
फोटो सौजन्य: Pinterest
मात्र अनेकांच्या मनात हा प्रश्न असतो की, बीसीसीआयमध्ये सरकारी नोकऱ्या सुद्धा निघतात का? तसेच बीसीसीआयच्या भरतीची माहिती कशी काय मिळते? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया.
बीसीसीआय ही सरकारी संस्था नाही. त्यामुळे येथे सरकारी नोकऱ्यांप्रमाणे ठरावीक भरती प्रक्रिया किंवा स्पर्धा परीक्षा पद्धत नाही. मात्र, केंद्र सरकारचे क्रीडा मंत्रालय अप्रत्यक्षपणे काही बाबींमध्ये भूमिका बजावते. बीसीसीआयमध्ये वेळोवेळी विविध पदांसाठी भरती केली जाते. या भरती वेगवेगळ्या विभागांमध्ये असतात. यामध्ये मॅनेजमेंट, प्रशासन, मीडिया आणि मार्केटिंग, टेक्निकल टीम, मेडिकल टीम तसेच कोचिंग आणि सपोर्ट स्टाफ यांचा समावेश होतो.
बीसीसीआयकडील सर्व रिक्त पदांची माहिती त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाते. जर तुम्हाला बीसीसीआयमध्ये नोकरीसाठी अर्ज करायचा असेल, तर तुम्ही www.bcci.tv या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता. तसेच खास जॉब्ससाठी असलेल्या www.bcci.tv/jobs या पेजवरही भरतीविषयक नोटिफिकेशन्स दिली जातात. बीसीसीआयकडील सर्व भरतीची अधिकृत माहिती याच वेबसाइटवरून जाहीर केली जाते.
JEE Main 2026 ऑफलाइन होणार? एक चूक ठरू शकते महाग, विद्यार्थ्यांनी आताच करावी ‘अशी’ तयारी
बीसीसीआयमध्ये नोकरी मिळवण्यासाठी सरकारी परीक्षेसारखी दीर्घ प्रक्रिया नसते. सर्वप्रथम बीसीसीआयच्या वेबसाइटवर जाऊन उपलब्ध जॉब नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे लागते. त्यानंतर तुमच्या पात्रतेनुसार तुमचा Resume ईमेलद्वारे पाठवावा लागतो. काही पदांसाठी बीसीसीआयकडून लेखी परीक्षा किंवा मुलाखतही घेतली जाते. ही प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर तुम्हाला नोकरी मिळू शकते.
बीसीसीआयमधील कर्मचाऱ्यांचा पगार त्यांच्या पदावर आणि अनुभवावर अवलंबून असतो. सुरुवातीच्या स्तरावर सुमारे 20,000 ते 30,000 रुपये प्रतिमाह पगार मिळू शकतो. मात्र अनुभव आणि जबाबदारी वाढल्यानंतर हा पगार लाखोंपर्यंत जाऊ शकतो. याशिवाय बीसीसीआयकडून केंद्रीय करार असलेल्या खेळाडूंनाही वेगळी वार्षिक सॅलरी दिली जाते, जी विविध ग्रेडनुसार ठरवली जाते.