
Railway Recruitment (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
ही भरती RRB म्हणजे रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डाकडून होत आहे. मुंबई, अहमदाबाद विभागासाठी पण जागा आहेत.कोणती पदे आहेत आणि किती जागा?या भरतीत 4 प्रकारची पदे आहेत. Railway Recruitment 2026:
चीफ कमर्शियल सुपरवायझर: एकूण 127 जागा आहेत. यात RRB मुंबईसाठी मध्य रेल्वे 7 जागा आणि पश्चिम रेल्वे 6 जागा आहेत. तसेच अहमदाबादसाठी 7 जागा आहेत.गुड्स ट्रेन मॅनेजर: यासाठी सर्वात जास्त जागा आहेत. एकूण 2,750 जागा. यात मुंबई विभागासाठी मध्य रेल्वे 79 आणि अहमदाबादसाठी 14 जागा आहेत.
ज्युनिअर अकाऊंट असिस्टंट कम टायपिस्ट: एकूण 300 जागा.सिनिअर क्लर्क कम टायपिस्ट: एकूण 371 जागा.एकूण मिळून 3500 पेक्षा जास्त जागा आहेत.
या सगळ्या पदांसाठी तुम्ही पदवीधर असणे गरजेचे आहे. कोणत्याही शाखेची पदवी चालेल. म्हणजे BA, BCom, BSc असाल तरी अर्ज करू शकता.पण सिनिअर क्लर्क पदासाठी फक्त पदवी असून चालणार नाही, तुम्हाला टायपिंग यायला पाहिजे. कॉम्प्युटरवर इंग्लिश आणि हिंदी टायपिंगचा वेग असणे गरजेचे आहे.वयाची अट 18 ते 33 वर्षे ठेवली आहे. म्हणजे 18 वर्षापेक्षा जास्त आणि 33 पेक्षा कमी वय असलेले अर्ज करू शकतात. SC, ST, OBC वाल्यांना सरकारी नियमाप्रमाणे वयात सूट पण मिळेल.
या भरतीसाठी दोन परीक्षा द्याव्या लागतील. दोन्ही कॉम्प्युटरवर होतील.
पहिली परीक्षा –
स्टेज 1: यात एकूण 100 प्रश्न असतील. जनरल अवेअरनेसचे 40 प्रश्न, गणिताचे 30 प्रश्न आणि बुद्धिमत्ता म्हणजे रिझनिंगचे 30 प्रश्न. 90 मिनिटांचा वेळ मिळेल. प्रत्येक बरोबर उत्तराला 1 मार्क. चुकीच्या उत्तराला मार्क कापले जातील, त्यामुळे अंदाजे टिक करू नका.
दुसरी परीक्षा – स्टेज 2: पहिली परीक्षा पास झाले की दुसरी परीक्षा होईल. यात 120 प्रश्न असतील. जनरल अवेअरनेस 50, गणित 35 आणि रिझनिंग 35 प्रश्न. ही परीक्षा थोडी अवघड असते. या दोन्ही परीक्षा झाल्यावर तुमच्या कागदपत्रांची तपासणी होईल आणि मग नोकरी पक्की.
अर्ज फक्त ऑनलाईनच करायचा आहे. कुठेही जायची गरज नाही.RRB मुंबईची वेबसाईट आहे www.rrbmumbai.gov.in यावर जाऊन तुम्हाला फॉर्म भरता येईल.अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 नोव्हेंबर 2026 आहे. त्यामुळे शेवटच्या दिवसाची वाट बघू नका, आत्ताच फॉर्म भरा.फॉर्म भरताना काही अडचण आली तर तुम्ही रेल्वेच्या हेल्पलाईनवर संपर्क करू शकता. त्यांचा ईमेल आहे rrb.help@csc.gov.in आणि फोन नंबर 9592001188, 01725653333 आहे.रेल्वेची नोकरी म्हणजे कायमची नोकरी, चांगला पगार, आणि इतर सुविधा पण मिळतात. त्यामुळे पदवीधर असाल आणि सरकारी नोकरीचे स्वप्न बघत असाल तर ही संधी सोडू नका. लगेच तयारीला लागा.