
फोटो सौजन्य - Social Media
कधी कधी आपल्या वागण्यामुळे आपला पाल्य अभ्यासापासून दूर होतो. याला जबाबदार कुठेना कुठे आपणच असतो. आपण काय करतो? अभ्यासाच्यावेळी आपल्या पाल्याला भीती दाखवतो. दुसरा मुलगा त्याच्यापेक्षा कसा वरचढ आहे? या गोष्टी त्याला दाखवून देतो. त्याला नेहमी घालून-पाडून बोलता मग तुम्हीच विचार करा. का म्हणून तुमचा पाल्य अभ्यासाच्या मार्गाला लागेल?
मारणे आणि ओरडल्याने काहीच फायदा होत नाही. असे कराल तर काठावर पास होणाऱ्या पाल्यालाही तुम्ही नापाशीच्या वेशीवर आणाल. पाल्याला माराल आणि ओरडाल तर त्याचा ताण वाढेल. अभ्यासात अव्वल करायचे असेल तर त्याचा ताण जाणून घ्या, त्याचा ताण वाढवण्याचे कृती करू नका. आपल्या पाल्याची तुलना इतर किंवा शेजारच्या पाल्यांशी करू नका. याउलट तो ज्या कामात अव्वल आहे त्यात त्याचे कौतुक करा आणि ज्यात नाही त्या कामासाठी प्रोत्साहित करा आणि मनोबल वाढवा.
तुमचा पाल्य एखाद्या कौशल्यात कमी आहे तर त्याला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. एक चांगला गुरु पहा आणि त्याकडे त्याला अभ्यासासाठी पाठवा. एक चांगला गुरु तोच जो मित्र बनून त्याला चार चांगल्या गोष्टी शिकवेल. मोबाईल, टीव्ही, व्हिडिओ गेम्स सुरू असतील तर मुलांचं लक्ष अभ्यासात लागत नाही. अभ्यासाच्या वेळी या गोष्टी दूर ठेवणं आवश्यक आहे. पण पूर्णपणे बंद करू नका. थोडं मनसोक्त जगण्याची परवानगी द्या.