोकरीची संधी!

India Post GDS: जीडीएसची पहिली मेरिट लिस्ट जाहीर; अनेक राज्यांत कटऑफ १००% वर गेल्याने खळबळ
2

India Post GDS: जीडीएसची पहिली मेरिट लिस्ट जाहीर; अनेक राज्यांत कटऑफ १००% वर गेल्याने खळबळ

AISHE Report: उच्च शिक्षणात भारतीय मुलींची ऐतिहासिक झेप! प्रवेशांमध्ये ४२.२% ची मोठी वाढ; मुलांपेक्षा मुली पुन्हा एकदा आघाडीवर
3

AISHE Report: उच्च शिक्षणात भारतीय मुलींची ऐतिहासिक झेप! प्रवेशांमध्ये ४२.२% ची मोठी वाढ; मुलांपेक्षा मुली पुन्हा एकदा आघाडीवर

World Bank Report 2026: फ्रेशर्ससाठी धोक्याची घंटा! एआयमुळे भारतातील २०% एंट्री-लेव्हल नोकऱ्या संकटात; वर्ल्ड बँकेचा खुला
4

World Bank Report 2026: फ्रेशर्ससाठी धोक्याची घंटा! एआयमुळे भारतातील २०% एंट्री-लेव्हल नोकऱ्या संकटात; वर्ल्ड बँकेचा खुला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.