भारतीय विद्यार्थ्यांच्या अडवणुकीसाठी Gold Card Visa, ट्रम्पच्या मनमानीचा आणखी एक नमुना
जॉइंट एंट्रन्स एक्झामिनेशन (JEE) 2026 ही परीक्षा २१ जानेवारी २०२६ ते ३० जानेवारी २०२६ दरम्यान होणार आहे. पेपर लीकसारख्या घटनांमध्ये वाढ होताना दिसात आहे. यासारख्या घटनांना आळा घालण्यासाठी JEE, NEET आणि CUET परीक्षा ऑफलाइन (पेन-पेपर मोडमध्ये) घेण्याचा प्रस्ताव सरकारकडून मांडण्यात आला आहे. या निर्णयावर अजूनही चर्चा सुरु आहे. जर हा निर्णय घेण्यात आला तर विध्यार्थ्यांना परीक्षेची वेगळी मोड असेल.
एक चूक आणि संपूर्ण वर्ष वाया जाण्याचा धोका
ऑनलाइन परीक्षांमध्ये स्क्रीनवर टाइमर आणि ऑटो नेव्हिगेशन असते. मात्र, ऑफलाइन परीक्षेत विद्यार्थ्यांना स्वतः वेळेचे नियोजन करावे लागेल. ज्यांनी जास्तीत जास्त ऑनलाइन मॉक टेस्ट दिल्या आहेत, त्यांच्यासाठी हे आव्हानात्मक ठरू शकते.
उपाय काय?
1) दोन्ही फॉरमॅटची तयारी ठेवा
परीक्षा ऑफलाइन होईल की ऑनलाइन, हे अजूनही ठरलेलं नाही आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने मॉक टेस्ट द्याव्यात.
2) टाइम मॅनेजमेंटचा सराव करा
ठराविक वेळेत पेपर सोडवण्याचा सराव केल्यास आत्मविश्वास वाढतो.
3) बेसिक्स मजबूत करा
परीक्षा कोणत्याही मोडमध्ये असली तरी कॉन्सेप्ट क्लिअर असणे सर्वात महत्त्वाचे आहे. सूत्रे, युनिट्स, डायग्राम आणि सोप्या प्रश्नांचा सोडवण्याचा पद्धत यांचा नियमित सराव करा.
4) परीक्षा मोडबद्दल ताण घेऊ नका
परीक्षेचा उद्देश तुमचे ज्ञान तपासणे आहे. त्यामुळे फॉरमॅटपेक्षा तयारीवर अधिक लक्ष द्या.
5) सोपी अभ्यास साधने वापरा
नोट्स, NCERT ची मूलभूत माहिती आणि टॉपिकनुसार प्रश्नसंच यांचा वापर करून अभ्यास करा. तुमच्या शिकण्याच्या कौशल्यांना चालना मिळेल अशा पद्धतीने तयारी करावी.
UGC, AICTE आणि NCTE नष्ट होण्याच्या मार्गावर! उच्च शिक्षणात मोठा बदल, कॅबिनेटमध्ये मिळाली मान्यता
Ans: सध्या फक्त प्रस्ताव आहे, अधिकृत निर्णय झालेला नाही.
Ans: OMR शीटवर चुकीची मार्किंग, टाइम मॅनेजमेंट आणि सेक्शन नियोजन आव्हान ठरू शकते.
Ans: ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही फॉरमॅटमध्ये मॉक टेस्ट सोडवण्याची प्रॅक्टिस करावी.






