
bhel
BHEL Recruitment 2026: सरकारी नोकरीचे स्वप्न प्रत्येकजण पाहतो आणि ते पूर्ण करण्यासाठी लोक विविध भरतींची वाट पाहत असतात. जर कोणतीही लेखी परीक्षा न देता थेट नोकरी मिळाली, तर त्याहून उत्तम काहीच असू शकत नाही. जर तुम्हालाही सरकारी नोकरी मिळवायची असेल, तर तुम्ही भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडच्या ट्रान्समिशन बिझनेस ग्रुप (BHEL TBG) मध्ये निघालेल्या भरतीसाठी अर्ज करू शकता. या कंपनीकडून भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
या भरती अधिसूचनेनुसार, BHEL TBG ला त्यांच्या साईट्ससाठी सुपरवाइजरची आवश्यकता आहे आणि ही पदे भरण्यासाठीच ही रिक्त जागा काढण्यात आली आहे. भारतातील टीबीजीच्या वेगवेगळ्या साईट्सवर एफटीए ग्रेड-III (FTA Grade-III) सुपरवाइजरची नियुक्ती केली जाईल. या पदाची निवड कोणतीही लेखी परीक्षा न घेता केली जाणार आहे.
आणि इच्छुक उमेदवार BHEL च्या अधिकृत वेबसाइट bplcareers.bhel.com वर जाऊन अर्ज करू शकतात. कंपनीकडून अर्जासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही सुविधा देण्यात आल्या आहेत. पोस्टाने देखील अर्ज पाठवता येऊ शकतो. जर अर्ज डाकद्वारे पाठवायचा असेल, तर त्यासाठीची शेवटची तारीख १४ सप्टेंबर २०२६ आहे. तर दुर्गम भागातील उमेदवारांसाठी अर्ज आणि कागदपत्रे डाकद्वारे पाठवण्याची शेवटची तारीख २१ सप्टेंबर २०२६ आहे.
Sindhudurg DCC Bank : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेत ‘या’ पदांची भरती; आजपासूनच ऑनलाईन अर्ज सुरू!
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा बोर्डातून इंजिनिअरिंग/तंत्रज्ञानात फुल-टाइम डिप्लोमा (किमान ६०% गुणांसह) आणि SC/ST उमेदवारांसाठी किमान ५०% गुण असणे आवश्यक आहे.
अनुभव: डिप्लोमा नंतर कन्स्ट्रक्शन साइटवर किमान २ वर्षांचा कामाचा अनुभव अनिवार्य आहे. स्विचयार्ड, पॉवर प्लांट किंवा रिफायनरीमध्ये काम केलेल्या अभ्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल.
इतर कौशल्य: उमेदवाराला संगणकाचे व्यावहारिक ज्ञान असणे आवश्यक आहे.
कमाल वय: उमेदवारांचे जास्तीत जास्त वय ३५ वर्षे असावे.
वयोमर्यादेत सूट: नियमांनुसार SC/ST उमेदवारांसाठी ५ वर्षे, PwBD (अनारक्षित/सामान्य) साठी १० वर्षे, PwBD (SC/ST) साठी १५ वर्षे आणि जम्मू-काश्मीरच्या रहिवासी उमेदवारांसाठी ५ वर्षांपर्यंतची सूट दिली जाऊ शकते.
उमेदवारांना पहिल्या वर्षी ४५,००० रुपये प्रतिमहा आणि दुसऱ्या वर्षी ४८,००० रुपये प्रतिमहा पगार दिला जाईल. याशिवाय आरोग्य विम्याची सुविधा देखील मिळले, जी उमेदवारांना त्यांच्या जीवनसाथी आणि आश्रित मुलांसाठी ५ लाख रुपयांपर्यंतचे मेडिक्लेम विमा कवच देईल. इतर सुविधांबद्दल बोलायचे तर, उमेदवारांना BHEL साइट/टाउनशिपवर राहण्याची सुविधा देखील प्रदान केली जाईल.