
फोटो सौजन्य - Social Media
दागिना परिधान करून मिरवणे प्रत्येकाची आवड असते, पण अशामध्ये आपण या क्षेत्रात करिअरही घडवू शकतो. अनेक जण दागिने डिजाईनकरून महिना लाखो रुपये कमवत आहेत. महत्वाचे म्हणजे मेरठ येथे स्थित असलेल्या एका विद्यापीठाने Jewellery Designing सुरु केला आहे. मेरठ हे शहर दागिन्यांसाठी प्रसिद्ध आहे. येथे तयार होणारे दागिने भारतात नव्हे तर संपूर्ण आशिया खंडात प्रसिद्ध आहेत. अनेक देशांतून यांना मागणी आहे आणि ही मागणी दरवर्षी वाढत असते. अशात Jewellery Designing करण्याचा कोर्स करणे करिअरसाठी उत्कृष्ट पर्याय आहे.
मुळात, ही वाढती मागणी लक्षात घेता, चौधरी चरण सिंह विद्यापीठाने बीएससी इन ज्वेलरी डिझाइन (B.Sc in Jewellery Design) हा नवीन कोर्स सुरू केला आहे. हा कोर्स विद्यार्थ्यांना केवळ शिक्षण देण्यापुरता मर्यादित नाही, तर त्यांच्यासाठी दागिन्यांच्या क्षेत्रात भक्कम भविष्य घडवण्याची संधीदेखील उघडतो. विद्यापीठात या कोर्समध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण दिलं जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांना उत्तम नोकरीच्या संधी प्राप्त होऊ शकतात.
तसेच विद्यार्थ्यांना मेरठमधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ज्वेलरी टेक्नॉलॉजी येथे प्रत्यक्ष दागिने डिझाइन करण्याचे प्रशिक्षणही दिले जाईल. या कोर्सची वार्षिक फी 45,000 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. एक वर्ष कोर्स पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना डिप्लोमा, दोन वर्ष पूर्ण करणाऱ्यांना ऍडव्हान्स डिप्लोमा, तर तीन वर्षांचा संपूर्ण कोर्स पूर्ण करणाऱ्यांना पदवी (डिग्री) प्रदान केली जाईल. या कोर्समध्ये एकूण 50 जागा उपलब्ध आहेत.
यापूर्वी अशा प्रकारचे कोर्स करण्यासाठी विद्यार्थ्यांना दिल्ली किंवा मुंबईसारख्या शहरांमध्ये जावे लागत होते. मात्र आता मेरठमध्येच दर्जेदार शिक्षण व प्रॅक्टिकल ट्रेनिंग उपलब्ध होणार आहे. त्यामुळे येथील तरुणांना लाख मोलाचा फायदा होणार आहे. हा कोर्स कोणत्याही शैक्षणिक शाखेतील (stream) विद्यार्थ्यांसाठी खुला आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा. दागिन्यांच्या या झगमगत्या जगात आता तुम्हालाही तुमचं स्थान निर्माण करता येईल!