राकेश मारिया कोण होते ?
राकेश मारिया हे १९८१ बॅच चे आयपीएस अधिकारी होते. त्यांची पहिली नेमणूक ही अकोला इथे जिल्हा अधीक्षक म्हणून झाली होती. त्या नंतर त्यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्त पदाची धुरा सांभाळली. ज्या काळात मुंबई अंडरवर्ल्डच्या दहशतीखाली होती. तेव्हा यांनी मुंबई पोलिसिंग गाजवली. ते पुढे निवृत्त होताना होम गार्डचे महासंचालक म्हणून निवृत्त झाले. मात्र त्यांनी पदावर असताना अनेक महत्वाच्या केसेसचा उलगडा केला. १९९३ चे मुंबई बॉम्बस्फोट आणि २६/११ च्या घटनेत तपासात महत्त्वाची भूमिका बजावली.
संजय दत्तच्या कानाखाली मारली होती!
राकेश मारिया यांना सुपरकॉप म्हटल जायचं. १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात त्यांच्याकडे तपास अधिकारी म्हणून जबाबदारी होती. अनेक जणांनी तेव्हा संजय दत्त यांच नाव घेतल होत. संजय दत्त तेव्हा एका फिल्मच्या शूटिंग मध्ये मॉरिशस मध्ये होता. जसं तो शूटिंग संपवून मुंबईत आला तेव्हा त्याला मुंबई विमानतळावर ताब्यात घेतलं. चौकशी करत असताना संजय दत्त हा निरपराध असल्याचं सांगत होता. मात्र जशी त्यांनी तणावाखाली येवून संजय दत्तच्या कानाखाली मारली तशी संजय दत्त ने बेकायदा शस्त्र ठेवली असल्याची कबुली दिली. नंतर संजय दत्त याने वडील सुनील दत्त यांच्या पायावर डोक ठेवलं आणि आपली चूक कबूल केली. १९९३ च्या बॉम्ब स्फोट प्रकरणात संजय दत्तला शिक्षा झाली होती. त्याला तुरुंगातही जाव लागल होत.
नायकसारखी प्रतिमा तयार झाली
संजय दत्त प्रकरणातील अनेक महत्वाचे खुलासे त्यांनी पोलीस तपासात केले. त्यामुळे त्यांना केवळ १३ वर्षांच्या पोलीस सेवेत पोलीस मेडल मिळाल होत. राकेश मारिया आणखी एका कारणाने चर्चेत होते ते म्हणजे क्रिकेट मध्ये फिक्सिंग कस होत? हे अनेकांना माहिती नसायचं. तेव्हा मारिया यांनीच काही प्रकरण समोर आणली होती. त्यामुळे मारिया चांगलेच चर्चेत आले होते. आता पुन्हा ते त्यांच्या आत्मचरित्र मुलाखतीमुळे चर्चेत आले आहेत.
फक्त आयपीएस व्हायचं होत!
राकेश मारिया हे मुळचे मुंबईचे. जेव्हा ते मुंबईचे पोलीस आयुक्त झाले तेव्हा पूर्ण मुंबईला त्यांचा अभिमान वाटला होता. तयारी करत असताना त्यांनी दिल्ली गाठली. मित्रांच्या सहाय्याने दिल्लीत अभ्यास केला. जेव्हा केव्हा त्यांना यूपीएससीची परीक्षा द्यायची संधी मिळायची तेव्हा ते आयपीएस हे रँक प्रेफर करायचे. तेव्हा त्यांनी पाच वेळा प्रयत्न केला होता.
Ans: 1981 बॅचचे आयपीएस अधिकारी, माजी मुंबई पोलीस आयुक्त.
Ans: 1993 मुंबई बॉम्बस्फोट, 26/11 हल्ला, संजय दत्त प्रकरण.
Ans: त्यांच्या ‘Let Me Say It Now’ या आत्मचरित्रामुळे.






