फोटो सौजन्य- सोशल मीडिया
Captain Smit Machhar Biography: आकाशाच्या असीम उंचीवर उडणे आणि हजारो फूट उंचीवर प्रवाशांच्या जीवाची जबाबदारी सांभाळणे ही काही साधी गोष्ट नाही. यासाठी धाडसी वृत्तीची आवश्यकता असते. नुकतेच दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या फ्लाईदुबईच्या विमानातील (FZ1073) प्रवासादरम्यान भारतीय पायलट स्मित मच्छार यांनी ज्या प्रकारे कॉकपिटच्या आत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता एका मोठ्या कटास हाणून पाडले, त्याने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे.
धाडसी पायलट कॅप्टन स्मित मच्छार यांनी आपला जीव धोक्यात घालून विमानात प्रवास करणाऱ्या सुमारे १८0 प्रवाशांचे प्राण वाचवले. रक्ताने लथपथ असतानाही त्यांनी कमालीचा संयम आणि शौर्य दाखवले. ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. त्यांच्या धैर्याने हे सिद्ध केले आहे की खरे हिरो पडद्यामागे नसून, कठीण प्रसंगात योग्य निर्णय घेणाऱ्यांच्या मधूनच येतात. आज प्रत्येकजण स्मित मच्छार यांच्याबद्दल चर्चा करत आहे. जाणून घेऊया भारतीय पायलट स्मित मच्छार किती शिकलेले आहेत आणि त्यांचा करिअरचा प्रवास कसा राहिला आहे.
हिरो बनण्याचा प्रवास सोपा नसतो. कॅप्टन स्मित मच्छार यांची गोष्ट हे शिकवते की ध्येय गाठण्यासाठी बालपणापासूनच आकाशाची स्वप्ने पाहावीच लागतात असे नाही. योग्य वेळी घेतलेला एक योग्य निर्णय संपूर्ण आयुष्य बदलून टाकतो. त्यांचे कुटुंब टेक्स्टाइल व्यवसायाशी जोडलेले आहे. परंतु, वयाच्या १९ व्या वर्षी एका एव्हिएशन सेमिनारने स्मित यांचे आयुष्य बदलून टाकले. न्यूझीलंडमध्ये पायलटचे कठीण प्रशिक्षण घेण्यापासून ते बोइंग ७३७ फ्लीटवर १३ वर्षांपेक्षा अधिक काळाचा दीर्घ अनुभव मिळेपर्यंत त्यांचा हा प्रवास अत्यंत संघर्षमय राहिला आहे.
NEET UG Exam: नीट परीक्षेच्या पद्धतीत होणार मोठा बदल? पेन-पेपर ऐवजी ऑनलाइन होणार परीक्षा
अनेक लोक लहानपणापासून पायलट बनण्याचे स्वप्न पाहतात. परंतु, कॅप्टन स्मित मच्छार यांची कहाणी वेगळी आहे. १२ वी नंतर त्यांनी टेक्स्टाइल इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम निवडला, त्यानंतर मॅनेजमेंटच्या वाटेने पाऊल ठेवले. १९ व्या वर्षी एका एव्हिएशन सेमिनारमध्ये सहभाग घेतल्यानंतर त्यांच्या मनात आकाशाला गवसणी घालण्याची इच्छा निर्माण झाली. त्यांच्या वडिलांनी त्यांच्या या निर्णयाचे स्वागत करताना फक्त एवढेच म्हटले की, हे कसे आणि कुठे केले जाऊ शकते ते शोधून काढ. यानंतर त्यांनी न्यूझीलंडचा रस्ता धरला. त्या काळात १६ ते १७ लाख रुपये खर्च करून त्यांनी पायलटचे प्रशिक्षण पूर्ण केले.
लिंक्डइन प्रोफाइलनुसार, स्मित मच्छार यांनी बोइंग ७३७ फ्लीटवर १३ वर्षांपेक्षा जास्त व्यावसायिक उड्डाणाचा (कमर्शियल फ्लाइंग) अनुभव मिळवला आहे. त्यांच्या नावावर ९,७५० हून अधिक तास सुरक्षित उड्डाणाचा रेकॉर्ड नोंदवला गेला आहे. त्यांनी २०११ मध्ये स्पाइसजेट एअरलाइन्ससोबत आपल्या करिअरची सुरुवात केली होती.
SBI Recruitment 2026: स्टेट बँक ऑफ इंडियात विविध उच्च पदांसाठी भरती जाहीर; आजच करा अर्ज!
तिथे त्यांनी लाईन ट्रेनिंग कॅप्टन आणि सीनियर कमांडरसारख्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. यानंतर जून २०२२ मध्ये त्यांनी फ्लाईदुबईचा मार्ग धरला आणि युएईच्या (UAE) या सरकारी एअरलाइन्समध्ये डायरेक्ट एंट्री कॅप्टन म्हणून रुजू झाले. बोइंग ७३७ मॅक्स विमानांना भारतात आणणाऱ्या पहिल्या पायलटच्या पहिल्या बॅचमध्येही त्यांचा समावेश होता.






