फोटो सौजन्य - Social Media
भारतीय पशुपालन निगम लिमिटेड (BPNL)ने 2,152 रिक्त जागांसाठी ही भरतीची प्रक्रिया आयोजित केली आहे. या भरतीच्या माध्यमातून पशुधन फार्म निवेश अधिकारी, पशुधन फार्म निवेश सहायक आणि पशुधन फार्म संचालन सहायक पदासाठी उमेदवारांची भरती करण्यात येणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. उमेदवार या भरतीसाठी 12 मार्च, २०२५पर्यंत अर्ज करू शकतात. चला तर या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात:
पशुधन फार्म निवेश अधिकारीच्या पदासाठी एकूण ३६२ रिक्त जागा आहेत. पशुधन फार्म निवेश सहायक पदासाठी एकूण १४२८ जागा रिक्त आहेत. पशुधन फार्म संचालन सहायक पदासाठी एकूण ३६२ जागा रिक्त आहेत. या रिक्त पदासांठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना काही पात्रता निकष पात्र करावे लागणार आहेत. हे निकष शैक्षणिक आहेत तसेच उमेदवारांच्या वयोमर्यादेसंदर्भात आहेत. पशुधन फार्म निवेश अधिकारी पदांसाठी उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे. पशुधन फार्म निवेश सहायक पदासाठी उमेदवार बारावी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. पशुधन फार्म परिचालन सहायक पदासाठी उमेदवार किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
या पदांसाठी नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या कौशल्य तसेच अनुभवाच्या आधारे मासिक वेतन दिले जाणार आहे. एकंदरीत, हे वेतन २०,००० रुपयांपासून ते ३८,२०० रुपयांपर्यंत असेल. तर पशुधन फार्म निवेश अधिकारीच्या रिक्त पदांसाठी ३८,२०० रुपये इतके वेतन दिले जाईल. पशुधन फार्म निवेश सहायक पदांसाठी ३०,५०० रुपये वेतन देण्यात येईल. तसेच पशुधन फार्म परिचालन सहायक पदासाठी २०,००० रुपये वेतन निर्धारित करण्यात आले आहे.
अर्ज कर्त्या उमेदवारांना ऑनलाईन परीक्षांसाठी उपस्थित राहावे लागणार आहे. या परीक्षेला पात्र करणाऱ्या उमेदवारांना या भरतीमध्ये नियुक्ती मिळणार आहे. उमेदवारांना प्रॅक्टिकलसाठी बोलवण्यात येईल तसेच दस्तऐवजांच्या पडताळणीसाठी उमेदवारांना उपस्थित राहावे लागणार आहे. मुळात, ऑनलाईन परीक्षा ५० गुणांसाठी आयोजित करण्यात येईल. तर प्रॅक्टिकलही ५० गुणांसाठी आयोजित करण्यात येईल. उमेदवारांना किमान ५०% गुणांनी दोन्ही चाचण्या पात्र कराव्या लागणार आहेत.
अशा प्रकारे करता येईल अर्ज