Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 20 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Photography Career: १२ वी नंतर फोटोग्राफीमध्ये करिअर करायचयं ? जाणून घ्या कोर्सेस, स्कोप आणि पगाराबद्दल सविस्तर..

Photography Courses: फोटोग्राफीमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी १२ वी नंतर कोणते कोर्सेस करावेत? तसेच या क्षेत्रात काय स्कोप आहे आणि किती पगार मिळू शकतो? जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर...

  • By श्रेया देशमुख
Updated On: Aug 19, 2026 | 02:06 PM
photography

photography

Follow Us
Follow Us:

Photography Courses: असे म्हटले जाते की, एक छायाचित्र (फोटो) हजार शब्दांच्या बरोबरीने असते, पण तुम्हाला माहीत आहे का की, एक योग्य फोटो कोणाचे भविष्यही घडवू शकतो? जग पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन इतरांपेक्षा वेगळा असेल, तर फोटोग्राफी तुमच्या याच गुन्हाला एका यशस्वी करिअरमध्ये बदलू शकते. दरवर्षी १९ ऑगस्ट रोजी साजरा केला जाणारा ‘जगभरात फोटोग्राफी दिन’ (World Photography Day) या सुंदर कलेची आणि त्याच्या इतिहासाची आठवण करून देतो. १८३९ मध्ये ‘डॅगुएरोटाइप’  फोटोग्राफिक प्रक्रियेच्या शोधासह ज्या कलेची पायाभरणी झाली, ती आज तरुणांमध्ये सर्वात पसंतीच्या करिअर पर्यायांपैकी एक बनली आहे.

तथापि, प्रश्न असा उपस्थित होतो की, फोटोग्राफर होण्यासाठी केवळ एक चांगला कॅमेरा असणे पुरेसे आहे का, की यासाठी एखाद्या व्यावसायिक कोर्स आणि योग्य प्रशिक्षणाची गरज असते? जर तुम्हाला फोटो काढण्याची आवड असेल आणि तुम्हाला यात एक यशस्वी आणि हाय-पेइंग करिअर करायचे असेल, तर प्रोफेशनल कोर्स करणे हा सर्वात योग्य निर्णय ठरेल. तथापि, जर हा केवळ तुमचा छंद असेल, तर तुम्ही कोणत्याही फुल-टाइम कोर्सशिवाय ऑनलाइन किंवा स्वतःच्या प्रयत्नांनी कौशल्ये शिकू शकता. पण जर तुमची प्राधान्यता ही यात करिअर करण्याचीच असेल, तर किमान एक डिप्लोमा कोर्स नक्कीच करून घ्यायला हवा.

फोटोग्राफर कसे बनू शकता?

इयत्ता १२ वीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तुम्ही फोटोग्राफीच्या विविध कोर्सेसमध्ये प्रवेश घेऊ शकता. या कोर्सेसच्या माध्यमातून तुम्ही कॅमेरा योग्य पद्धतीने हाताळणे, क्रिएटिव्ह फ्रेमिंग आणि उच्च-गुणवत्तेच्या फोटोग्राफीचे तंत्र शिकता. याशिवाय तुम्हाला वेगवेगळ्या लेन्स आणि कॅमेऱ्याच्या प्रगत फीचर्सची सखोल माहिती मिळते. १२ वी नंतर फोटोग्राफी कोर्सच्या माध्यमातून तुम्ही सर्टिफिकेट कोर्स, डिप्लोमा किंवा ग्रॅजुएशनची पदवी मिळवू शकता.

फोटोग्राफीमध्ये करिअरचा स्कोप काय आहे?

1. फोटो जर्नलिझम

2. ट्रॅवल फोटोग्राफी

3. वाइल्डलाइफ फोटोग्राफी

4. फॅशन आणि पोर्ट्रेट फोटोग्राफी

5. वेडिंग आणि इव्हेंट फोटोग्राफी

6. ई-कॉमर्स आणि प्रोडक्ट फोटोग्राफी

7. आर्किटेक्चरल आणि रिअल इस्टेट फोटोग्राफी

UGC NET परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांचा संताप; परीक्षा पुन्हा न घेण्याच्या मागणीसाठी NTA कार्यालयावर धडक!

फ्रीलान्सिंग किंवा फुल-टाइम जॉबचा पर्याय

फोटोग्राफीच्या क्षेत्रात फुल-टाइम नोकरीपासून ते फ्रीलान्सिंगपर्यंतचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. याशिवाय तुम्हाला हवे असल्यास तुम्ही स्वतःचे कामही सुरू करू शकता. स्वतःचा स्टुडिओ तयार करू शकता. इतर नोकरीसोबत फ्रीलान्स काम स्वीकारू शकता. तसेच एखाद्या कंपनीत नोकरी करून दरमहा निश्चित पगार मिळवण्याचा पर्यायही निवडू शकता.

किती रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो?

फोटोग्राफीचा कोर्स पूर्ण करण्यासाठी चांगला खर्च होतो, पण त्यानंतर दरमहा किती कमाई होऊ शकते, हे प्रत्येक व्यक्तीला जाणून घ्यायचे असते. सामान्यतः फोटोग्राफी क्षेत्रात फ्रेशरला १५,००० ते २५,००० रुपयांपर्यंत पगार दिला जातो. जर तुम्ही एखाद्या वरिष्ठ फोटोग्राफरसोबत असिस्टंट म्हणून अनुभव मिळवण्यासाठी काम करत असाल, तर आणखी चांगला पगार मिळू शकतो.

लॉ चे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; SLAT 2027 परीक्षा तारखा आणि प्रवेश प्रक्रिया पहा एका क्लिकवर..

तथापि, अनुभवानुसार पगारात वाढ होत जाते. अनुभव वाढल्यानंतर ४०,००० रुपयांपासून ते १ लाख रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो. तसेच, जर तुम्ही फ्रीलान्स किंवा वेडिंग प्रोजेक्ट्समध्ये काम करत असाल, तर साधारणपणे एका प्रोजेक्टसाठी ५०,००० ते २ लाख रुपये किंवा त्याहून अधिक पैसे मिळू शकतात.

Web Title: Career in photography after 12th courses salary marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2026 | 02:06 PM

Topics:  

  • education
  • Photo

संबंधित बातम्या

Deepak Rajawat Air India Express: CFO ते थेट CEO! एअर इंडिया एक्सप्रेसच्या सर्वोच्च पदाची ‘या’ व्यक्तीकडे जबाबदारी
1

Deepak Rajawat Air India Express: CFO ते थेट CEO! एअर इंडिया एक्सप्रेसच्या सर्वोच्च पदाची ‘या’ व्यक्तीकडे जबाबदारी

IMD Career Guide: हवामानशास्त्रज्ञ बनायचंय? १२ वी नंतर कोणता अभ्यासक्रम निवडावा? जाणून घ्या
2

IMD Career Guide: हवामानशास्त्रज्ञ बनायचंय? १२ वी नंतर कोणता अभ्यासक्रम निवडावा? जाणून घ्या

How to Choose Best School: चांगला निकाल म्हणजे सर्वकाही नाही! मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा निवडताना ‘या’ गोष्टींचा विचार करा
3

How to Choose Best School: चांगला निकाल म्हणजे सर्वकाही नाही! मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा निवडताना ‘या’ गोष्टींचा विचार करा

Agnipath Scheme Update: अग्निपथ योजनेत मोठ्या बदलांची तयारी! केवळ शारीरिक तंदुरुस्ती नव्हे, तर पार करावे लागतील ‘हे’ कठीण निकष
4

Agnipath Scheme Update: अग्निपथ योजनेत मोठ्या बदलांची तयारी! केवळ शारीरिक तंदुरुस्ती नव्हे, तर पार करावे लागतील ‘हे’ कठीण निकष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.