Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BRICS Education : आता फक्त डिग्री पुरेशी नाही! ब्रिक्स देशांच्या नव्या अजेंड्यामुळे ‘या’ स्किल्सना येणार मोठी मागणी

BRICS Education 2026: ब्रिक्स देशांच्या शिक्षण अजेंड्यानुसार AI, डेटा सायन्स, ड्रोन्स आणि ग्रीन स्किल्सचे महत्त्व का वाढतेय? जाणून घ्या विद्यार्थ्यांसाठी याचे काय फायदे आहेत.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Sep 14, 2026 | 11:01 AM
EDUCATION

EDUCATION

Follow Us
Follow Us:

BRICS Education Agenda:  आर्टिफिशियल इंटेलिजेंस आता फक्त कॉम्प्युटर सायन्सपुरता मर्यादित विषय राहिलेला नाही. ब्रिक्स (BRICS) देशांच्या शिक्षण मंत्र्यांनी २०२५ मध्ये शिक्षण क्षेत्रातील AI चा वापर, AI साक्षरता आणि जबाबदार AI च्या वापराबाबत संयुक्त घोषणा केली होती. यामध्ये AI मुळे शिकण्याच्या क्षमतेत होणारी सुधारणा, शिक्षणातील व्यक्तिगत गरजांनुसार बदल आणि शैक्षणिक दरी कमी करण्याची त्याची क्षमता अधोरेखित करण्यात आली. त्याचबरोबर डेटा प्रायव्हसी, अल्गोरिदम मधील पूर्वग्रह (Algorithmic Bias) आणि नैतिक वापर यांसारख्या आव्हानांवरही भर देण्यात आला.

ब्रिक्सच्या उच्च शिक्षण सहकार्यात कॉम्प्युटर सायन्स आणि इन्फॉर्मेशन सिक्युरिटीज आधीपासूनच प्रमुख विषय राहिले आहेत. ‘ब्रिक्स नेटवर्क युनिव्हर्सिटी’च्या माध्यमातून या क्षेत्रांमध्ये जॉइंट प्रोग्राम्स, संशोधन आणि शैक्षणिक सहकार्याला प्रोत्साहन दिले जात आहे. याचा अर्थ असा की, येत्या काळात डेटा सायन्स, क्लायड कम्प्युटिंग, सायबर सिक्युरीटी आणि डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर यांसारखी कौशल्ये शिक्षण आणि रोजगार या दोन्हीसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहेत.

विद्यापीठे फक्त पदवीवर नाही, तर कौशल्यांवर (Skills) भर का देत आहेत?

ब्रिक्स देशांनी तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण (TVET) ला आपल्या शैक्षणिक सहकार्याचा महत्त्वाचा भाग बनवले आहे. २०२६ मध्ये भारताच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ‘BRICS-TCA’ च्या बैठकीत डिजिटल आणि ग्रीन ट्रांझिशनशी संबंधित वर्कफोर्सवर चर्चा झाली. भारताने ‘BRICS इंटरनॅशनल स्किल गॅप स्टडी’ आणि ‘BRICS स्किल्स कॉम्पिटिशन’ सारखे प्रस्तावही मांडले आहेत.

IoT आणि रोबोटिक्सचे काय होणार?

भविष्यातील कौशल्यांची चर्चा केवळ AI पुरती मर्यादित नाही. ब्रिक्सच्या TVET सहकार्यात आधीपासूनच इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT), स्मार्ट सिटीज, स्मार्ट हेल्थकेअर, ड्रोन टेक्नॉलॉजी, ब्लॉकचेन आणि आर्टिफिशियल इंटेलिजेंस यांसारख्या नव्या पिढीच्या कौशल्यांचा समावेश करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत इंजिनिअरिंग आणि व्होकेशनल एज्युकेशनमध्ये या क्षेत्रांशी संबंधित प्रात्यक्षिक कोर्सेस आणि इंडस्ट्री-ओरिएंटेड ट्रेनिंगची भूमिका वाढणार आहे.

स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये काय बदल होत आहेत?

ब्रिक्स देशांसाठी ‘स्पेस’ हे वेगाने उदयास येणारे सहकार्याचे क्षेत्र ठरत आहे. जून २०२६ मध्ये बंगळुरू येथे ‘BRICS हेड्स ऑफ स्पेस एजन्सीज’ची बैठक पार पडली, ज्यामध्ये सदस्य देशांनी रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट कॉन्स्टेलेशन आणि स्पेस सस्टेनेबिलिटी यांसारख्या विषयांवर चर्चा केली. यामुळे स्पेस सायन्स, सॅटेलाइट टेक्नॉलॉजी, रिमोट सेन्सिंग, अर्थ ऑब्झर्व्हेशन आणि स्पेस डेटा या क्षेत्रांतील संशोधन आणि कौशल्य सहकार्याला गती मिळत आहे.

Smallest University: जगातील सर्वात छोटे युनिव्हर्सिटी कॅम्पस! जिथे आहेत फक्त ३ क्लासरूम्स, तरीही येथे….

ग्रीन स्किल्सची गरज का वाढतेय?

हवामान बदल आणि शाश्वत विकास हा देखील ब्रिक्सच्या शिक्षण अजेंड्याचा महत्त्वाचा भाग आहे. ब्रिक्स नेटवर्क युनिव्हर्सिटीच्या प्राधान्यक्रमात इकोलॉजी आणि क्लायमेट चेंज, एनर्जी, वॉटर रिसोर्स आणि पोल्युशन ट्रीटमेंट या विषयांचा समावेश आहे. म्हणजेच येत्या काळात रिन्युएबल एनर्जी, क्लायमेट टेक्नॉलॉजी, वॉटर मॅनेजमेंट आणि एन्व्हायर्नमेंटल डेटा यांसारख्या आंतरविद्याशाखीय कौशल्यांची गरज मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.

BRICS ची विद्यापीठे एकत्र येऊन शिकवणार का?

ब्रिक्स नेटवर्क युनिव्हर्सिटीचा मुख्य उद्देशच सदस्य देशांच्या उच्च शिक्षण संस्थांमध्ये जॉइंट रिसर्च, ॲकॅडेमिक मोबिलिटी आणि नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांना प्रोत्साहन देणे हा आहे. २०२६ मध्ये हे नेटवर्क अधिक मजबूत करण्यावर काम झाले. जुलै २०२६ मध्ये भारतात झालेल्या बैठकीत पारंपरिक आणि आशियाई/स्थानिक ज्ञान प्रणालीला नवा विषय बनवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला.

लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली! CSIR UGC NET चा स्कोअर कार्ड आणि रँक जाहीर, कसा तपासाल तुमचा निकाल?

विद्यार्थ्यांसाठी याचा काय अर्थ आहे?

ब्रिक्सचा हा नवीन शिक्षण अजेंडा स्पष्ट करतो की, येत्या काळात फक्त पारंपरिक पदवी पुरेशी ठरणार नाही. AI, डेटा सायन्स, सायबर सिक्युरिटी, क्लाउड कम्प्युटिंग, IoT, ड्रोन्स, स्पेस टेक्नॉलॉजी, ग्रीन टेक्नॉलॉजी आणि डिजिटल स्किल्स या क्षेत्रांमधील ज्ञान आणि प्रात्यक्षिक कौशल्ये विद्यार्थ्यांसाठी अत्यंत आवश्यक असणार आहेत. विशेष म्हणजे, ब्रिक्स देश ही कौशल्ये उच्च शिक्षणासोबतच तांत्रिक आणि व्यावसायिक प्रशिक्षणाशी (TVET) जोडण्याचा प्रयत्न करत आहेत.

Web Title: Brics education agenda 2026 ai data science space technology future

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2026 | 11:01 AM

Topics:  

  • Brics Council
  • education

संबंधित बातम्या

Breaking News : मला फरक पडत नाही ; आखाती देशांनी इराणसोबत बोलावं कि नाही हा त्यांचा प्रश्न ; डोनाल्ड ट्रम्प
1

Breaking News : मला फरक पडत नाही ; आखाती देशांनी इराणसोबत बोलावं कि नाही हा त्यांचा प्रश्न ; डोनाल्ड ट्रम्प

धक्कादायक! MBBS ची फीस थेट ५६ टक्क्यांनी वाढली; एका झटक्यात १ कोटींवर पोहोचला शिक्षणाचा खर्च!
2

धक्कादायक! MBBS ची फीस थेट ५६ टक्क्यांनी वाढली; एका झटक्यात १ कोटींवर पोहोचला शिक्षणाचा खर्च!

BRICS Summit : मोदींच्या गाला डिनरला जिनपिंग गैरहजर; ‘डिनर’ टाळल्याने चर्चांना उधाण!
3

BRICS Summit : मोदींच्या गाला डिनरला जिनपिंग गैरहजर; ‘डिनर’ टाळल्याने चर्चांना उधाण!

AI and coding: इंग्रजीची भीती संपली! आता मातृभाषेत शिका कोडिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स..
4

AI and coding: इंग्रजीची भीती संपली! आता मातृभाषेत शिका कोडिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.