फोटो सौजन्य - Social Media
भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) ने 2025 साठी आर्टिजन पदांच्या भरतीची अधिसूचना जारी केली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 515 जागा भरल्या जाणार आहेत. जर तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल आणि संबंधित ट्रेडमधून ITI केले असेल, तर ही भरती तुमच्यासाठी उत्तम संधी ठरू शकते. ऑनलाइन अर्ज 16 जुलै 2025 पासून सुरू होणार असून 12 ऑगस्ट 2025 ही अंतिम तारीख आहे. या भरती संबंधित अधिकृत अधिसूचना जाहीर केली असून, उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.
या भरतीसाठी उमेदवाराचे वय 1 जुलै 2025 पासून तपासण्यात येणार आहे. मुळात, किमान वय १८ निश्चित करण्यात आले आहे. तर जास्तीत जास्त 27 वर्षे आयु असणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. महत्वाची बाब म्हणजे अनुसूचित जाती, जमाती, दिव्यांग आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल. अधिसूचनेमध्ये नमूद असणाऱ्या शैक्षणिक पात्रतेचा विचार केल्यास 10वी उत्तीर्ण + संबंधित ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण” इतके शिक्षण असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पास आहेत.
BHEL ने या भरतीसाठी निवड प्रक्रिया आयोजित केली आहे. BHEL आर्टिजन भरतीसाठी उमेदवारांची निवड लिखित परीक्षा, स्किल टेस्ट, कागदपत्र पडताळणी तसेच वैद्यकीय चाचणी यावर आधारित असेल. लिखित परीक्षेची तारीख सप्टेंबर २०२५ दि मध्ये अपेक्षित आहे.
या भरतीसाठी अर्ज शुल्क भरणे आवश्यक आहे. अर्ज शुल्क ऑनलाईन स्वरूपात भरायचे आहे. SC / ST / PWD पदासाठी ४७२ रुपये अर्ज शुल्काची रक्कम ठरवण्यात आली आहे. तर सामान्य / OBC / EWS पदांसाठी १०७२ रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे.
अशा प्रकारे करता येईल अर्ज:
ही भरती प्रक्रिया केंद्र सरकारच्या प्रतिष्ठित कंपनीत नोकरी करण्याची मोठी संधी आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज करावा आणि तयारीला सुरुवात करावी. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइट किंवा भरती अधिसूचना वाचणे आवश्यक आहे.